अद्वय आनंद तो हा परमानंद | Advay aanand to ha paramanand

अद्वय आनंद तो हा परमानंद । शोभे सच्चिदानंद विटेवरी ॥१॥
सांवळें रूपडें गुणा आगोचर । उभा कटीं ठेऊनी विटे ॥२॥
पीतांबर परिधान चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥३॥
भानुदास म्हणे ब्रह्मा अगोचर । नेणवे विचार ब्रह्मादिकां ॥४॥





No comments:

Post a Comment