आनंद अद्वय नित्य निरामय | Aanand Advay Nitya Niramay

आनंद अद्वय नित्य निरामय । जें कां निजध्येय योगियांचें ॥१॥
तें हें समचरण साजिरे विटेवरी । पाहा भीमातीरीं विठ्ठलरुप ॥२॥
पुराणासी वाड श्रुति नेणती पार । तें झालें साकार पुंडलीका ॥३॥
तुका म्हणे ज्यातें सनकादिक ध्यात । तें आमुचें कुळदैवत पांडुरंग ॥४॥





No comments:

Post a Comment