आरत्या | Aartya

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

गजानना मजवर राहु दे छाया | मजवर राहु दे छाया गजानना ||
गौरी कुमार गजमुख वदना हासत नाचत ये | प्रभू तू धावत धावत ये ||

गणराया लवकर येई | भेटी सकलासी देई ।।
नाचत आले गणपती | पायी घागुऱ्या वाजती |
अंगी शेंदुराची उटी || सकल ज्ञानाचा तू दाता |
देई ज्ञान मोरेश्वर || दास पदी लीन झाला |

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुगुट शोभतो बरा । रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ॥ संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ जय देव० ॥ ३ ॥

शेषाचल अवतार तारक तूं देवा । सुरवरमुनिवर भावें करिती जनसेवा ॥
कमळारमणा अससी अगणित गुणठेवा ।कमळाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ॥ १ ॥
जय देव जय देव जय व्यंकटेशा ।केवल करुणासिंधू पुरवीसी आशा ॥ ध्रु० ॥
हें निजवैकुंठ म्हणुनि ध्यातों मी तूतें । दाखविसी गुण कैसे सकळिक लोकांतें ॥
देखुनि तुझें स्वरूप सुख अद्भुत होतें ।ध्यातां तुजला श्रीपति दृढ मानस होतें ॥ जय० ॥ २ ॥

शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको । दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ॥
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको । महिमा कहे न जाय लागत हूँ पदको ॥१॥
जय जयजी गणराज विद्या सुखदाता । धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ ध्रु० ॥
अष्टी सिद्धी दासी संकटको बैरी । विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकाई ॥
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबि तेरी । गंडस्थलमदमस्तक झुले शशिबहारी ॥जय० ॥२॥
भावभगतिसे कोई शारणागत आवे । संतति संपति सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भवे। गोसावीनंदन निशिदिन गुण गावे॥ जय ॥३॥

नानापरिमळ दूर्वा शमिपत्रें । लाडू मोदक अन्नें परिपूरित पातें ।
ऐसें पूजन केल्या बीजाक्षरमंत्रें । अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरती ॥
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती । सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥ जय देव० ॥ २ ॥
शरणागत सर्वस्वे भजती तव चरणीं । कीर्ति तयांची राहे जोंवर शाशितरणी ॥
त्रैयोक्यों ते विजयी अद्भुत हे करणी । गोसावीनंदन रत नामस्मरणीम ॥ जय देव जय देव० ॥३॥

तूं सुखकर्ता तूं दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया ।
संकटीं रक्षीं शरण तुला मी, गणपतीबाप्पा मोरया ॥ ध्रु० ॥
मंगलमूर्ति तूं गणनायक । वक्रतुंड तूं सिद्धिविनायक ॥
तुझिया द्वारीं आज पातलों । नेईं स्थितिप्रति राया ॥ संकटीं० ॥१॥
तूं सकलांचा भाग्यविधाता । तूं विद्येचा स्वामी दाता ॥
ज्ञानदीप उजळून आमुचा । निमवीं नैराश्याला ॥ संकटीं० ॥२॥
तूं माता, तुं पिता जगं या । ज्ञाता तूं सर्वस्व जगीं या ॥
पामर मी स्वर उणें भासती । तुझी आरती गाया ॥ संकटीं ॥३॥

जय देव जय देव जय वक्रतुंडा । सिंदुरमंडित विशाल सरळ भुजदंडा ॥ ध्रु० ॥
प्रसन्नभाळा विमला करिं घेउनि कमळा ।उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीळा ॥
रुणझुण रुणझुण करिती घागरिया घोळा ।सताल सुस्वर गायन शोभित अवलीळा ॥ जय देव० ॥ १ ॥
सारीगमपधनी सप्तस्वरभेदा ।धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ॥
तातक तातक थैय्या करिसी आनंदा । ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा ॥ जय देव० ॥ २ ॥
अभयवरदा सुखदा राजिवदलनयना । परशांकुशलड्डूधर शोभितशुभरदना ॥
ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना ।मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करिं भ्रमणा ॥ जय देव जय देव जय वक्र ॥ ३ ॥

