Tuesday, August 2, 2011

1 ॐ कारा परतें निर्गुणा आरुतें । भक्तांसी निरुतें गोकुळीं वसे ॥१॥ सांवळें सगुन चैतन्य परिपुर्ण । संवगदियासी जाण क्रीडा करी ॥२॥ आदि मध्य अंत न कळे ज्या रुपाचा । तोचि बाळ नंदाचा म्हणताती ॥३॥ एका जनार्दनीं वेगळाचि पाहीं । हृदयीं धरुनी राही सांवळियासी ॥४॥
2 ॐ नमो सदगुरुनिर्गुणा । पार नाहीं तंव गुणा । बसोनि माझिया रसना । हरिगुणा वर्णवीं ॥१॥ हरिगुण विशाळ पावन । वदवीं तूं कृपा करुन । मी मूढमती दीन । म्हणोनि कींव भाकितसें ॥२॥ तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णीन मी जाण । एका वंदितसें चरण । सदगुरुचें आदरें ॥३॥
3 अगम्य तुझा खेळ न कळे अकळ । ब्रह्मादिक वेडे जाले तेथें आम्हां कैचें बळ ॥१॥ कान्होबा भला भला तुं होसी । चोरी करुनि दिसों न देसी रे कान्होबा ॥२॥ चोरुनी शिदोर्‍या आमुच्या खासी । शेखी वळतीया धाडिसी रे कान्होबा ॥३॥ एका जनार्दनीं आमुचा होंसी । दास्यात्व करुनी दिसों न देसी कान्होबा ॥४॥
4 अनंत नामाचा हा काला । पुराणें म्हणते पाहुं चला ॥१॥ हरिनामाचा कवळू घेतां। तेणें धालों पैअ सर्वथा ॥२॥ एका कवळासाठीं । गणीका बैसविली वैकुंठीं ॥३॥ एका जनार्दनीं कवळ । सेवुं जाणती ते प्रेमळ ॥४॥
5 अनुपम्य उदार नाम । अनुपम्य सकाम संत तें ॥१॥ अनुपम्य पंढरीसी जाती । अनुपम्य नाचती वाळुवंटी ॥२॥ अनुपम्य टाळ घोळ अनुपम्य रसाळ वाद्यें वाजती ॥३॥ अनुपम्य संतमेळ । अनुपम्य प्रेमळ नाम घेती ॥४॥ अनुपम्य एका जनार्दनी । अनुपम्य आयणी चुकले ॥५॥
6 अनुपम्य उपासना । अनुपम्य चरणी संताचिये ॥१॥ अनुपम्य भक्ति गोड । अनुपम्य लिगाड तुटत ॥२॥ अनुपम्य पंढरीचा वास । अनुपम्य दैवास दैव त्यांचे ॥३॥ अनुपम्य नाचती वैष्णव । अनुपम्य गौरव तयांचे ॥४॥ अनुपम्य एका जनार्दनीं । अनुपम्य चरणीं संताचिये ॥५॥
7 अनुपम्य क्षेत्र अनुपम्य देव । नसे तोचि ठाव पंढरीये ॥१॥ अनुपम्य वाहे पुढें चंद्रभागा । अनुपम्य भंगा दोष जाती ॥२॥ अनुपम्य होय पुंडलिक भेटी । अनुपम्य कोटी सुखलाभ ॥३॥ अनुपम्य संत नामाचा गजर । अनुपम्य उद्धार जडजीवां ॥४॥ अनुपम्य शोभा विठ्ठलचरणीं । एक जनार्दनीं गात गीतीं ॥५॥
8 अनुपम्य घनदाट । करिती बोभाट अनुपम्य ॥१॥ पंढरीसी जाती अनुपम्य । धन्य जन्म अनुपम्य त्यांचा ॥२॥ अनुपम्य त्यांच्या पुण्या नाहीं पार । अनुपम्य निर्धार सुख त्यांसी ॥३॥ अनुपम्य दशा आली त्यांच्या दैवा । अनुपम्या देवा चुकले ते ॥४॥ अनुपम्य शरण एका जनार्दनीं । पंढरीं सांडोनि नेम नाहीं ॥५॥
9 अनुपम्य ज्ञान अनुपम्य मतें । अनुपम्य सरतें पंढरीयें ॥१॥ अनुपम्य वेद अनुपम्य शास्त्र । अनुपम्य पवित्र पंढरीये ॥२॥ अनुपम्य भक्ति अनुपम्य मुक्ति । अनुपम्य वेदोक्ती पंढरीये ॥३॥ अनुपम्य कळा अनुपम्य सोहळा । अनुपम्य जिव्हाळा पंढरीये ॥४॥ अनुपम्य दया अनुपम्य शांती । अनुपम्य विरक्ति एका जनार्दनीं ॥५॥
10 अनुपम्य नारीनर ते दैवाचे । अनुपम्य त्यांचे पुण्य देखा ॥१॥ अनुपम्य वास जयांसी पंढरी । प्रत्यक्ष वैकुंठपुरी अनुपम्य ॥२॥ अनुपम्य पहाती विठलरायातें । दरुशनें पावती मुक्तीने अनुपम्य ॥३॥ अनुपम्य भक्त नंदिती दैवाचे । अनुपम्य त्यांचे सुख देखा ॥४॥ अनुपम्य एका जनार्दनीं चरणीं । अनुपम्य विनवणी करितसे ॥५॥
11 अनुपम्य पुराणं सांगर्ती सर्वथा । अनुपम्य तत्त्वतां पंढरीये ॥१॥ अनुपम्य योग अनुपम्य याग । अनुपम्य अनुराग पंढरीये ॥२॥ अनुपम्य ध्यान । अनुपम्य धारणा । अनुपम्य पंढरीराणा विटेवरी ॥३॥ अनुपम्य क्षेत्र तीर्थ तें पवित्र । अनुपम्य गोत्र उद्धरती ॥४॥ अनुपम्य शरण एका जनार्दनी । अनुपम्य भुवनीं नांदतसे ॥५॥
12 अनुपम्य वाचे वदतां पंढरी । होतसे बोहरे महात्पापा ॥१॥ अनुपम्य ज्याचा विठ्ठली जो भाव । अनुपम्य देव तिष्ठे घरीं ॥२॥ अनुपम्य सदा कीर्तनाची जोडी । अनुपम्य गोडी मनीं ज्यांच्या ॥३॥ अनुपम्य संग संतांचा विसांवा । अनुपम्य भावा पालट नाहीं ॥४॥ अनुपम्य शरण एका जनार्दनीं । कायावाचामनीं छंद यासी ॥५॥
13 अनुपम्य वास पंढरीस ज्याचा । धन्य तो दैवाचा अनुपम्य ॥१॥ अनुपम्य घडे चंद्रभागे स्नान । अनुपम्य दान नाम वाचे ॥२॥ अनुपम्य घडे क्षेत्र प्रदक्षिणा । अनुपम्य जाणा नारीनर ॥३॥ अनुपम्य सोहळा नित्य दिवाळी । अनुपम्य वोवाळी विठोबासी ॥४॥ अनुपम्य शरण एका जनार्दनीं । अनुपम्य ध्यानीं एक नाम ॥५॥
14 अनुपम्य सप्तपुर्‍याअ त्या असती । अनुपम्य त्या वरती पंढरीये ॥१॥ अनुपम्य तीर्थ सागरादि असती । अनुपम्य सरती पंढरीये ॥२॥ अनुपम्य देव उदंडे असती । अनुपम्य विठलमूर्ति पंढरीये ॥३॥ अनुपम्य संत वैष्णवांचा मेळ । अनुपम्य गदारोळ पंढरीये ॥४॥ अनुपम्य शरण एका जनार्दनी । अनुपम्य चिंतनीं डुल्लतसे ॥५॥
15 अनुहत टिपरी घाई खेळ जाणें तो भाई रे । खोटा खेळ खेळोनि काय स्वतः अनुभव घेई रे ॥ धृ॥ मत्स्येद्रं कुळीं एक गोरख जाला । तो बहुत खेळ खेळला रे । पवन साधुनि अष्टांग योगे तेणेंचि बळें मातला रे । खेचरीं भूचरीं चाचरी धरुनीं अगोचरी मिळाली रे । गोल्हाट योग साधुनि तेणें काळ तो जिंकुनि गेला रे ॥१॥ निवृत्तिचा पोर एक ज्ञाना जाण तो खेळियामाजी शहाणा रे । कवित्व केला प्रकाश मातला प्रवृत्ति गाळिलें घाणा रे । असोनि भेला नसोनि गेला काळ केला आंकणा रे । भले भले गडी मिळाविले तेणें अकाय सांगु कवणा रे ॥२॥ जनार्दनाची सात पाँच पोरें त्यामाजी लाडका येका रे । एकही साधन न करी परी तो बळेचि मातला फुका रे । आपपर देही कांहींच नेणें रायासी म्हणे तो रंका रे । भलेंभले गडी मेळवोनि तेनें खेळ दाविला असका रे ॥३॥ तिघा जिणांचें खेळणें जालें चवर्थे एक उठविलें रे । अनन्यभावें सदगुरुचरणीं गुरुसी शरण गेलें रे । भवासी न भ्यालं कळलें म्हणोनि तिघांचि समान जालें रे । आपण जैसें पुर्ण तैसें एका जनार्दनी केलें रे ॥४॥
16 अबोलणें बोल कुंठीट पै जाहलें । तें निधान देखिलें नंदाघरीं ॥१॥ अधिष्ठान मुळ व्यापक सकळ । जगाचें तें कुअळ कल्पद्रुम ॥२॥ एका जनार्दनीं बिंबी बिंबाकार । सर्वत्र श्रीधर परिपुर्ण ॥३॥
17 अर्जुनाचे रथीं श्रमला जगजेठी । म्हणोनि कर ठेउनी कंटीं उभा येथें ॥१॥ धरुनी गोवर्धन उभा सप्तदीन । म्हणोनि कर जघन ठेउनी उभा ॥२॥ कंसादी मल्ल मारी जरासंध । ते चरणरविंद उभे विटे ॥३॥ धर्माघरीं उच्छिष्टपात्र काढी करें । म्हणोनि श्रमें निर्धारें ठेविले कटीं कर ॥४॥ पुंडलीक भक्त देखोअनि तल्लीन जाला । एका जनार्दनीं ठेविला कटाई कर ॥५॥
18 अलक्ष केली वावडी । लक्षाचा दोर परवडी । उडविती बारा चौदा गडी । भरली ती गगनी उडी ॥१॥ भली चंग वावडी । दादांनों भली चंग वावडी ॥धृ॥ औट हात सोडोनी दोरा । मध्यें कामटी लाविल्या बारा । आत्मास्थितीच्या चंग उबारा । वावडी उडती अंबरा ॥२॥ साहा चार मिळवोनी गडी । अठराजण सोडिती वावडी । एका जनार्दनीं त्यांची जोडी । जनार्दनाचे पायी गोडी ॥३॥
19 अवघें आनंदाचें । क्षेत्रं विठ्ठल देवांचे ॥१॥ अवघें हे पावन । तीर्थ चंद्रभागा स्नान ॥२॥ अवघे संतजन । पुंडलिकासी वंदन ॥३॥ अवघा विठ्ठल देव । एका जनार्दनीं भाव ॥४॥
20 अवघें क्षेत्र पंढरी । अवघा आनंद घरोघरीं ॥१॥ अवघा विठ्ठलचि देव । अवघा अवघिया एक भाव ॥२॥ अवघे समदृष्टी पहाती । अवघे विठ्ठलाचि गाती ॥३॥ अवघे ते दैवाचे । एका जनार्दनीं साचे ॥४॥
