कासियाने पूजा तुझी करू केशीराजा | kasiyane puja karu keshiraja

कासियानें पूजा करूं केशीराजा । हा चि संदेह माझा फेडीं आतां ॥१॥
उदकें न्हाणूं तरी स्वरूप तुझें । तेथें काय माझें वेचे देवा ॥ध्रु.॥
गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथें मी दुर्बळ काय करूं ॥२॥
फळदाता तूंच तांबोल अक्षता । तरी काय आतां वाहों तुज ॥३॥
वाहूं दक्षिणा जरी धातु नारायण । ब्रम्ह तें चि अन्न दुजें काईं ॥४॥
गातां तूं ओंकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाहीं कोठें ॥५॥
तुका म्हणें मज अवघें तुझें नाम । धूप दीप रामकृष्णहरि ॥६॥

No comments:

Post a Comment