उंदरावरि बैसोनि दूडदूडा येसी । हाती मोद्क लाडू घेउनियां खासी ।।
भक्तांचे संकटी धावूनि पावसी । दास विनविती तुझियां चरणासी ।। १ ।।
जय देव जय देव जय गणराजा सकळ देवां आधी तूं देव माझा ।। धृ. ।।
भाद्रपदमासी होसी तू भोळा । आरक्त पुष्पांच्या घालूनिया माळा ।।
कपाळी लावूनी कस्तुरी टीळा । तेणे तू दिससी सुंदर सांवळा ।। २ ।।
जय देव जय देव जय गणराजा सकळ देवां आधी तूं देव माझा ।। धृ. ।।
प्रदोषाचे दिवशी चंद्र श्रापीला । समयी देवे मोठा आकांत केला ।।
इंदु येवोनि चरणी लागला । श्रीराम बहुत श्राप दिधला ।। ३ ।।
पार्वतीच्या सुता तू ये गणनाथा । नेत्र शिणले तुझी वाट पाहतां ।।
किती अंत पाहासी बा विघ्नहर्ता । मला बुद्धी देई तू गणनाथा॥
जय देव जय देव जय गणराजा सकळ देवां आधी तूं देव माझा॥ जय देव.॥धृ.॥

गजानना श्रीगणराया । आधी वंदू तुज मोरया ।।
मंगलमूर्ति श्री गणराया । आधी वंदूं तुज मोरया ।। १ ।।
सिंदुर-चर्चित धवळी अंग । चंदन उटी खुलवी रंग ।।
बघता मानस होते दंग । जीव जडला चरणीं तुझिया ।। २ ।।
गौरीतनया भालचंद्रा । देवा कृपेचा तूं समुद्रा ।।
वरदविनायक करुणागारा । अवघी विघ्ने नेसी विलया ।। ३ ।।

आरती करितो मी गणराया | गंध पुष्प धूप दीप अर्पितो तुला |
कुणी म्हणती गजवदना | एकदंत वक्रतुंड हे गजानना ||
नाही स्मरलो क्षणही तुला | म्हणुनी आता शरण तुला आलो देवा ||

जय जय जय जय जय मोरेश्वरा | गिरिजात्मक जय जय विघ्नेश्वर |
चिंतामणी तू श्री गणपती | वरद विनायक तू गणपती |
श्री सिद्धीविनायक तू गणपती |बल्लाळेश्वर तू गणपती |
अष्टविनायक निशिदिनि भज तू | तरशील तू हा भवसागर ||

त्राता तू गणराज अमुचा | त्राता तू गणराज | गणराज...गणराज||धृ||
रिद्धी सिद्धी चा तू स्वामी | विघ्नहरा गणराज जगता ||
चौशष्ठ विद्याशास्त्र कलांचा | देवाचा अधिनाथ जगता ||
मंगलमय हे नाम तुझे रे | ध्यातो मी गणराज जगता ||

शिव सुता प्रेमे करू आरती |
शिवसुता प्रती शिवसुता प्रती | शिव सुता प्रेमे करू आरती |
गत काळातील कृत पुण्याई | अर्पित नैवेद्या ||
मम भूमीच्या कर्तव्याचा | कर्पूर लावी तव नामे ||
आगमनी निगमानी विचारूनी नियमे | प्रदक्षणा करू अभिरामे ||

विघ्नांत विघ्नेशा हे गजानना । आरती मी करितों तुज पुरवि कामना ॥ धृ. ॥
भाद्रपदी शुद्ध चतुर्थीस तव बरी। मूर्ति करुनि सर्व लोक पूजिती घरी॥
महिमा तव वर्णवे न पापगिरि हरी॥ येई घाई करुनि त्वरा। विघ्नहरा। दे सुगिरा। हे कृपाधना ॥ विघ्ना. ॥ १ ॥
संकटि जे पडुनि प्रभो स्मरती तुजला । मुक्त करिसी जगती या खचित त्यांजला ॥
जाणुनि हे तव भजनीं ध्यास लागला ॥ गातो। नमितो। तारि आतां। या भक्ता। दयावंता। गौरिनंदना ॥ विघ्नां ॥ २ ॥

आरती करु तुज मोरया। मंगळगुणानिधी राजया॥ आरती॥धृ.॥
सिद्धीबुद्धीपती संकटनाशा। विघ्ननिवारण तूं जगदीशा॥ आरती करुं.॥१॥
धुंडीविनायक तू गजतुंडा।सिंदूरचर्चित विलसित शुंडा॥ आरती करुं.॥२॥
गोसावीनंदन तन्मय झाला। देवा देखोनिया तुझ शरण आला॥ आरती करुं तुज मोरया.॥३॥