21 अवघें परब्रह्मा क्षेत्र ।अवघें तेथें तें पवित्र ॥१॥ अवघा पर्वकाळ । अवघे दैवाचे सकळ ॥२॥ अवघीयां दुःख नाहीं । अवघे सुखाचि तया ठायीं ॥३॥ अवघे आनंदभरित । एका जनार्दनीं सदोदित ॥४॥
22 अवलोकितां चंद्रभागा । सकळ दोष जाती भंगा ॥१॥ स्नान करितं भीवरेसी ॥ तरती पातकी अपैसी ॥२॥ दृष्टीं पाहतां विठठल देव न राहे काळाचें भेव ॥३॥ हरुषें वाहातां टाळीं । एका जनार्दनी मुक्त केलीं ॥४॥
23 अविद्या निशींचा लोटला पहार । रजेंसी लोपला तम अंधकार । सत्व शोधित शुद्ध सुमनहार । प्रबोध पाहतां परतला कृष्ण वीरवो ॥१॥ आला रे आला रे म्हणती पहा कृष्ण । जैसा निर्जीवा मीनला जीवप्राण । श्रुती परतल्या आत्मासाक्षात्कार देखोनि । तैशा विव्हळ गोपिका हरि पाहुन वो ॥२॥ कृष्णापाशीं मिनल्या व्रजनारी । कां हो निष्ठुर तूं जालासी हरी । स्नेह धरिती तयासी होसी दुरी । लोभु सांडीती त्यापाशी निरंतरी वो ॥३॥ थोर शिणलाती तुम्हीं मजविण । माझे स्वरुपीं ठेविला जीव प्राण । माझे भेटीसी तंव नाहीं खंडन । सब्राह्मा अंतरी माझे अधिष्ठान वो ॥४॥ ऐसें वचन ऐकोनि हरिमुखें थोर चकल्या वियोगाचे दुःखे । आम्हांमारिले शस्त्राविण वचन तिखें । शेखी हें ना तें केले संगदोषें वो ॥५॥ कृष्णां गोपिका वेधल्या एका मनें । माना मुरडिती प्रीति प्रेमाचें रुसणं । जेवी श्रुति परतल्या नेति या वचनें । एका जनार्दनी धरुनी ठेल्या मौन्ये वो ॥६॥
24 असतां बंदिशाळें । देवकी डोहळे । गर्भ घननिळे । आथियला ॥१॥ गुज पुसे भ्रतारा । आनु नेणें दुसरा । आवडी अवधारा । जिवा होय ॥२॥ मेळवुनि लेंकुरी । खेळ खेळावा साकार । गोकुळीं अवतार । गौळीया घरीं ॥३॥ वर्षतां शिळाधारीं । उचलवा माहागिरी । वेणु पावे करीं । वाजवीत ॥४॥ जळीं रिघ करावा । भवसर्प नाथावा । वरि बैसो बरवा । भाव माझा ॥५॥ कंसादिक वीर । त्यांचा कारावा संहार । ईजे राज्यधर । उग्रसेना ॥६॥ एक यश द्यावें त्रैलोक्य जिंकावें । कनकपूर बसवावें । सिंधुमाजीं ॥७॥ एका जनार्दनीं । डोहाळे संपूर्ण । पुरवी नारायणा । वासनेचे ॥८॥
25 अस्तमान जालिया ग्रामांत परतले । गोपाळ ते गेले घरोघरीं ॥१॥ आपुलिया गृहीं रामकृष्ण आले । यशोदेनें केलें निंबलोण ॥२॥ षड्रस पक्वान्नीं विस्तारिलें ताट । जेविती वैकुंठ नंदासवें ॥३॥ नंदासवें जेवीं वैकुंठीचा हरी । ब्रह्मादिक सरी न पावती ज्यांची ॥४॥ एका जनार्दनीं ऐसी लीला खेळे । परब्रह्मा सांवळें कृष्णरुप ॥५॥
26 अहं तृणावर्त बळी । प्रवेशला गोकुळीं । मोहममतेची राहाटोळी । भवंडीतसु ॥१॥ रज उधळले तेणें बळें । झाकोळले बुद्धीचे डोळे । कृष्ण आहे नाहीं हें न कळे । सकळिकांसी हो ॥२॥ श्रद्धा यशोदा म्हणे । माझा कृष्ण नेला कोणें । न दिसें रजोगुणें । मायें काय करुं वो ॥३॥ कैसें निबीड निबीड रज । मीचि न देखें मज । तेथें कृष्ण सोय निज । कवण दावी ॥४॥ तळमळीताहे मन । गेलें निधान । संतां सोय सविघ्र । बाधीना बा ॥५॥ बाळ सांवळें देखोनियां दिठी । आला धांवोनि उठाउठीं । कृष्णें घातली मिठी । अद्वैतपणें ॥६॥ वेगें नेला गगनावरी । कृष्णची गगनभरी । यावया जावया तिळभरी । वावो नाहीं बा ॥७॥ जडला कृष्ण अंगीं । कृष्णचि जाला वेंगीं । द्वैतभाव भंगीं । गेला त्याचा ॥८॥ संकल्प विकल्प पांख । उपडिलें दोन्हीं देख । येणें जाणें निःशेष । खुंटलें त्यांचें ॥९॥ कृष्णकारणीं हेंदुर्घट । आली भुलविली वाट । जिवनीं जेवीं मीठ । विरोनि जाय ॥१०॥ तृणावर्ता आवर्तु । भवंडी कृष्णनाथु । करणें देहा घातु । करुनी ठेला ॥११॥ पाहतां वेदविधी । द्वेत दृष्ट बुद्धी । एका जनार्दनीं । बैसविली निजपदीं ॥१२॥
27 आंगीचिया बळें खेळसी हुतुतु । वृद्धपण आलिया तोंडावरी थुथुथु ॥१॥ कासया खेळसी वायां भजें गुरुराया । चुकविल डाया हुतुतुतु ॥२॥ एका जनार्दनीं हुतुतु नको भाई । मन जिंकुनियां लागे कान्होबाचे पायीं ॥३॥
28 आकार निराकार विश्वरुपाचा ॐकार । तो हा सर्वेश्वर बाळरुपें ॥१॥ रांगणारांगतु हळुच पिलंगतुं । आनंदभरितु नंदराय ॥२॥ अंगणीं धांवतु सर्वेंचि बैसतु । अचोज दावितु भक्तालागीं ॥३॥ एका जनार्दनीं नित्य निरामय । न कळे वो माया काय बोलूं ॥४॥
29 आजी कांहो कृष्ण वर्जिली यमुना ।बाऊ तो जाणा कोठोनि आला ॥१॥ कैसा आहे बाहु पाहिन तयातें । म्हणोनि त्वरित उठिलासे ॥२॥ वारितां वारितां पेंदा पै गेला । पहातसे उगला यमुनेंत ॥३॥ बाऊ तो न दिसे कोठें खल्लाळ वाजत । पेंदा तया म्हणत क्रोधयुक्त ॥४॥ म्हणतसे पेंदा यमुनेसी जाण । स्त्री तूं होऊन हुंबरी घेसी ॥५॥ मी कृष्णदास घेसी तुं हुबरी । तुज निर्धारी बळ बहु ॥६॥ मी काय निर्बळ घेसी तुं हुबरी । आतांची निर्धारी पाहें माझें ॥७॥ म्हणोनियां पेंदा तेथेंची बैसला । हुबरीं तो तयाला घालीतसे ॥८॥ पेंदा कां नये काय जाहलें त्याला । कृष्णें पाठविला दुजा एक ॥९॥ तोही मीनला तयांसी तत्काळ । गडी तों सकळ आलें तेथें ॥१०॥ उरलेसे दोघे कृष्ण आणि राम । गुंतलें सकाम गडी तेथें ॥११॥ काय जाहलें म्हणोनि आले उभयंता । पाहुनी तत्त्वतां हांसताती ॥१२॥ सावध करितां न होती सावध । लागलासे छंद घुमरीचा ॥१३॥ एका जनार्दनीं कौतुकें कान्हया । आली असे दया भक्तांची ते ॥१४॥
30 आजी वो कां हो कृष्ण नाहीं आला । म्हणोनि खेद करी गौळणी बाळा । काय हो ऐसा देहीं लागला चाळा । कां रे न येसी बाळा नंदाचिया ॥१॥ कवण देवा नवसी नवसू । कवणा गुरुतें मार्ग पुंसुं । कैसा भेटेल हा हृषीकेशु म्हणोनि । मन जाहलें उदासू ॥२॥ हा कृष्ण आजी कां घरी नये । आतां काय करुं यासी उपाय । एका जनार्दनी धरुं जाय पाय । तैच दरुशन होय आजी याचें ॥३॥
31 आदि नाटक सर्व व्यापक व्यापुनी निराळा । गोप गोधनें गौळणीयांसी लाविला चाळा ॥१॥ मनमोहन कृष्ण यशोदेचा बाई । चोरी करी नानापरी धरितां न सांपडे बाई ॥२॥ जयाचे विंदान न कळे ब्रह्मादिकां वो माये । ठकविलें देवा आपणाचि काला खाये ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा चौदेहा वेगळा । पुराणें वेडावलीं न कळे अगम्य ज्याची लीला गे माये ॥४॥
32 आनंद सोहळा वृंदावनीं पाहों । नंदजीचा कृष्ण तेणें केला नवलावो ॥१॥ धाकुले संवंगडे गौलणींचा थाट । वेणु पावां वाजविती नाचती दाट ॥२॥ एका जनार्दनीं वेधलें मन । पाहतां पाहतां चित्त जालें उन्मन ॥३॥
33 आनुपम्य भाग्य नांदतें पंढरी । विठ्ठल निर्धारीं उभ जेथें ॥१॥ अनुपम्य वाहे पुढें चंद्रभागा । दोषा जातीं भंगा नाम घेतां ॥२॥ अनुपम्य मध्यें पुंडलीके मुनी । अनुपम्य चरणीं मिठी त्याच्या ॥३॥ संत शोभती दोही बाहीं । अनुपम्य देहीं सुख वाटे ॥४॥ अनुपम्य एका जनार्दनीं ठाव । अनुपम्य पंढरीराव विटेवरी ॥५॥
34 आनुपातें विरहिण बैसे । कां वो कर्म बळिवंत दिसे । संगवर्जित मज झालें ऐसें । कोणी योगे भेटी नसे ॥१॥ मज भेटवा संतसंगती । तेणे निवारेण सर्व भ्रांती ॥धृ॥ विरहें बहुत पीडिली बाळा । कोन शांतवी तया अबलां । वेधे श्रीरंग जीवी लागला । तया भेटलीया सुख होईल तयाला ॥२॥ नेणें आपपरावे दुजें कांहीं । विरहें विरह जडला हृदयीं । कोण सोडवी गुरु मज देहीं । या विराहा अंतपार नाहीं ॥३॥ ऐसा विरह करिता दुःख । दैव योगें घडलें संतसुख । तापत्रय विरह गेला देख । सुखें सुख अपार झालें देख ॥४॥ संतसंग निरसे विरह । पावन देह झाला विदेह । एका जनार्दनी आनंद पाहे । विरह निरसला सुख झालें गे माय ॥५॥
