देवाच्या प्रसादे करा रे भोजन | Devachya Prasade Kara re bhojan

देवाच्या प्रसादे करा रे भोजन । व्हाल कोण कोण ते अधिकारी ॥१॥
ब्रम्हादिकांसि हे दुर्लभ उच्छिष्ट । नका मानू वीट ब्रम्हरसी ॥१2॥
अवघीयांपुरते वोसंडले पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथे ॥3॥
इच्छादानी येथे वळला समर्थ । अवघेचि आर्त पुरवितो ॥4॥
सरे येथे ऐसे नाही कदा काळी । पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे ॥5॥
तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हाते । कामारी सांगाते निरुपम ॥6॥





No comments:

Post a Comment