जय देव जय देव जय वक्रतुंडा। सिंदुरमंडीत विशाळ सरळ भुजदंडा॥ जय ॥धृ.॥
प्रसन्न भाळा विमला करिं घेवूनि कमळा। उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलील।
रुणझुण करिती घागरिया घोळा। सतार सुस्वर गायन शोभित अवलीला॥जय॥१॥
सारीगपमधनीसप्तस्वर भेदा। धिमकिट धिमकिट मृदंग वाजती गतिछंदा॥
तातग थैया करिसी आनंदा। ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा॥जय.॥२॥
अभयवरदा सुखदा राजिवरलनयना। परशांकुशलड्डूधर शोभित शुभवदना।
उर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना।मुक्तेश्वर चरणांबूजिं अलिपरि करि भ्रमणा। जय देव जय देव जय.॥३॥

वक्रतुंड एकदंत गौरिनंदना। आरती मी करितों तुज हे गजानना॥धृ॥
पाशांकुशा शोभे करी दु:खभंजना। रत्नजडित सिंहासन बुद्धिदीपना॥
सुरनरमुनि स्मरती तुला यतो दर्शना॥१॥
ऋद्धिसिद्धि करिती सद नृत्यगायना। देसि मुक्ति भक्तजनां हे दयाघना॥
विठ्ठलसुत लीन पदीं विघ्ननाशना। वक्रतुंड एकदंत॥२॥

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा । माता जाकी पारवती पिता महादेवा ॥
एकदन्त दयावन्त चारभुजाधारी | माथे पर तिलक सोहे मूसे की सवारी ।
पान चढ़े फल चढ़े और चढ़े मेवा | लड्डुअन का भोग लगे सन्त करें सेवा ॥
अंधे को आँख देत कोढ़िन को काया |बाँझन को पुत्र देत निर्धन को माया ।
' सूर' श्याम शरण आए सफल कीजे सेवा |जय गणेश जय गणेश जय गणेश देवा ॥

आरती मी करिन तुला श्रीगजानना । वक्रतुंड एकदंत मुषकवाहना ॥ धृ. ॥
त्रिविधताप दूर करी गौरीनंदना । दॆन्य हरुनि तारी मला विघ्ननाशना ॥
भक्तसखा तूंची एक सिंदुरानना । मी निशिदिनी ध्यातो तुला दुष्ट भंजना ॥ १ ॥
पंचारती ओवाळिन पुरवि कमना । साह्य करीं निशिदिनि मज भक्तातारणा ॥
भाविक जन पुजिति तुला स्वहित साधना । वासुदेव लीन पदीं धरुनि धारणा ॥ २ ॥

गणराया आरती ही तुजला ॥ धृ. ॥
रुणझुण पायीं वाजति घुंगूर । गगनी ध्वनी भरला ॥ १ ॥
भाद्रपद मासी शुक्लचतुर्थीसी । पुजिती जन तुजला ॥ २ ॥
गंध पुष्प धुप दीप समर्पुनी ।अर्पिती पुष्पांला ॥ ३ ॥
भक्त हरी हा आठवितो रुप । गातो तव लीला ॥ ४ ॥

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं । अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारीं ॥
वारीं वारीं जन्ममरणातें वारीं । हारीं पडलों आतां संकट नीवारीं ॥ १ ॥
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी । सुरवरईश्वरवरदे ताअक संजिवनी ॥ ध्रु० ॥
त्रिभुवनीं भुवनीं पाहतां तुज ऐसी नाहीं । चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाहीं । ते तूम भक्तांलागीं पावसि लवलाहीं ॥ जय० ॥ २ ॥
प्रसन्नवदनें प्रसन्न होसी निजदासां । क्लेशापासुनि सोडीं तोडीं भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥ जय० ॥ ३ ॥

अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागोनी ।
त्रिविध तापाची करावया झाडणी । भक्ता लागोनी लागोनी पावसी निर्वाणी ॥
आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥१॥
द्वैत सारोनी सारोनी माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी धरीन् ।
भेद रहित रहित वारीस जा‌ईन । आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥२॥
नवविध भक्तिच्या करुनी नवरात्रा । करोनी निराकरण कारण मागेन ज्ञानपुत्रा ।
दंभ सासरा सासरा संडीन कुपात्रा । करीन सद्भावे अंतरीच्या मुद्रा ॥
आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥३॥
पूर्ण बोधाची बोधाची भरीन मी परडी । आशा मनशांच्या मनशांच्या पाडीन दरडी ।
मनविकार विकार करीन कुरवंडी ।अमृत रसाची भरीन मी दुरडी ॥
आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥४॥
आता साजणी साजणी झाले मी नि:संग । विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडीयला मी संग ।
काम क्रोध हे झोडियले मांग । केला मोकळा मोकळा मार्ग सुरंग । सत्‌चित आनंद आनंद झाले मी अभंग ॥ आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥५॥ ऐसा जोगवा जोगवा मागून ठेविला । जावुनी महाद्वारी महाद्वारी नवस मी फेडीला । एका जनार्दनी जनार्दनी एकपणे देखिला । जन्म-मरणाचा मरणाचा फेरा हा चुकविला ॥ आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥६॥ कर्पूरगौरा गौरिशंकरा आरति करूं तुजला । नाम स्मरतां प्रसन्न होउनि पावसि भक्ताला ॥ धृ० ॥त्रिशूळ डमरू शोभत हस्तीं कंठिं रुंडमाळा । उग्रविषातें पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळां ॥ तृतीय नेत्रीं निघती क्रोधें प्रळयाग्नीज्वाळा । नमिती सुरमुनि तुजला ऐसा तूं शंकर भोळा ॥ १ ॥ ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगीं गौरी । जटा मुकुटीं वासकरितसे गंगासुंदरी ॥ सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारीं । मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरीं ॥ २ ॥ लवधवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥ कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा । अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥ विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥ देवीं दैत्यीं सागरमंथन पैअं केलें । त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥ तें त्वां असुरपणें प्राशन केलें । नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥ व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥ जय शंभो भोला नाथा | जय पार्वती रमणा शंभो || अंकी गौरी विराजे | दुड दुड गणपती धावे | नंदीवरुनी आली स्वारी || डम डम डमरु वाजे |व्याघ्रांबर कटी विलसे | नाचती भूतगण भोवती सारा || कंठी फणीवर शोभे | चिता भस्म ते विलसे | झूळ झुळ गंगा माई वाहे || त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा । नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥ सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥ पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥ दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥ प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥ दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥ मी तू पणाची झाली बोलवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥ जय देवा दत्तराया ॥ स्वामी करुणालया ॥ आरती ओंवाळीन ॥ तूज महाराजया ॥ ध्रु० ॥ प्रपंचताट करीं ॥ त्रिविधताप निरंजनी ॥ त्रिगूण शुभ्रवाती ॥ उजळिल्या ज्ञान ज्योती ॥ जय देवा० ॥ १ ॥ कल्पना मंत्रपुष्प ॥ भेददक्षिणा वरी ॥ अहंभाव पूगीफल । न्यून पूर्ण सकल ॥ जय देवा० ॥ २ ॥ श्रीपाद श्रीगुरुनाथा ॥ चरणीं ठेवूनि माथा ॥ विनवितो दास हरी ॥ अवघा त्रास दूर करीं ॥ जय देवा० ॥ ३ ॥ आरती अवधूता || जय जय आरती अवधूता || धृ. || मीतूपणाचा भाव टाकुनी || दर्शन दे संता || १ || ज्ञानाज्ञान खेळ कल्पुनी || सुख देसी चित्ता || २ || प्रेमास्तव हा जन्म घेतला || बाणली खूण दत्ता || ३ || श्री गुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर तु करी आता ॥धृ॥ चोरे द्विजासी मारिता मन जे । कळवळले ते कळवळलो आता ॥१॥ पोटे शुलाने द्विज तडफडता । कळवळले ते कळवळलो आता ॥२॥ द्विज सुत मरता वळले ते मन । हो कि उदासीन न वेळो आता ॥३॥ सती पति मरता काकुळती येती । वळले ते मन न मन चळो की आता ॥४॥ श्री गुरुदत्ता त्यज निष्ठुरता । कोमल चित्त वळवी आता ॥५॥ सगुण हे आरती निर्गुण ओंवाळूं । कल्पनेचें घृत घालूं दीप पाजळूं ॥ १ ॥ ओंवाळूं आरती सद्‌गुरुनाथा; श्रीगुरुनाथा । भावे चरणकमळवरी ठेविला माथा ॥ धृ. ॥ अविद्येचा मोह पडला उपडोनी सांडूं । आशा मनशा तृष्णा काम क्रोध कुरवंडू ॥ २ ॥सद्‌गुरुचे पूजन केले षोडशोपचारी । रामानंद जीवन्मुक्त झाला संसारी ।ओंवाळूं आरती. ॥ ३ ॥ फळलें भाग्य माझें । धन्य झालों संसारी । सद्‌गुरु भेटला हो ॥ तेणें धरियलें करीं । पश्चिमें चालवीलें आत्मस्तुती निर्धारी ॥ त्रिकुटा वरी नांदे । देंखीयेली पंढरी ॥ १ ॥' तें सुख काय सांगूं । वाचे बोलता नये ॥ आरतिचेनि गुणें । मलें मीपण माये ॥ धृ. ॥ राउळामाजीं जातां । राहे देह अवस्था ॥ मन हे उन्मन झालें । नसे बद्धतेची वार्ता ॥ हेतु हा मावळला । शब्द आली नि:शब्दता ॥ तटस्थ होउनि ठेलो । नीजरुप पहातां ॥ २ ॥ त्रिगुण गुण बाई । पूर्ण जळत्या वाती ॥ नवलाव अविनाश । न समायें स्वयंज्योती । पाहतां लक्ष तेथें ॥ हालूं विसरली पातीं । नातुडे माझें । नाही दिवसराती ॥ ३ ॥ आरती सद्‌गुरुची । उजळली अंतरी ॥ प्रकाश थोर झाला । सांठवेना अंबरी ॥रविशशि मावळलें । तया तेजामाझारीं ॥ वाजती दिव्य वाद्यें अनुहाते गजरी ॥ ४ ॥ आनंदसागरांत ॥प्रेमें दीधली बूडी ॥ लाधलों सौख्य मोठें । न यें बोली ॥ सद्‌गुरुचेनि संगे । ऎसी आरती केली ॥ निवृत्तीनें आनंदाची ।तेथे वृत्ती निमाली ॥ ५ ॥ ओंवाळूं आरती मदनगोपाळा । श्यमसुंदर गळां वैजयंतीमाळा ॥ ध्रु० ॥ चरणकमल ज्याचे अति सुकुमअ । ध्वजवज्रांकुश चरणीं ब्रीदाचा तोडर ॥ ओंवाळूं० ॥ १ ॥ नाभिकमळीं ज्याचे ब्रह्मयाचें स्थन । हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥ ओंवाळूं० ॥ २ ॥ मुखकमला पाहतां सूर्याच्या कोटी । वेधलें मानस हारपली द्रुष्टी । ओंवाळू० ॥ ३ ॥ जडित मुगुट ज्याचा दैदीप्यमान । तेणें तेजें कोंदलें अवघें त्रिभुवन ॥ ओंवाळूं० ॥ ४ ॥ एका जनार्दनीं देखियेलें रूप । रूप पाहों जातां झालें अवघें तद्रूप ॥ ओंवाळूं आरती० ॥ ५ ॥ धन्य हे प्रदक्षिणा सदगुरूरायाची । झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ॥ गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी। अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ॥ धन्य. ॥ १ ॥ पदो पदी झाल्या अपार पुण्याच्या राशी । सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी ॥ धन्य.॥ २ ॥ मृदंगताघोषी भक्त भावार्थे गाती ॥ नामसंकीर्तने नित्यानंद नाचताती ॥ धन्य. ॥ ३ ॥ कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत । लोटांगण घालितां ॥ मोक्ष लागे पायांता ॥ धन्य ॥ ४ ॥ प्रदक्षिणा करुनी देहभाव हरवीला । श्रीरंगात्मत विठ्ठल पुढे उभा राहिला । धन्य हे प्रदक्षिणा ॥ धन्य ॥ ५ ॥ आरती साईबाबा । सौख्यदातारा जीवा। चरणरजतळीं । द्यावा दासां विसांवा, भाक्ता विसावा ॥ ध्रु० ॥ जाळुनियां अनंग । स्वस्वरूपीं राहे दंग । मुमुक्षु जनं दावी । निज डोळां श्रीरंग ॥ आरती० ॥ १ ॥ जया मनीं जैसा भाव । तया तैसा अनुभव । दाविसी दयाधना । ऐसी तुजी ही माव ॥ आरती० ॥ २ ॥ तूमचें नाम ध्यातां । हरे संसृतिव्यथा । अगाध तव करणी । मार्ग दावीसी अनाथा ॥ आरती० ॥ ३ ॥ कलियुगीं अवतार । सगुणब्रह्म साचार । अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ॥ आरती० ॥ ४ ॥ आठां दिवसां गुरुवारीं । भक्त करिती वारीं ॥ प्रभुपद पहावया । भवभय निवारी ॥ आरती० ॥ ५ ॥ माझा निजद्रव्य ठेवा । तव चरणरजसेवा । मागणें हेंचि आतां । तुम्हां देवधिदेवा ॥ आरती० ॥ ६ ॥ इच्छित दीन चातक । निर्मल तोय निजसुख । पाजावें माधवा या । सांभाळ आपुली भाक ॥ आरती० ॥ ७ ॥ आरती ज्ञानराजा ॥ महाकैवल्यतेजा ॥ सेविती साधुसंत ॥ मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥ लोपलें ज्ञान जगीं ॥ त नेणती कोणी ॥ अवतार पांडुरंग ॥ नाम ठेविलें ज्ञानी ॥ आरती ॥ १ ॥ कनकांचे ताट करीं ॥ उभ्या गोपिका नारी ॥ नारद तुंबरु हो ॥ साम गायन करी ॥ आरती० ॥ २ ॥ प्रगट गुह्य बोले ॥ विश्व ब्रह्मची केलें ॥ रामा जनार्दनीं ॥ पायीं ठकचि ठेलें ॥ ३ ॥ आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ॥ सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवीं आम्हां ॥ ध्रु० ॥ राघवें सागरांत । पाषाण तारीले ॥ तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकीं रक्षिले ॥ आरती० ॥ १ ॥ तुकितां तुलनेसी । ब्रह्म तुकासी आलें ॥ म्हणोनि रामेश्वरें । चरणीं मस्तक ठेविलें ॥ आरती० ॥ २ ॥ युगें अठ्ठावीस विटेवरी उभा ।वामांगीं रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥ पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ ध्रु० ॥ तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं । कांसे पीतांबर कस्तुरि लल्लाटीं ॥देव सुरवर नित्य येती भेटी ।गरुड हनुमंत पुढें उभे रहाती ॥ जय० ॥ २ आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ॥ दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती । केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ॥ जय० ॥ ५ ॥ येई हो विठ्ठले माझे माउली ये । निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु० ॥ आलिया गेलिया हातीं धाडी निरोप । पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई० ॥ १ ॥ पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला । गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई० ॥ २ ॥विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी । विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो० ॥ ३ ॥ येई हो एकवीरा देवी माझे माऊली ये । माझे माऊली ये ॥ दोन्ही कर जोडुनि तुमची वाट मी पाहे ॥ धृ. ॥ आलीया गेलीया अंबे धाडी निरोप । कारल्यामध्ये आहे माझी एकवीरा माय ॥ १ ॥ पिवळी साडी ही अंबे कैसी गगनी झळकली ॥ व्याघ्रावरी बैसोनी माझी एकवीरा देवी आली ॥ २ ॥ एकवीरेचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ॥ एकवीरा देवी नाम तुमचे भावे ओवाळी । येई हो एकवीरा देवी. ॥ ३ ॥ ओंवाळूं आरती मदनगोपाळा ॥ श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा ॥ धृ. ॥ चरणकमल ज्याचें अति सुकुमार ॥ ध्वजव्रजांकुश ब्रीदाते तोडर ॥ १ ॥ नाभिकमलीं ज्याचें ब्रह्मयाचे स्थान । ह्रुदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥ २ ॥ मुखकमल पाहातां सूर्याच्याकोटी ॥ मोहियेलें मानस कोंदियली दृष्टी ॥ ३ ॥ जडितमुगुट ज्याच्या दैदीप्यमान । तेणें तेजें कोंदलें अवघे त्रिभुवन ॥ ४ ॥ एका जनार्दनीं देखियेले रुप ॥ रुप पाहों जाता झालेसें तद्रूप॥ ५ ॥ आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्त संकटिं नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥ अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी । वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी ॥ मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी । हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ आरती० ॥ १ ॥ रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी । परोपकरासाठीं देवा कांसव झालासी ॥ दाढें धरुनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी । प्रल्हादाकारणें स्तंभीं नरहरि गुरगुरसी ॥ आरती० ॥ २ ॥ पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी । भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळा नेसी ॥ सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी । वामनरूप धरुनी बळिच्या द्वारीं तिष्ठसी ॥ आरती० ॥ ३ ॥ सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला । कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥ निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला । सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ आरती० ॥ ४ ॥ मातला रावण सर्वां उपद्रव केला । तेहतिस कोटी देव बंदी हरिलें सीतेला ॥ पितृवचनालागीं रामें वनवास केला । मिळोनि वानरसहित राजा राम प्रगटला ॥ आरती० ॥ ५ ॥ देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें । नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें ।गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले । गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ आरती० ॥ ६ ॥ बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा । सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा ॥ म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा।बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा ॥ आरती० ॥ ७॥ ओंवाळूं आरती माझ्या पंढरीराया, माझ्या पंढरीमाया ॥सर्वभावे शरण आलों तूझिया पायां ॥ ध्रु० ॥ सर्व व्यापुनि कैसें रूप राहिलें अकळ, रूप राहिलें अकळ ॥ तो हा गवळ्याघरी झाला कृष्ण गोपाळ ॥ ओंवाळूं ० ॥ १ ॥निजस्वरूप गुणातीत अवतार धरीं अवतार धरी ॥ तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥ ओंवाळूं० ॥ २ ॥ भक्तांच्या काजा कैसा रूपासी आला, कैसा रूपासी आला । ब्रीदाचा तोडरू चरणीं मिरविला ॥ ओंवाळूं० ॥ ३ ॥ आरती आरती कैसा ओंवाळीली, कैसी ओंवाळीली ॥ वाखाणितां कीर्ति वाचा परतली ॥ ओंवाळूं० ॥ ४ ॥ भावभक्तीबळे होसी कृपाळू देवा, होसी कृपाळू देवा ॥तुका म्हणे तुझ्या न कळता मावा ॥ ओंवाळूं० ॥ ५ ॥ सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥ गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं । सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १ ॥ जय देव जय देव जय हनुमंता । तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता ॥ ध्रु० ॥ दुमदुमिलीं पाताळें उठिला प्रतिशब्द । थरथरला धरणीधर मानीला खेद ॥ कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद ॥ रामीं रामदासा शक्तीचा बोध ॥ जय देव० ॥ २ ॥ ओवाळूं आरती माझ्या पंढरीराया, माझ्या पंढरीराया । सर्वभावें शरण आलो तुझीया पायां ॥ धृ. ॥ सर्व व्यापुनि कैसे रूप राहिलें अकळ, रूप राहिले अकळ । तो हा गवळ्याघरी झाला कृष्ण गोपाळ ॥ १ ॥ स्वरीप गुणातीत अवतार धरीं, अवतार धरीं ॥ तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥ २ ॥ भक्तांचा काजा कैसा रूपासी आला, कैसा रूपासी आला । ब्रीदाचा तोडरू चरणी मिरविला ॥ ३ ॥ आरती कैसी ओवाळीली, कैसी ओवाळीली । वाखाणिता कीर्ति वाचा परतली ॥ ४ ॥ भावभक्तीबळें होसी कृपाळू देवा, होसी कृपाळू देवा ॥ तुका म्हणे तुझ्या न कळता भावा ॥ ५ ॥ मै तो आरती उतारूँ रे संतोषी माता की । मै तो आरती उतारूँ रे संतोषी माता की । जय जय संतोषी माता । जय जय माँ ॥ बडी ममता हैम बडा प्यार माँ की आँखो में । माँ की आँखो में । बडी करुणा है, माया दुलार माँ की आँखो में ।क्यों न देखूँ मै बार बार माँ की आँखो में । दिखे हर घडी नया चमत्कार माँ की आँखो में ।नृत्य करूँ छुम छुम झम झमा झम झुम झुम ।झाँकी निहारूँ रे ओ प्यारी प्यारी झाँकी निहारूँ रे ॥ १ ॥सदा होती है जयजयकार माँ के मंदिर में । माँ मे मंदिर में ।नित्य झांझर की होए झनकार माँ के मंदिर में । माँ के मंदिर में ।सदा मंजीरे करते पुकार माँ के मंदिर में ।दिखे हर घडी नया चमत्काअ माँ के मंदिर में ।दीप धरूँ धूप करूँ प्रेम सहित भक्ति करूँ जीवन सुधारूँ रे ।ओ प्यारा प्यारा जीवन सुधारूँ रे । मै तो आरती उतारूँ रे संतोषी माता की ।जय जय संतोषी माता ।जय जय माँ ।जय जय संतोषी माता ।जय जय माँ ॥ २ ॥ ओम जय जगदिश हरे स्वामी जय जगदिश हरे । भक्त जनों के संकट, दासजनो कें संकट क्षण में दूर करे ॥ धृ. ॥ जो ध्यावे फल पावे दुख विनसे मनका । स्वामी दुख विनसे मनका । सुख संपति घर आवे, कष्ट मिटे तनका ॥ ओम. ॥१॥ माता पिता तुम मेरे शरण पडूं मैं किसकी । स्वामी शरण पडूं मैं किसकी । तुम बिन और न दुजा । दीनप्रभो और न दुजा आस करु किसकी । तुम पूरण-परमात्मा तुम अंतर्यामी । स्वामी तुम अंतर्यामी । परब्रह्म परमेश्वर तुम सेवक-स्वामी ॥ ओम्‌ ॥ २ ॥ तुम करुणाके सागर तुम पालन करता ॥ स्वामी तुम पालन करता । मैं मूरख फलकामी मै सेवक तुम स्वामी । कृपा करो स्वामी । विषयविकार मिटाओ पाप हरो देवा । स्वामी पाप हरो देवा । श्रद्धा भक्ति बढाओ संतनकी सेवा ॥ ओम्‍ ॥३ ॥ तनमनधन है तेरा स्वामी सबकुछ है तेरा । तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा ॥ ओम ॥ ४ ॥ दिनबंधु दुखहरता तुम ठाकुर मेरे ॥ स्वामी तुम रक्षक मेरे । अपने हात उठाओ अपनी शरण बिठाओ द्वार खडा तेरे ॥ ओम. ॥ ५ ॥ जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥ पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥ ध्रु० ॥ विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥ परिमलद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥ घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥ प्रसाद भक्षण करितां तूं त्यां प्रसन्न नारायण ॥ जय० ॥ १ ॥ शतानंदे विप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें ॥ दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ॥ त्यापासुनि हें व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें ॥ भावार्थें पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥ जय० ॥ २ ॥ साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें ॥ इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ॥ त्या पापानें संकटिं पडुनी दुःखहि भोगीलें ॥ स्मृति होउनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्ध्रिलें ॥ जय० ॥ ३ ॥ प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली ॥ क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ॥अंगध्वजरायासी यापरि दुःखस्थिति आली ॥ मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णीं परिसीली ॥ जय० ॥४ ॥ पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं ॥ पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि ॥ ऐसा भक्तां संकटिं पावसी तूं चक्रपाणी ॥ जय० ॥ ५ ॥ अनन्यभावें पूजुनि हें व्रत जेजन आचरती ॥ इच्छित पुरविसि त्यांतें देउनि संतति संपत्ति ॥संहरसी भवदुरितें सर्वहि बंधने तुटती ॥ राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती ॥ जय० ॥ ६ ॥ ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णूं मी कैसा । भक्तिपुरःसर आचरती त्यां पावसि जगदीशा । भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा ॥ मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥ जय जय० ॥७॥ घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझें । प्रेमे आलिंगिन, आनंदें पुजिन, भावें ओवाळिन म्हणे नामा ॥त्वमेव माता व पिता त्वमेव, त्वमेव बधुश्च सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव ॥ कायेन वाचा मनसेन्दियैर्वा, बुद्ध्यात्मना या प्रकृतिस्वभावात । करोमि यद्यत सकलं परस्मै, नारायणयेति समर्पयामि ॥ अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेव हरिम । श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे ॥ ह्रे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥ आकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझिया सकाळ हरीच्या दासा | कल्पनीची बाधा न होणे काळी हे संत मंडळी सुखी असो | अहंकाराचा वर न लगो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी | नाम म्हणे तया असावेम कल्याण ज्या मुखी निधन पांडुरंग   मंत्रपुष्पांजलि ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् | ते ह नाकं महिमान: सचं त | यत्र पूर्वे साध्या: संति देवा: | ॐ राजाधिराजाया प्रसह्यसाहिने नमोवयं वैश्रवणाय कुर्महे | स मे कामान् कामाकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु | कुबेराय वैश्रवणा | महाराजाय नम: | ॐ स्वस्ति साम्राज्यं, भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्या ईस्यात् सार्वभौम: सार्वायष आंतादापरार्धात | पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति | तदप्य:षश्लोकोह्य भिगिति मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे | अविक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा: सभसद इति | एकदन्ताय विघ्महे वक्रतुण्डाय धिमाहि | तन्नो दंति: प्रचोदयात् | मोरया मोरया मी बाळ तान्हे. तुझीच सेवा करु काय जाणे. अपराध माझे कोट्यानुकोटी. मोरेश्वरा बा तू घाल पोटी. मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया || मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया || मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया विघ्‍नेश्वरा मोरया || मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया वरदविनायक मोरया || मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया ||

No comments:

Post a Comment