जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे | Jatyachya Mukhi Ghalate Motyache Dane

जात्याच्या मुखी घातले मोत्याचे दाणे । तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे ॥१॥
विश्वासाचे तू फिरविले जाते । पीठ पाडीसी दैवाचे ॥२॥
चंद्रसूर्य तुझेच डोळे । जसे शरदाचे चांदणे ॥३॥
जनी म्हणे विसरले । दिसे रूप तुझे आगळे ॥४॥





No comments:

Post a Comment