त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रम | Triveni sangami nana tirthi bhrami

त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी| चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ॥१॥
नामासी विन्मुख तो नर पापिया| हरिवीण धावया न पवे कोणी॥2॥
पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक| नामे तिन्ही लोक उध्दरती॥3॥
ज्ञानदेव म्हणे नामजपात हरिचे| परंपरा त्याचे कुळ शुध्द॥4॥





No comments:

Post a Comment