35 आपुलिया घरा जाती मुकवत । नाहीं दुजा हेत चित्तीं कांहीं ॥१॥ परस्परें बोल बोलती अबळा । कैशीं नवल कळा देखियली ॥२॥ धरुनिया करीं जाती तेथवरी । उभा असे हरी जवळींच ॥३॥ एका जनार्दनीं न कळें लाघव । तटस्थ गोपी सर्व मनामाजीं ॥४॥
36 आपुलिया घरा जाती मुकवत । नाहीं दुजा हेत चित्तीं कांहीं ॥१॥ परस्परें बोल बोलती अबळा । कैशीं नवल कळा देखियली ॥२॥ धरुनिया करीं जाती तेथवरी । उभा असे हरी जवळींच ॥३॥ एका जनार्दनीं न कळें लाघव । तटस्थ गोपी सर्व मनामाजीं ॥४॥
37 आपुल्या मनासीं करिती विचार । न धरवे साचार कृष्ण करीं ॥१॥ योगीयांचे ध्यानीं न सांपडे कांहीं । तया गोपिकाही धरुं म्हणतीं ॥२॥ धारितां न धरवे तळमळ । वाउगा कोल्हाळ करिती वायां ॥३॥ एका जनार्दनीं शुद्ध भक्तिविण । पवे नारायण कवणा हातीं ॥४॥
38 आपुल्या मनासीं करिती विचार । न धरवे साचार कृष्ण करीं ॥१॥ योगीयांचे ध्यानीं न सांपडे कांहीं । तया गोपिकाही धरुं म्हणतीं ॥२॥ धारितां न धरवे तळमळ । वाउगा कोल्हाळ करिती वायां ॥३॥ एका जनार्दनीं शुद्ध भक्तिविण । पवे नारायण कवणा हातीं ॥४॥
39 आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडुं । खेळे विटिदांडु पोरा खेळे विटिदांडु ॥१॥ सत्व विटी घेउनि हातीं धीर धिर दाडु । भावबळें टोला मारी नको भिऊं गांडु ॥२॥ ब्रीदबळें खेळ खेळूं लक्ष लावीतिसी । मूर्खापाशीं युक्ति नाहीं उडोनि गेली उशी ॥३॥ वकट लेंड मूंड नाल पुढें आणी लेका । भावबळें खेळ खेळ जनार्दन एका ॥४॥
40 आभाविकांसी तो जवळीचा दुरीं । दुरीचा जवली हरी भाविकांसीं ॥१॥ म्हणोनि आभावें ठाकतीं गोपिका । त्या यदुनायका न धरती ॥२॥ वावुगे ते कष्ट मनींचा तो सोस । सायासें सायास शिणताती ॥३॥ एका जनार्दनींशीण गोपीकांसी । तेणें हृषीकेशी हांसतांसे ॥४॥
41 आभाविकांसी तो जवळीचा दुरीं । दुरीचा जवली हरी भाविकांसीं ॥१॥ म्हणोनि आभावें ठाकतीं गोपिका । त्या यदुनायका न धरती ॥२॥ वावुगे ते कष्ट मनींचा तो सोस । सायासें सायास शिणताती ॥३॥ एका जनार्दनींशीण गोपीकांसी । तेणें हृषीकेशी हांसतांसे ॥४॥
42 आम्हीं असतां माजघरीं । रात्र झाली दोन प्रहरीं । मी असतां पतिशेजारीं । अवचित हरी तुझा आला ॥१॥ काय संगु सखये बाई । वेदशास्त्रां अगम्य पाहीं । आगमनिगमां न कळे कांहीं । मन पवन पांगुळलें गे बाई ॥२॥ आम्हीं असतां निदसुरी । मुंगुस घेउनी आपुले करीं । सोडियलें अदोघा माझारीं । तंव तें बोचकरी आम्हांतें ॥३॥ आम्हीं भ्यालों उभयतां । चीर फिटलें बाई तत्त्वतां । नग्नाचि जाहलें मी सर्वथा । भूतभूत म्हणोनि भ्यालें ॥४॥ ऐसें करुनि आपण पळाला । जाउनी माये आड लपला । एका जनार्दनी म्हणे भला । आतां सांपडतां न सोडी त्याला ॥५॥
43 आल्या पांच गौळणी पांच रंगाचे शृंगार करुनी ॥धृं॥ पहिली गौळण रंग सफेत । जशी चंद्राची ज्योत । गगनी चांदणी लखलखीत । एका चिती मात । मंथन करीत होती दारीत । धरुन कृष्णांचा हात । ऐशा आल्या पांच गौळणी ॥१॥ दुसरी गौळण भाळीभोळी । रंग हळदीहुनि पिवळी । पिवळा पितांबर नेसुन आली । अंगीं बुट्टे दार चोळी । एक लहान तनु उमर कवळी । जशी चांफ्यांची कळी । ऐशा आल्या पांच गौलणी ॥२॥ तिसरी गौळण रंग काळा । नेसुन चंद्रकाळा । काळे काजल लेऊन डोळां । रंग तिचासांवळा । काळीं गरसोळी लेऊन गळां । आली राजस बाळा । ऐशा आल्या पांच गौळनी ॥३॥ चवथी गौळण रंग लाल । लाल लालही लाल । कपाळी कुंकुम चिरी लाल । भांगी भरुन गुलाल । मुखी विडा रंग लाल । जैसे डांळिबीचे फुल । ऐशा आल्या पांच गौळणी ॥४॥ पांचवीं गौळण हिरवा रंग । अवघ्या झाल्या दंग । हिरव्या कांकणांचा पहा रंग । जसें आरशींत जडलें भिंग । फुगडी खेळतां कृष्णसंग । एकनाथ अभंग । ऐशा आला पांच गौळणी ॥५॥
44 आल्हादयुक्त गोपिका आली आपुलें सदनीं । नंदासहित मोक्षदानी प्रवेशलें भुवनीं ॥१॥ म्हणे यशोदा बा कृष्णा न करी तूं खोडी । बोलती गोपिका वाईट त्या जगझोडी ॥२॥ एका जनार्दनीं माझा अपराध नाहीं । जया जैसा भाव तया तोचि देहीं ॥३॥
45 आवरीं आवरीं आपुला हरी ।दुर्बळ्यांची केली चोरी । घरा जावयाची उरी । कृष्णें ठेविली नाहीं ॥१॥ गौळणी उतावेळी । आली यशोदेजवळी ।अवरीं आपुला वनमाळी । प्रळय आम्हां दिधला ॥२॥ कवाड भ्रांतीचें उघडिलें कुलुप मायेचे मोडिलें । शिंके अविद्येचें तोडिलें । बाई तुझिया कृष्णें ॥३॥ होती क्रोधांची अर्गळा । हळूचि काढिलोसे बळां । होती अज्ञानाची खिळा । तीहि निर्मूळ केली ॥४॥ डेरा फोडिला दंभाचा ।त्रिगुण तिवईस ठाव कैसा । प्रंपंच सडा हा ताकाचा । केला तुझिया कृष्णें ॥५॥ अहंकार होता ठोंबा । उपडिला धुसळखांबा । तोहि टाकिला स्वयंभा । बाई तुझिया कृष्णें ॥६॥ संचित हें शिळें लोणी । याचि केली धूळीधाणीं । संकल्प विकल्प दुधाणीं । तीहीं फोडिली कृष्णें ॥७॥ प्रारब्ध हें शिळें दहीं । माझें खादलें गे बाई । क्रियमाण दुध साई । तींही मुखीं वोतिली ॥८॥ द्वेष रांजण सगळे । स्पर्शे होती हात काळे । होतें कामाचें तें पाळें । तेंहि फोडिलें कृष्णें ॥९॥ सुचित दुश्चित घृत घागरी । लोभें भरल्या अहोत्या घरीं । त्याही टाकिलय बाहेरी । तुझिया कृष्णें ॥१०॥ कल्पनेची उतरंडी । याची केली फोडाफॊडी । होती आयुष्याची दुरडी । तेंही मोडिली कृष्णें ॥११॥ पोर रे अचपळ आमुची । संगती धरली या कृष्णाची । मिळणी मिळाली तयांची । संसाराची शुद्धी नाहीं ॥१२॥ ऐशी वार्ता श्रवनीं पडे । मग मी धांवोनि आलें पुढे । होतें द्वैताचें लुगडें । तेंही फिटोनि गेलें ॥१३॥ आपाअपणा विसरणें । कृष्णस्वरुपीं मिळालें । एका जनार्दनीं केलें । बाई नवल चोज ॥१४॥
46 आशा मनीषाचा विरह लागला । तेणें सांवळा दुरी ठेला । जवळी असोनी बोलती अबला । कवणें गुणें कान्हु रुसला ॥१॥ धांवे धावे कान्हई नंदनंदना । पुरवीं तूं आमुची वासना । आणिक नको दुजी कल्पना । विरह निवारी देई दर्शना ॥२॥ छंदे छंदें विरहिणी बोलें । कां वो बोलण्या अबोलणें जालें । एका जनर्दनी ऐसें केलें । नंदनंदना चित्त गुंतलें ॥३॥
47 आहर्निशी योगी साधिती साधन । तयासी महिमान न कळेची ॥१॥ तो हा श्रीहरी बाळवेषें गोकुळीं । खेळे वनमाळी गोवाळीयांसीं ॥२॥ एका जनर्दनीं न कळे महिमान । तटस्थ तें ध्यान मुनीजनीं ॥३॥
48 इच्छिताती देव पंढरीचा वास । न मिळे सौरस तयां कांहीं ॥१॥ ऐसें श्रेष्ठ क्षेत्र उत्तमा उत्तम । याहुनी सुगम आहे कोठें ॥२॥ जनार्दनाचा एक म्हणतसे भावें । तीर्थ ते वंदावें पंढरी सदा ॥३॥
49 उघड जगीं दिसोनियां कां झांकितीसी डोळां । पाहतां पाहतां खेळामध्ये वरपडा होसी काळा ॥१॥ नको खेळूं लंपडाई नको खेळूं लपडाई । मिळाले ते गडी जाती पळुनि पडाल दांत विचकुन भाई ॥२॥ उगाचि डोळे झांकुनि कांरे होसी अंध । संसारमायामोह याचा टाकी बा छंद ॥३॥ शरण एका जनार्दनीं जातां चुके हा खेळ । नाहीं तरी पडसी गुतोंनि कोण करील कळवळ ॥४॥
