Showing posts with label आत हरि बाहेर हरि. Show all posts
Showing posts with label आत हरि बाहेर हरि. Show all posts

आत हरि बाहेर हरि | Aat Hari baher hari

आत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोंडिले ॥१॥
हरिनें कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविलें ॥ध्रु.॥
हरिने जीवें केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥२॥
तुका म्हणे वेगळा नव्हे । हरि भोवे भोंवताला ॥३॥