काय पांडुरंगा सांग म्यां करावेव | Kay panduranga sang mya karavev

काय पांडुरंगा सांग म्यां करावे । शरण कोणा जावें तुम्हांविण ॥१॥
वाट पाहतांना भागले लोचन । कठिणच मन केलें तुवां ॥२॥
ऐकिली म्यां कानीं कीर्ति तुझी देवा । उठलासे हेवा त्याचि गुणें ॥३॥
अनाथ अन्यायी काय मी करीन । दयावंत खूण सांगसी तूं ॥४॥
नामा म्हणे आस पूर्ण कीजे देवा । रूपडें दाखवा नेटें पाटें ॥५॥

No comments:

Post a Comment