50 उठोणि मध्यरात्रीं तेथें आला सांवळा । सुखसेजे पहुडली देखे गोपी बाळा ॥१॥ पती आणि गौळणी एके सेजे पहुडली । बैसोनियां सेजे विपरीत करणी केली ॥२॥ धरुनी गोपी वेणी दाढी पतीची बांधिली । न सुटे ब्रह्मादिकी ऐशी गांठ दिधली ॥३॥ करुनी कारण आले आपुले मंदिरा । यशोदे म्हणे कृष्णा काय केलें सुंदरा ॥४॥ जाहला प्राप्तःकाळ लगबग उठे कामिनी । वोढातसे दाढी जागा झाला तो क्षणीं ॥५॥ कां गे मातलीस दिली दाढी वेणी गांठी । एका जनार्दनीं आण वाहे गोरटी ॥६॥
51 उठोनि एके दिनीं म्हणे यशोदा कान्हया । गोधनें घेऊनियां जाई वनासी लवलाह्मा ॥१॥ सवें मिळालें चिमणे सवंगडी । शिदोरी काठी कांबळी जाळी घेती आवडी ॥२॥ एका जनार्दनी गाई सोडिल्या सार्‍या । रामकृष्ण सवंगडीया देव येती पहावया ॥३॥
52 उठोनि प्रातःकाळीं गोपी येती घरा । आवरीं आवरीं यशोदे आपुलिया पोरा ॥१॥ थोर पीडीयेलें सांगतां नये आम्हां । दहीं दूध तूप लोनी नासिलें सीमा ॥२॥ लेकी सुना पोरें वेडाविलीं सकळ । चोरी करिताती भुलविलें सबळ ॥३॥ एका जनार्दनीं आवरीं आपुला कान्हा । तुझा तुज गोड वाटे हांसतीस मना ॥४॥
53 उठोनि प्रातःकाळीं म्हणे यशोदा मुरारी । गोपाळ वाट पाहती उभे तुझ्या द्वारीं । शिदोरी घेउनि वेगीं जाय रानीं ॥१॥ यमुनेचे तीरीं खेळ खेळतो कान्हा । नानापरी क्रीडा करी यादवांचा राणा ॥धृ॥ मागे पुढे गोपाळ मध्यें चाले हरी । सांवळा सुकुमार वाजवीं मुरलीम अधरीं । पुच्छे वर करुनी गाई नाचती नाना ॥२॥ मुरलीचा नाद समाय त्रिभुवनीं । किती एक नादें भुलल्या गौळणी । देह गेह सांडोनि चालताती वनीं ॥३॥ खग मृग गायी व्याघ्र नसे दुजा भाव । सकळीं उच्चारण एक कॄष्ण नांव । काया वाचा मनें शरण एका जनार्दनीं ॥४॥
54 उत्तम तें क्षेत्र उत्तम तें स्थळ । धन्य ते राऊळ पाहतां डोळां ॥१॥ एक एक तीर्थ घडती कॊटी वेळां । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥२॥ गंगा प्रदक्षिणा समुद्राचे स्नान । परी हें महिमान नाहीं कोठें ॥३॥ वैष्णवांचा मेळ करिती गदारोळ । दिंडी पताका घोळ नोहे कोठें ॥४॥ एका जनार्दानी सारांचे हें सार । पंढरी मोहरे भाविकांसी ॥५॥
55 उदंड क्षेत्राची पाहिली रचना । पंढरी ते जाणा भुवैकुंठ ॥१॥ तीर्थ आणि देव संतसमागम । ऐसें सर्वोत्तम कोठें नाहीं ॥२॥ सागरादि तीर्थ पाहतां पाहिलें । परी मन हें वेधलें पंढरीये ॥३॥ एका जनार्दनीं सुखाची विश्रांती । पाहतां विठ्ठलमुर्ति लाभ बहु ॥४॥
56 उदंड तीर्थ महिमा वर्णिला । परी नाहीं भेटला पांडुरंग ॥१॥ पंढरींसारखे तीर्थ महीवरी । न देखों चराचरीं त्रैलोक्यांत ॥२॥ ऐसा नामघोष संतांचा मेळ । ऐस भक्त्कल्लोळ नाहीं कोठें ॥३॥ एका जनार्दनीं अनाथा कारण । पढरीं निर्माण भूवैकुंठ ॥४॥
57 उदंड तीर्थे उदंड क्षेत्रें । परि पवित्र पंढरी ॥१॥ उदंड देव उदंड दैवतें । परि कृपांवतं विठ्ठल ॥२॥ उदंड भक्त उदंड संत । परी कृपावंत पुडलीक ॥३॥ उदंड गातो एक एका । परी एका जनार्दनीं सखा ॥४॥
58 उदंड तीर्थें क्षेत्रें पाहातां दिठीं । नाहीं सृष्टी तारक ॥१॥ स्नानें पावती मुक्ति जगा । ऐशी चंद्रभागा समर्थ ॥२॥ पुडलिका नमस्कार । सकळ पूर्वजां उद्धार ॥३॥ पाहतां राउळाची ध्वजा । मुक्ती सहजा राबती ॥४॥ एका जनार्दनीं विठ्ठल भेटी । मग लाभा नये तुटी ॥५॥
59 उदंड भक्त भाग्यवंत देखिले । परी निधान दाविलें पुंडलिकें ॥१॥ धन्य धन्य केला जगाचा उद्धार । नाहीं लहानथोर निवडिले ॥२॥ एका जनार्दनीं दावियेला तारु । सुखाचा सागरु विठ्ठल देव ॥३॥
60 उदंड मंत्र उदंड तीर्थे । परी पवित्र निर्धार पंढरीये ॥१॥ उदंड महिमा उदंड वर्णिला । परी या विठ्ठलावांचुनी नाहीं ॥२॥ उदंड भक्त उदंड शिरोमणी । एका जनार्दनीं चरण उदंडची ॥३॥
61 उदय सुर्याचा जाला । मिळाला गौळणीचा मेळा । धाउनी सकळां । आलीया अंगणीं ॥१॥ बोलती आणि संक्रोधें । थोर पीडेलें बाळकें ।चोरी करुनियां देखे । आला पळोनि ॥२॥ आमुचीं फोडिलीं भाजनें । दहीं दुध खादलें येणें । एका जनार्दनी तान्हें । यशोदे तुझें ॥३॥
62 उद्धवासे एकांतीं बोले गुज सांवळा । गोकुळासी जाऊनी बोधीं सुंदरीं गोपीबाळा । रथीं बैसोनी निघाला वेगीं पावला गोकुळां । तो उद्धव देखोनी दृष्टी गोपींन वेढींला ॥१॥ उद्धवा जाय मथुरेला । आणी लौकरे हरीला ॥धृ॥ मुखसुंदर शोभे कपाळीं टिळक रेखिला । नवरत्नजडित मुद्रिका हार कंठी घातिला । झळकती कुंडलें कानीं शिरीं मुगुट शोभला । मुरली धरुनी अधरीं नाचे यमुना तीरीं देखिला ॥२॥ मथुरेसी राहिला हरी विसरोनी आम्हांसी । कुब्जेनें मोहिला भाळल्या तिच्या रुपासी । डोळे पिचके खुरडच जे चाले काय वानुं मुखासी । शुद्ध भाव देखोनी तिच्या अनुसरला तियेसा ॥३॥ रासमंडली नाचे मुरारी कधीं भेटेल न कळे । वेणु वाजवी सुस्वर सोज्वळ पदकमळें । धणी न पुरे तया पाहातां मन आमुचें वेधिलें ॥४॥ हा अक्रुर कोठोन आला हरी गेला घेउनी । तोवियोग जाळी न जाय जीव आमुचा अझुनी । घरदार सोडोनी जावें गोकुळ हें सांडोनी । उद्धवा कधीं भेटविसी हरीला आणुनी ॥५॥ घडी घडी घरां येतो चोरिती श्रीहरी । तो झडकरी दाखवीं उद्धवा लौकरी । धन्य प्रेम तयांचें सदगदित अंतरीं । एका जनार्दनीं हरिरुपीं । वेधल्या नारी ॥६॥
63 उपदेश अनुपम्य खुण । विटे समचरण शोभले ॥१॥ अनुपम्य सदैव भाग्य ज्यांचें । अनुपम्य वाचे नाम गाती ॥२॥ अनुपम्य जातीं पंढरीये । अनुपम्य वस्ती होय पंढरीये ॥३॥ अनुपम्य ते भाग्याचे । विठ्ठल वाचे आळविती ॥४॥ अनुपम्य एका जनार्दनीं । अनुपम्य वदनी गाती नाम ॥५॥
64 उभयतां बैसोनि क्रोधें बोलती । कैशीं जाहलीं करणी एकमेक रडतीं ॥१॥ गोदोहन राहिलें दिवस आला दुपारी । धाउनी शेजारी येती पहाती नवलपरी ॥२॥ शस्त्रें घेउनियां ग्रंथीं बळे कपिती । कपितांचि शस्त्रें आन कापें कल्पांतीं ॥३॥ घेऊनियां अग्नि लाविताती दाढी वेणी । न जळेचि वन्ही ऐशी केली कृष्णें करणी ॥४॥ ऐसा समुदाव लक्षावधि मिळाला । बोल बोलती बोला भलतेंचि बरळा ॥५॥ धावूंनिया नंदनारायतें सांगती । एका जनार्दनीं नवल विपरित गती ॥६॥
65 उभा देव उभा देव । निरसी भेव भविकांचे ॥१॥ न लगे कांही खटाटेप । पेठ सोपी पंढरी ॥२॥ नको नको वेदपाठ । सोपी वाट पंढरी ॥३॥ शास्त्रांची तो भरोवरी । सांडी दुरी पंढरीचे ॥४॥ योगयाग तीर्थ तप । उघडती अमुप पंढरीये ॥५॥ एका जनार्दनीं स्वयं ब्रह्मा । नांदे निष्काम पंढरीये ॥६॥
66 उभारुनी ब्राह्मा पाहतसे वाट । पीतांबर नीट सांवरुनी ॥१॥ आलियासी इच्छा मिळतसे दान । जया जें कारण पाहिजे तें ॥२॥ भुक्ति मुक्ति तेथें लोळती अंगणीं । कोन तेथें मनीं वास नाहीं ॥३॥ कामधेनु कल्पतरु चिंतामणी । लोळती अंगणीं पढरीये ॥४॥ एका जनार्दनीं महा लाभ आहे । जो नित्य न्हाये चंद्रभागे ॥५॥
67 एक धांवुनी सांगिती । अहो नंदराया म्हणती । पुत्रसुख प्राप्ति । मुख पहा चला ॥१॥ सर्वें घेऊनि ब्राह्माण । पहावया पुत्रवदन । धावूंनियां सर्वजण । पहावया येती ॥२॥ बाळ सुंदर राजीवनयन । सुहास्यवदन घनः श्यामवर्ण । पाहूनियां धालें मन । सकळिकांचे तटस्थ ॥३॥ पाहूनि परब्रह्मा सांवळा । वेधलें मान तमालनीळा । एका जनार्दनी पाहतां डोळा । वेधें वेधिलें सकळ ॥४॥
68 एक पांच सात मिळोनि खेळती विटिदांडु । डाव आलिया पळूणि जातां तया म्हणती गांडु ॥१॥ खेळों विटिदांडु खेळॊं विटिदांडु ॥धृ ॥ मुळींचा दांडुं हातीं धरुनि भावबळें खेळूं खेळा । भक्तिबळें टोला मारुं नभिऊं कळिकाळा ॥२॥ आपुली याची सांडोनि आस जावें गुरुसी शरण । काया वाचा मनें चरणींलोळे एका जनार्दन ॥३॥
69 एकमेका गौळणी करिती विचार । चोरी करी कान्हा नंदाचा कुमर ॥१॥ नायके वो बाई करुं गत काई । धरू जातां पळुन जातो न सांपडेचि बाई ॥२॥ दहीं दूध लोणी चोरी करुनियां खाये । पाहूं जातां कवाड जैसे तैसे आहे ॥३॥ एका जनार्दनी न कळें लाघव तयाचें । न कळेची ब्रह्मादिकां वेडावले साचें ॥४॥
70 एकी पुढें एक सांगतीं गार्‍हणीं । लिहितां पृथ्वीं न पुरेचि धूणी ॥१॥ म्हणे यशोदा कृष्णा काय हें कैसें । खोडी नको करुं हरि बोलतसे ॥२॥ मज नेती गृहांत दहा पांच मिळती । नग्न होऊनियां मज पुढें नाचती ॥३॥ म्हणती रे पोरा तु दिससी साना । हृदयी धरुनी करी देती स्तना ॥४॥ ऐसे यांचे तुज सांगु म्हनतां माते । एका जनार्दनी नवल वाटे तुंते ॥५॥
71 एकीबेकी पोरा सांग झडकरी । एकी जिंकीशी बेको म्हणतां हरी ॥धृ ॥ नव्हें काई बाई तेथें झालें एक शुन्य । त्यासी फाटां फुटतां मग लेखा आलें जाण ॥ एकी ॥१॥ एक दोनी तीन पांच विस्तारिला जाण । दहापासुनी सहस्त्रवरी एक झाली पुर्ण । एकी ॥२॥ एक ब्रह्मा पुर्ण तेथें फाट झाली माया । एका जनार्दनी नित्य लक्ष लावीं पायां ॥ एकी ॥ ३॥
72 एके दिनी नवल जालें । ऐकवें भावें वहिलें ॥१॥ घरीं असतां श्रीकृष्ण । योगीयाचें निजध्यान ॥२॥ नंद पूजेसी बैसला । देव जवळी बोलाविला ॥३॥ शाळीग्राम देखोनि । मुखांत घाली चक्रापाणी ॥४॥ नंद पाहे भोवतालें । एका जनार्दनी बोले ॥५॥
73 एके दिनीं प्रातः काळीं । कृष्णें घेतलीसे आळी । देखोनियां उदय मेळीं । सुर्यबिंब ॥१॥ देई देई मज तें आई । रडत बैसला हो बाई । काय सांगो हो सई । या बाळातें ॥२॥ मांडिलें विंदान । न कळे कोना महिमान । रडतां राहिना पुर्ण । तों देखे राधिका ॥३॥ राधा म्हणे कृष्णांसी । का रे चोरा रडतोसी । येरु म्हणे गोळा दे मजसी । मग मी न रडे ॥४॥ उचलोनी काखेसी घेतला । तंव तो रडतां राहिला । यशोदा म्हणे राधिकेला । नेई घरा कृष्णतें ॥५॥   घेऊनियां झडकरीं । घरी आली सत्वरीं । सुमनांचे सेजेवरी । पहुडविलें कृष्णा ॥६॥ घरी देखोनी एकांत । चुबन देउनि बोले माते । अससी धाकुटी बहुत । नचले कांहीं ॥७॥ तंव बोले वनमाळी । थोर होतो हेचि वेळी । डोळें झांकीं तूं वेल्हांळीं दावी विंदान ॥८॥ नेत्र झाकितां तें क्षणीं । जाहला निमासुर तरुणी । षोडश वर्षी मोक्षदानी । देखे राधिका ॥९॥ धांउनी घातालीसे मिठी । हरुष न समाये पोटीं । शयन सुखें गोष्टीं । करी कृष्णांसी ॥१०॥ असतां सुखें एकांतासी । भ्रतार आला ते समयासी । उभा राहुनि द्वारासी । हांक मारी ॥११॥ ऐकतां भ्रतारांचें वचन । घाबरलें राधिकेचें मन । धरी कृष्नाचे चरण । सान होई ॥१२॥ कृष्ण बोले हास्यमुखे । मंत्र विसरलों या सुखें । आतां होणार तें सुखें । होवो यावरी ॥१३॥ भक्तांचे मानसींचा चोर । पाहूनियां तो विचार । पुर्ववत साचार होऊनि रडे ॥१४॥ दहीं भात कालवुनी । ठेविला पुढें आणुनी । बोले आनयासी प्रती वचनीं । क्षणभरी बैसा ॥१५॥ जेवितसे कृष्णनाथ । क्षणभरी बैसा स्वस्थ । ऐकतांचि ऐशीअ मात । निवांत बैसे ॥१६॥ मग द्वार उघडिविलें । राया कृष्णातें देखिलें । मन तें मोहिलें । अनायांचें ॥१७॥ आनया बोले राधिकेसी । गृहीं नगमें तुजसी । क्षणभरी कृष्णासी । आणीत जाई ॥१८॥ तुमची आज्ञा प्रणाम । म्हणोनि वंदिले चरण । एका जनार्दनी समाधान । पावले दोघे ॥१९॥
74 एके दिवशी शारंगपाणी । खेळत असतां राजभुवनीं । तेव्हा देखिली नयनीं । गौळणी ते राधिका ॥१॥ मीस करुनी पाणीयाचें । राधा आली तेथें साचें । मुख पहावया कृष्णाचे । आवड मोठी ॥२॥ देव उचलोनि घेतला । चुंबन देउनि आलंगिला । सुख संतोष जाहला । राधेलागीं ॥३॥ यशोदा म्हणे राधिकेसी । क्षणभरी नेई गे कृष्णासी । कडे घेउनी वेगेंशीं आणिला घरा ॥४॥ हृदयमंचकीं बैसविला । एकांत समय देखिला । हळूच म्हणे कृष्णाला । लहान असशी ॥५॥ कृष्णा म्हणे राधिकेसी । मंत्र आहे मजपाशी । थोर होतो निश्चयेंसी । पाहें पा आतां ॥६॥ वैकुंठाचा मन मोहन । सर्व जगांचे जीवन । एका जनार्दनीं विंदान । लाघव दावीं ॥७॥
75 ऐक एक सखये बाई नवल;अ मी सांगुं काई । त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई ॥१॥ देवकीने वाईला यशोदेनें पाळिला । पांडवाचा बंदिजन होऊनियं राहिला ॥२॥ ब्रह्माडाची साठवन योगीयाचें निजधन । चोरी केली म्हणऊनी उखळासी बंधन ॥३॥ सकळ तीर्थें जया चरणीं सुलभ हा शूलपाणी । राधिकेसी म्हणे तुझी करीन वेणीफणी ॥४॥ शरण एका जनार्दनीं कैवल्याचा मोक्षदानीं । गाई गोप गोपीबाळां मेळवीले आपुलेपणीं ॥५॥
76 ऐकतां तो नाद मोहिलेसे मन । न कळे विंदान तिहीं लोकां ॥१॥ सावध हो उनी गडी ते पहाती । स्थिर पई होती यमुना ते ॥२॥ एकाजनार्दनीं ऐसा दासाचा कळवळा । म्हणोनि भक्तलळा पाळितसे ॥३॥
77 ऐकतां वचन कान्हया म्हणती गडी । काय खेळायाची आतां न धरुं गोडी ॥१॥ लावियेला चाळा त्वा जगजेठी । आतां आम्हां सांगसी तुं ऐशा गोष्टी ॥२॥ एका जनार्दनीं कान्होबा खेळ पुरे आतां । मांडु रे काला आवडी आनंता ॥३॥
78 ऐके ऐके बाई यशोदे । नवल केलें तुझ्या गोविंदे । आमुची मुलें तुडविली पदें । आतां यासी बांधीना ॥१॥ आवरीं आवरीं आपुला कान्हां । नाशियल्या आमुच्या सुना । अझुनि नये तुझ्या मना ॥ तुझा तुला गोड वाटे कान्हा ॥२॥ येतो आमुचे घरासी । धमकावितो लेकीसुनासी । कोठें लोणी सांग आम्हांसी । न सांगतां वासुरें सोडी बिदीसी ॥३॥ आपण खातो दहीं दुध लोणीं । हात पुसतो सुनेच्या मुखालागुनीं । एका जनर्दनी करी करणी । जातो पळोनि तेथोनी ॥४॥
79 ऐशीं निर्धारें विरहिण करी । परेपरता देखेन श्रीहरी । मन पवन साधन न करीं । संतसंग घडलिया धन्य संसारीं ॥१॥ धन्य धन्य संतमहिमा । विरह गेला पावलें सुखधामा ॥धृ॥ नामविरहित विरह तो कोण । विषय विरह थुंकीन मी जाण । नामांवांचुनी नेणें साधन । तो विरह न व्हावा पुर्ण ॥२॥ एका जनार्दनी सत्य वचन । विरहविरह गेला मुळीहून । नाम जपतां स्थिर झालें मन । विरह गेला त्यागुना ॥३॥
80 ऐसे नित्यकाळ जाताती वना । गोपाळ रामकृष्ण खेळती खेळ नाना ॥१॥ यमुनेचे तटीं कळंबा तळवटीं । मांडियला काला गोपाळांची दाटी ॥२॥ आणिती शिदोर्‍या आपाअपल्या । जया जैसा हेत तैशा त्या चांगल्या ॥३॥ शिळ्या विटक्या भाकरी दहीं भात लोणी । मिळेवोनी मेळा करी चक्रपाणी ॥४॥ एका जनार्दनीं अवघ्यां देतो कवळ । ठकविलें तेणें ब्रह्मादिक सकळ ॥५॥
81 ऐसे विश्रांतींचे स्थान । आणिके ठायीं नाहीं जाण ॥१॥ तें हें जाणा पंढरपुर । मुक्त मुमुक्षुचें माहेर ॥२॥ जगीं ऐसें स्थळ । नाहीं नाहीं हो निर्मळ ॥३॥ एका जनार्दनीं निकें । भूवैकुंठं नेटकें ॥४॥
82 ऐसें नानापरी सांगती गार्‍हाणे । ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ ॥१॥ पुनरपी संसार नवेची मागुती । शंख चक्र गदा पद्म ऐसे जन्म होती ॥२॥ एका जनार्दनी ऐकतां चोरीकर्म । कर्म आणि धर्म पावती विश्राम ॥३॥
83 ऐसें पंढरीचें स्थान । याहुनी आणिक आहे कोण ॥१॥ विष्णसहित कर्पूरगौर । जेथे उभे निरंतर ॥२॥ पुढें भीवरा शोभती । पुंडलिकांची वसती ॥३॥ ऐसें सांडोनी उत्तम स्थळ । कोठें वास करुं निर्मळ ॥४॥ म्हणे जनार्दनाचा एका । प्रेमळ संत नांदती देखा ॥५॥
84 कपटें पयपानसी । मोहें मोहनराशी । विषयी विष स्तनासी ।देवों आली ॥१॥ तंव तो सावध निजमुखीं । जिवासहित शोखी । सायुज्याच्या समसुखीं । समाधान बा ॥२॥ स्वरुपी घडोघडीं । म्हणें बापा सोंडीं । कृष्णमुखीं कुडी । सरती झाली बा ॥३॥ योगियां न कळे चित्तीं । सिद्धा दुर्लभ प्राप्ती । अंतीं कृष्णमुर्ती । हृदयावरी बा ॥४॥ पाजु आली विष । तियेसी परमसुख । कृष्णभजनीं दुःख । कवणा नाहीं बा ॥५॥ भक्ता परम प्राप्ती । द्वेषियां तेचि गती । एका जनार्दनीं प्रीति । वैरियां चार्‍हीं मुक्ति बा ॥६॥
85 कमळगभींचा पुतळा । पाहतां दिसे पूर्ण कळा । शशी लोपलासे निराळा । रुपवासही ॥१॥ वेधक वेधक नंदनंदनु । लाविला अंगीं चंदनु । पुराणपुरुष पंचाननु । सांवळां कृष्ण ॥२॥ उभे पुढे अक्रुर उद्धव । मिळाले सर्व भक्तराव । पाहाती मुखकमळभाव । नाठवे द्वैत ॥३॥ रुप साजिरें गोजिरें । दृष्टि पाहतां मन न पुरे । एका जनार्दनीं झुरे । चित्त तेथे सर्वदा ॥४॥
86 करुनियां काला सर्व आले गोकूळीं । गोपाळांसहित गाईवत्स सकळीं ॥१॥ वोवाळिती श्रीमुख कुर्वडी करिती । रामकृष्णातें सर्व वोवाळिती ॥२॥ जाहला जयजयकार आनंद सकळां । एका जनार्दनीं धणी पाहतां डोळां ॥३॥
87 करूं देईना मज दुध तुप बाई । मथितां दधि तो धरी रवीं ठायीं ठायीं । हट्टे का कदापि नुमजे समजाविल्यास काई । समजाउनी यातें तुझ्या घरांत नेई नेई ॥१॥ राधे हा मुकुंद कडिये उचलोनि घेइ घेई । रडतानां राहिना करुं यांस गत काई काई ॥धृ॥ हरिसी आनंदे राधा मृदु मृदु बोलवीते । पाळण्यांत तुला कृष्णा निजवोणी हालवितें । गुह्मा नेऊनियां दही भात कालवितें । यशोदेसी सोडीं कान्हा माझ्याजवळी येई येई ॥२॥ हट्ट मोठा घेतो मला छळितो गे राधे पाहाणें । असाच हा नित्य राधे हरि घरा नेता जाणें । उगाचि हा निश्चळ कैसा राहे त्वां समजावल्यानें । तुझी धरिते हनुवटी यासी गुहां नेई नेई ॥३॥ गोविंदा गोपाळा कृष्ना मुकुंदा शेषशाई । जगज्जीवना गोकुळभुषणा गोपी भुलवणा बाई । उगा नको रडुं कृष्णा यशोदेसी सोडीं तूंही । एका जनार्दनीं शरण राधे । घेऊन यासी जाई जाई ॥४॥
88 कशी जाऊं मी वृंदावन । मुरली वाजवी कान्हा ॥धृं॥ पैलतीरीं हरी वाजवीं मुरली । नदी भरली यमुना ॥१॥ कांसे पितांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥ काय करु बाई कोणाला सांगुं । नामाची सांगड आणा ॥३॥ नंदाच्या हरीने कौतुक केलें । जाणे अंतरीच्या खुणा ॥४॥ एका जनार्दनी मनीं म्हणा । देवा महात्म्य कळेना कोणा ॥५॥
89 कसा मला टाकुनी गेला राम ॥धृ॥ रामविणा जीव व्याकुळ होतो । सुचत नाही काम ॥१॥ रामविण मज चैन पडेना । नाही जीवासी आराम ॥२॥ एका जनार्दनी पाहुनीं डोळा । स्वरुप तुझे घनःश्याम ॥३॥
90 काकुलते गोपाळ म्हणती रे कान्हया । गाई न येती माघारी कोन बळी कासया ॥१॥ आमुची खुंटली गति आवरीं तुं हरी । तुजवांचुनी कोण रेखा आमुचा कैवारी ॥२॥ नको वेरझारा पुरे आतां हरी । एका जनार्दनीं ऐशी करुणा करी ॥३॥
91 कान्होबा खेळ खेळू रानीं । तुम्हीं आम्हीं दोघे मिळोनी ॥१॥ हमामा रे भाई हमामा ॥धृ॥ हमामा घाली मत्स्य अवतारी । शंखासुरा धरुनी मारी ॥२॥ हमामा घाली समुद्रतीरीं । धरुनी पर्वत पाठीवरी ॥३॥ हमामा घाली नानापरी । पृथ्वी धरुनी दाढेवरी ॥४॥ हमामा घाली हिरण्य कश्यपाघरीं । प्रगटुनी स्तंभामाझारीं ॥५॥ हमामा घाली बळीचे द्वारीं । आपण होऊनि भिकारी ॥६॥ हमामा घाली परशु हातीं । निःक्षात्री पृथ्वी केली जगतीं ॥७॥ हमामा घाली लंकेवर । केला बिभीषण राज्यधर ॥८॥ हमामा घाली नंदाघरीम । गोपाळ नाचती गजरीं ॥९॥ हमामा घाली भीमातटीं । उभाचि धरुनि कर कटीं ॥१०॥ एका जनार्दनी खेळ । नानापरीचा आकळ ॥११॥
92 कान्होबा सांभाळी आपुली गोधनें तुझ्या भिडेनें कांहीं न म्हणे ॥१॥ तुं बैसासी कळंबाखाली । वळती देतां आमुचे पाय गेली ॥२॥ तुझीं गोधनें बा अचाट । धांवती देखोनी विषय हिरवट ॥३॥ तूं बैसोनी करिसी काला । आमुच्या शिदोर्‍या करुनी गोळा ॥४॥ खातोसी दहीं भाताचा गोळा । आम्हाकदे न पहासी उचलोनी डोळा ॥५॥ वेधिलें आमुचे जीवपण । ठकविलें आम्हाकारण ॥६॥ एका जनार्दनीं परमानंद । आम्ही भुललों तुज गोविंदा ॥७॥
93 काम क्रोध वैरी हे खळ । लोभ अहंकार आशा बरळ । कर्म बळीवंत लागलें सबळ । तेणें वेधिलें आमुतें निखळ ॥१॥ नको नको वियोग हरी । येई येई तूं झडकरी । आम्हा भेटें नको धरुं दुरी । वियोग झाला तो आवरीं ॥२॥ तुझिया भेटिंचे आर्त मनीं । याकारणें विरह बोलणें वाणी । एका शरण जनार्दनीं । वियोग गेला पाहतां समचरणीं ॥३॥
94 काय याचें बोलें तुज वाटतसे कोडे बोलते सांवळा अवघे वितंड ॥१॥ पुरें तुझें गाव नको आतां वस्ती । आम्हीं जाऊं सर्व मिळुनि मथुरेप्रती ॥२॥ नाहीं तसे बोल बोलतसे वायां । एका जनार्दनीं हा तुझा कान्हया ॥३॥
95 काय सांगू यशोदेबाई । आम्ही घरांत बैसलों पाहीं । कृष्ण आला लवलाही । म्हणे मज भूक लागली ॥१॥ ऐसा लाघवी हा हरी । खोडी करी नानापरी । धारितां न धरवे निर्धारीं । जातों पळुनिया दुरी ॥२॥ माझी सुन एकली घरीं । नाहात होती परसद्वारीं । आपण येउनि झडकरी । उभा पुढें राहिला ॥३॥ तवं ती म्हणे का आलासी । कृष्ण म्हणे तूं परियेसी । मी खेळत होतों बिदीसीं । चेंडु उडोनियां आला ॥४॥ तंव ती म्हणे पाहे कृष्णा । क्रियाहीन नष्ट तूं कान्हां । घाली मिठी धरी स्तना । कां गे चेंडू देईना ॥५॥ तव ती म्हणे परतां सर । कृष्ण म्हणे दे चेंडूं सत्वर । एका जनार्दनीं निर्धार । परा भक्ति हे साचार ॥६॥
96 काळी घोंगडी हातीं काठी । लागला धेनुंचे पाठी ॥१॥ अरे हरी व्रज वांकुंडा कीं तुजसाठीं । बैसला यमुनेचे तटीं ॥२॥ राधा गोरटीं हातीं वाटी । लागली कृष्णाचे पाठी ॥३॥ एका जनार्दनीं झाली दाटी । घातली पायांवर मिठी ॥४॥
97 काळे गोरे एकापुढें एक । धांवताती बिदो बिदीं देख । अलक्ष लक्ष्या नये सम्यक । तो नंदनंदन त्रिभुवननायक गे माय ॥१॥ गाईवत्स नेताती वनां । गोपाळ म्हणती अरे कान्हा । जो नये वेदा अनुमाना । ज्यासी चतुरानन ध्यानीं ध्यातसे ॥२॥ जें योगिजनांचे ध्येय ध्यान । ज्याकरणें अष्टांग योगसाधन । तयांसि नोहे कधीं दृश्यमान । तो गौळ्यांचें उच्छिष्ट खाय जाण गे माय ॥३॥ एका जनार्दनीं व्यापक । सर्वां ठायीं समसमान देख । अरिमित्रां देणें ज्यांचे एक । तो हा नायक वैकुठींचा ॥४॥
98 काळ्या कांबळ्याची घडी । घालिताती सवंगडी बैसवुनि हरी । कवळ घेती ॥१॥ कृष्ण अपुलेनी हातें । कवळ घाली गडियातें । तयांचीं उच्छिष्ट शितें । घालितसे मुखीं ॥२॥ मुखामाजीं कवळ । सवंगडे घालिउती सकळ । वैकुंठीचा पाळ । ब्रह्मानंदें डुल्लत ॥३॥ तृप्त झाला जनार्दन । एका वंदीतसे चरण । काया वाचा मन । खुन भक्त जाणती ॥४॥
99 कृष्ण आला परिसुनी मथुरे नारी । चपळा धांवती अति सुंदरी । एकी त्या कवळ करीं । एकीं त्या आलिया मार्जन शिरीं ॥१॥ अरे कृष्णा अरे कान्हा मनमोहना । गोपिका भाळल्या तुझिया गुणा । जय जय मानस मनमोहना । जीवीं जीवें गुंतल्या नंदनंदना ॥२॥ कृष्णदृष्टी पहावया प्राणपिसा । एकी त्या आलिया मुक्तकेशां । एकी त्या आलिया विगुंतवासा । देह गेह नाठवे कृष्णमानसा ॥३॥ कृष्णदृष्टी पहावया वेगु कामिनी । अस्ताव्यस्त इंद्रिया बाणलीं लेणीं । एकी त्या आलिया कर्म सांडोनी बाणलीं लेणीं । तत्नुमन वेधला सांगपणी ॥४॥ एकी त्या काजळ सुदल्या मुखीं । जावड कुंकम लाविती नाकीं । तांबुल विडीया खोविती मस्ताकीं । कृष्णदृष्टी इंद्रिया नाहीं वोळखी ॥५॥ एकी त्या तानवडे लेइल्या पायीं । पायींची पोल्हारे कानीं वो बाई । वाळे वाक्या बांधिल्या कंठाचे ठायीं । लाहे लाहे नेपुरें बांधिली डोई ॥६॥ एकी त्या आलिया चोखणा शिरीं । नागवें शरीर नेणें सुंदरीं । मोतियाचे हार नेसल्या नारीं । पाटाउ विसरल्या घरच्या घरीं ॥७॥ एकी त्या अर्धांगी लेईल्या चोळी । गुढरिया बांधिली मोतिया जाळी । नाकींचे मुक्ताफळ खोविती भाळीं । देह गेह नाठवें कृष्ण स्नेहाळी ॥८॥ एकी त्या कडिये घेतिल्या झारी । बाळकें विसरल्या घरींच्याघरीं । दृष्टीं सम दृश्या न दिसे नारी । पुत्र स्नेहें नाठवे देखोनि हरी ॥९॥ रंगी रंगल्या आल्हादें भारी । आपपर नाठवे तया सुंदरी । एका जनार्दनीं वेधल्या नारी । परतोनी संसारा नुरेची उरी ॥१०॥
100 कृष्ण देखतांचि गेलें । शेखीं बुडविली महिमान ॥१॥ भली नव्हें हे कृष्णगती । सखे पळविलें सांगाती ॥२॥ मायेचा करविला बंदु । शमशमादि पळविलें बंधु ॥३॥ द्रष्टा दृश्य आदि दर्शन । तिन्हीं सांडिलें पुसुन ॥४॥ ब्रह्माहमास्मि शुद्ध जाण । तेथील शून्य केला अभिमान ॥५॥ एका जनार्दनाची प्राप्ती । ज्ञान अज्ञान हारपती ॥६॥
101 कृष्णमूर्ती होय गे काळी आली सोयं गे । प्राणाचाही प्राण पाहतां सुख सांगुं काय गे ॥१॥ तुळशी माळ गळां गे कस्तुरीचा टिळा गे । आर्धांगी रुक्मिणी विंझणे वरित गोपी बाळा गे ॥२॥ पीतांबराची कास गे कसिली सावकाश गे । नारद तुंबर गायन करती पुढें निजदास गें ॥३॥ भक्त कृपेची माय गे वोळखिली विठाई गे । एका जनार्दनीं विटे जोदियेले पाय गे ॥४॥
102 कृष्णा कैशी खेळूं लपंडाई । अनंत लोचन तुझे पाही । तेथें लपावें कवणे ठायीं । तुझें देखणे लागलें पाहीं ॥१॥   कान्होबा पाववी आपुल्या खुणा ॥धृ॥ लपुं ममतेच्या पोटीं । जेथेंतेथें तुझीच दृष्टी । तेथें लपायाची काय गोष्टी । तुझे देखणें लागलें पाठीं ॥२॥ लपुं गिरीं कपाटीं कडवसा । जेथें तेथें तुझाचि ठसा । एका जनार्दनी सरिसा । तेणें मोडली खेळायाची आशा ॥३॥
103 कृष्णारुपीं भाळल्या गोपिका नारी । नित्य नवा कृष्ण जीवा आवडतो भारी । पवन वेगीं चालिल्या कालिंदीतीरीं । चिदानंद भावें भोगावा श्रीहरीं ॥१॥ वाजती गाजती अनुहत टिपरी । बारा सोळा मिळोनी गौळ्याच्या नारी । प्रातः काळी जाती यमुनातीरीं । कृष्णप्राप्तिलागीं पूजिती गौरी ॥२॥ एकमेकींतें खुणाविती दृष्टी । हरिरुपीं आवड जीवा लागली मोठी । समयीं एकांत होईल काय भेटी । मनींचे आर्त सांगुं गुज गोष्टी ॥३॥ कृष्नारुपीं वेधल्या विसरल्या अन्नपान । माया विलास नेघे अंजन चंदन । रात्र आणि दिवस कृष्नाचें ध्यान । एका जनार्दनीं चरणी वेधलें मन ॥४॥
104 कृष्णाला भुलविलें गोपीने ॥धृ॥ यशोदे तुझा हा कान्हा राहीना । मी मारीन क्रोधाने ॥१॥ नंदजी तुमचा कृष्ण लाडका हाका मरितो मोठ्यानें ॥२॥ वेताटी घेउनी नावेंत बैसला । वांचविले देवानें ॥३॥ एका जनार्दनी पूर्ण कृपेनें । नाहीं ऐकिलें मातेनें ॥४॥
105 कृष्णालाजे ती राधिका राहे घरी । जीवनालागीं जिवें जीव भरी । कृष्णदृष्टी तो माझी नुरे उरी । यमुने जातां सन्मुख देखे हरी ॥१॥ कृष्ण पावलावो हरी पावलावो ॥धृ॥ एकाएकी एक हा एकटु । माझ्या संसारा झाला शेवटु । मी पतिव्रता तो झोंबतो आलगटु । आपपर नाहीं तुं होसी क्रियानष्टु ॥२॥ दृश्य न दिसे तंव जाली दुपारी । रळीया वासना ते वास फेडी हरी । सुटली लिंग देह गाठी अभ्यंतरीं । सर सर निर्लज्जा मी परात्परा नारी वो ॥३॥ कृष्णा मागे मागे ते माया आली जाणा । पुसे यशोदा बा काय जालें कान्हा येऊ । स्फुंदस्फुंदे करितो रुदना । भावचेंडु चोरिला गोपांगंना वो ॥४॥ गोपी म्हणती हा कर्मनष्ट कुडा । क्रिया प्रमाणेंसी बोल याचा खुडा । हा बोलतसे अवाडीच्या चाडा । कृष्ण म्हणे तु माग इसी झाडा वो ॥५॥ वासना वास तें फेडी प्रमदा । भाव चेंडुवातें तंव देखें यशोदा । हरी कृष्ण येरु हांसे खदाखदां । स्वेदु रोमांचित वरी कांपत गदागदां वो ॥६॥ नष्ट गवळणी विजन व्यभिचारी । परा रातली या निर्लज्ज निर्धारी । दैवें आलीये मा चुकली कुमरी ॥७॥ कृष्णें लाधव तें कैसें केलें पाहें । गोपी उपरमोनि पाठिमोरी राहे । माथा वंदीतसे कान्हयाचे पाय । एका जनार्दनीं दोष नाहीं वो माय ॥८॥
106 कोण्या वियोगे गुंतला कवर्णे हातीं । परा पश्यंती मध्यमा जया धाती । श्रुति शास्त्र जया भांडती । तो कां हो रुसला श्रीपती ॥१॥ येई येई कान्हा देई आलिंगन । भेटी देऊनि पुरवीं मनोरथ पुर्ण । विरहाविरहा करी समाधान । दावी तु आपुले चरण ॥२॥ येथें अपराध आमुचा नाहीं । खेळ सर्व तुझा पाहीम । एका जनार्दनी नवल काई । एकदां येउनी भेटी देई ॥३॥
107 खांद्यावरे कांबळी हातामधीं काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी ॥१॥ राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी । वाजवितो वेणु कान्हा श्रीहरी ॥२॥ एका एक गौळनी एकएक गोपाळा । हातीं धरुनि नाचती रासमंडळा ॥३॥ एका जनार्दनी रासमडळ रचिलें । जिकडे पाहे तिकडे अवघें ब्रह्मा कोंदलें ॥४॥
108 खेळ खेळुं सुरकवडी । कान्होबा उगाचि पाहे गोडी ॥१॥ एकीबेकी पोरा खेळ भला बेकी । साडुनि एकीबेकी धरितां शेवटीं होईल फुकी ॥२॥ एका दोन तीन चार पांच सहाच्या पडो नको डाई । सहास्त्र लक्ष कोट गेले उगाचि शीण पाहीं ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे कान्होबा वाउगा नको गोऊं । जेणे करुनी संसार खेळ तुटोन लक्ष तुझें पायीं लाऊं ॥४॥
109 खेळ मांडिला लगोरी । खेळताती नानापरी । चेंडु घेउनि अपुलें करीं । खेळताती एकमेक ॥१॥ देती आपुलाला डाव । ज्याचा जैसा आहे भाव । तोचि जिंकीतसे वैभव । आणिक पहाती उगे वाव ॥२॥ बरोबर करुं गडी । नाहीं विषमता जोडी । चेंडु हाणती तांतडी । येती हरिया बैसती गडी ॥३॥ एका जनार्दनी कान्होबा भला । खेळा गोविलें कीं सकळां । आपण असेचि निराळा । नवल कळा पाहे डोळा ॥४॥
110 खेळ मांडिला वो खेळ मांडिला वो । या संसाराचा खेळ मांडिला वो ॥१॥ पंचप्राणांचे गडी वाटिले । तेथें जीवशिव नाम ठेविलें वो ॥२॥ एका जनार्दनी खेळ मांडिला । शाहाणा तो येथें नाही गुंतला वो ॥३॥
111 खेळतसे खेळ सवंगडियांसहित । गोपिकांचे हेत पुरवितसे ॥१॥ जयाचिये चित्तीं जे कांही वासना । तेचि नारायण पुरविणें ॥२॥ जया जैसा हेत पुरवीं तयांचा । विकला काया वाचा भाविकांचा ॥३॥ एका जनार्दनी भाविकांच्या पाठीं । धावें जगजेठी वनोवनीं ॥४॥
112 खेळतसे खेळ सवंगडियांसहित । गोपिकांचे हेत पुरवितसे ॥१॥ जयाचिये चित्तीं जे कांही वासना । तेचि नारायण पुरविणें ॥२॥ जया जैसा हेत पुरवीं तयांचा । विकला काया वाचा भाविकांचा ॥३॥ एका जनार्दनी भाविकांच्या पाठीं । धावें जगजेठी वनोवनीं ॥४॥
113 खेळतां सांवळा गडियांसी म्हणे । खेळ तो पुरे गाई जमा करणें ॥१॥ आपुलाल्या आपण वळाव्या गाई । नवल तो तेणें खेळ सांडावया भाई ॥२॥ धांवती संवगडी पाठोंपाठ लवलाह्मा । गुंतल्या त्या गाई वळती न येती वळाया ॥३॥ येवोनि दीन मुख करिती हरिपुढें । एका जनार्दनीं तया पाहतां प्रेम चढें ॥४॥
114 खेळसी टिपर्‍या घाईं रे । वाचे हरिनाम गाई रे । टिपरीस टिपरी चुकुं जातां भाई । पडसी यमाच्या घाई रे ॥१॥   सहा चार अठरा गड्यांचा मेळा रे । टिपरीयांचा खेळ खेळा रे । एका खेळा दोन्हीं गुतला । यमाजी घालीला डोळा रे ॥२॥ वायं खेळ खेळतीसी बाळा रे । सावध होई पाहें डोला रे । एक एका जनार्दनी शरण जातां । चुकशील कळिकाळारे ॥३॥
115 खेळसी तुं लीळा । तुझी अनुपम्य काळा ।१॥ बारवा बरवा श्रीमुकुंद । गाई गोपाळी लावला वेध ॥२॥ खेळसी बाळपनीं । बांधीताती तुज गौळणी ॥३॥ ऐसा नाटकी हरी । उभा ठेला विटेवरीं ॥४॥ विटे उभा समचरणीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥
116 खेळे कान्हा यमुनेचे तटीं । राखितो गोधनें घेउनी हातीं काठी ॥१॥ पांघुरला घोंगडें रत्नजडित गे माये । नंदरायाचा खिल्लारी तो होय ॥२॥ गोप गोंधनें सवंगडे नानापरी । दहींभात काला वांटितो शिदोरी ॥३॥ एका जनार्दनीं खेळे नानापरी । वेधोनि नेलें मन नाठवे निर्धारी ॥४॥
117 खेळें भोवरां गेबाई भोंवरां । राधिकेचा नवरा ॥धृ॥ माझ्या भोंवर्‍यांची अरी । सप्त पाताळें त्यावरी । फिरे गरगरां । राधिकेचा नवरा ॥ खेळे॥१॥ भोवरां बनला र्निगुणीं । त्यावर चंद्र सुर्य दोनी । जाळीं शंकर गवरा । राधिकेचा नवरा ॥ खेळे०॥२॥ एका जनार्दनीं खेळिया । भोवरां खेळुन पाहे चेलिया । नाद देतो हरिहरा । राधिअकेचा नवरा ॥ खेळे॥३॥
118 गंगा सागरादि तीर्थे भूमीवरी । परि पंढारीची सरी न पवती ॥१॥ श्रेष्ठांमांजी श्रेष्ठ तीर्थ पं समर्थ । दरुशनें मनोरथ पूर्ण होती ॥२॥ ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक । ऐसे वैष्णव देखे नाही कोठें ॥३॥ गाताती वैष्णव आनंदें नाचती । सदोदित कीर्ति विठ्ठलाची ॥४॥ एका जनार्दनीं पंढरीचा हाट । भूवैकुंठ पेठ पंढरी देखा ॥५॥
119 गडियांचे उत्तर ऐकोनी सांवळा वेधियलें मन तटस्थ सकळां ॥१॥ घेउनी मोहरीं गाई पाचारी सकळां । नवल तें जाहलें गोपाळा सकळां ॥२॥ नको वेरझारा पुरे आतां हरी । एका जनार्दनीं ऐशी करुना करी ॥३॥ एका जनार्दनी विश्वांचा निवासी । गाई आणि गोपाळां वेधिला सर्वासी ॥४॥
120 गडियासी सांगे वैकुंठीचा राव । आजीं आला भेवो यमुनेंत ॥१॥ जीवनालागीं तेथें कोण्ही पै न जावें । बाऊ आला आहे तया ठायीं ॥२॥ तयांचे बालेणें लागे सर्वा गोड । म्हणोनि धरिती चाड संवगडे ॥३॥ एका जनार्दनींऐकोनि वचन । पढती वचन पेंदा बोले ॥४॥
121 गडी मिळाले सकळ । यमुनेतटीं खेळ खेळती ॥१॥ धांवती ते सैरावैरा । खेळ बरा म्हणती ॥२॥ विसरलें तहान भुक । देखोनी कौतुक खेळांचे ॥३॥ भुललें संवगडी देखोनी । एका जनार्दनीं म्हणतसे ॥४॥
122 गडी म्हणती सकळ । कृष्णा तुं घेई कवळ । हरी म्हणे उतावीळ । घ्यावा तुम्हीं ॥१॥ गडी नायकती सर्वथा । हरी म्हणे मी नेहे आतां । म्हणोनी रुदोनी तत्त्वतां । चालिला कृष्ण ॥२॥ कृष्णा नको जाऊं जाण । तुझें ऐकूं वचन । म्हणोनि संबोखुन ।आणिला कृष्ण ॥३॥ एका जनार्दनीं । लाघव दावी चक्रपाणी । भक्ता वाढवुनीं । महिमा वदवी ॥४॥
123 गाई गोपांसमवेत गोकुळिंहुन आला । पाहुनि भक्तिं भुलला वैष्णवाला ॥१॥ मुगुटमनी धन्य पंडलिक नेका । तयालागीं देखा उभा गे माय ॥२॥ युगें अठ्ठावीस जालीं परी न बैसे खालीं । मर्यादा धरली प्रेमाची गे माय ॥३॥ ऐसा व्यापक जगाचा जीवन । एका जनार्दनीं शरण गे माय ॥४॥
124 गाई चारी कान्होबा । गोपाळ सांगाती उभा । अनुपम्य त्याची शोभा । नाचती प्रेमानंदें । गाताती भोगिता छंदे । मन वेधिलें परमानंदें रे कान्होबा ॥१॥ भला कान्होबा भला । भला कान्होबा भला ॥धृ॥ गौळियांची आंधळीं पोरें । गाईपाठीं धांवतीं सैरें । हरि म्हणे रहा स्थिरें । तुमची आमची बोली । पहिलीच आहे नेमिली । त्वा बरीच ओळखी धरली रे कान्होबा ॥२॥ तुझीं संगती खोटी । आम्हां धाडिसी गाईचे पाठीं । तुं बैससी जगजेठी । तिझें काय केलें आम्हीं । तुं जगाचा हा स्वामी । तुझा महिमा आगमनिगमीं । काहीं न कळे रे कान्होबा ॥३॥ माझी गाय आहे दुधाची । तुला सांपडली फुकाची । मला चोरी काय लोकांची । कां पडलासी आमुचे डायीं । भिन्न भेद नाहीं । एक जनार्दनीं मन पायी रे कान्होबा ॥४॥
125 गाई राखतां दिससी साना । तैं म्हणों यशादेचा कान्हा ॥ आतां न मानिसी अवघ्या गगना ।तुं ना कळसी ध्यानामना रे कान्होबा ॥१॥ कान्होबा आमुचा सखा होसी । शेखीं नीच नवा दिससा रे कान्होबा ॥धृ॥ गाई राखितां लागली संवे । तैं जेऊं आम्हीं तुजसवें । तुं मिटक्या मारिसी लाघवें । तुझीं करणी ऐशी होये ॥२॥ धांगडतुतु खेळुं सुरक्या । डायीं आलीया मारुं बुक्या । आतां महिमा ये देख्या । काय कीर्ति वर्णावी सख्या ॥३॥ तूं ठायींचा खादाड होसी । तुं शोकिली बा मावसी । आतां माया गिळुं पाहासी । उबगलों तुझ्या बा पोटासी ॥४॥ तुज लक्षिता पारुषे ध्यान । ध्यातां ध्येय हारपलं मन । एका अवलोकीं जनार्दन । तुझें हुंबलीनें समाधान रे कान्होबा ॥५॥
126 गुडघेमेटाइ बैसले तोंडी खरस आलें । ते असे देखिले रामकृष्णें ॥१॥ मोहरी काढोनि लावियली मुखा । नांदे तिहीं लोकां मोहियलें ॥२॥ तयांमध्ये म्हणे गडे हो ऐका । पळालीसे देखा भिउनी तुम्हां ॥३॥ मोहियलें मन सर्वांचे भावें । एका जनार्दनीं देवें नवल केलें ॥४॥
127 गोकुंळींचा कान्हा अवतरला तान्हा । प्रथम पूतना शोषियेली ॥१॥ जन्मला वोखट घालुं आला वीट । पिढें महाबळभट पिटविला ॥२॥ वारा वाजे थोर सुटला आवर्तु । कृष्णें तृणावर्तु मर्दियेला ॥३॥ पाय होनोनिया मोडिला शकटु । कृष्ण अलगटु देवकीचा ॥४॥ मृतिका खादली वरितां पै देख । उदरीं तिन्हीं लोक दाखविलें ॥५॥ दहीं दुध चोरी आली बा मुरारी । माया दावें वरी बांधितसे ॥६॥ नऊ लक्ष गोप न पुरती उदरा । माया दामोदरा बांधितसे ॥७॥ दावा दामोदरु बांधिला मायेनें विमलार्जुन दोन्ही उद्धरिलें ॥८॥ वत्साचोनि रुपें आला पै असुर । झाडीं वत्सासुर झाडियेला ॥९॥ ध्यानस्थाचें परी बैसलासे तीरीं । बका दोन्हीं चिरी केल्या कृष्णें ॥१०॥ चेंडु वाचे मिसें नाथिला काळिया । फणीरंगी कान्हया नृत्य करी ॥११॥ इंद्रा मान हरी गोवर्धन करीं । धरोनि श्रीहरी व्रज राखे ॥१२॥ ताडाफळासाठीं धेनुक उठिला । कृष्णें निवटिला क्षणमात्रें ॥१३॥ वणवा गिळिला राखिलें गोपाळ । संतोषे सकळ नाचताती ॥१४॥ गोपाळ वासुरें अघासुर गिळी । कृष्णें दोन्हीं केली पहिल्या ऐसी ॥१५॥ वत्स वत्सपाळ नेले सत्य लोकां । अवघीं कृष्ण देखा होऊनि ठेला ॥१६॥ वळितं गोधनें गोपाळांशी खेळे । पाहतां निवतीं डोळे गोपिकांचे ॥१७॥ शरदऋतु शोभा शोभली रजनी । कृष्ण वृंदावनीं वेणु वाहे ॥१८॥ वेणुनादध्वनी वेधिल्या कामिनी । कृष्णादीपें हरिणी दीपियेल्या ॥१९॥ गोपीप्रती गोपी कृष्ण एक एकु । सहस्त्रघटीं अर्कू नसोनि दिसे ॥२०॥ वेणुनाद ध्वनि वेधिल्या गोपिका । रंगी त्या मायिका नाचविय्ल्या ॥२१॥ अरिष्टा अरिष्ट झाला कृष्णनाथु । केशिया आघातु केला तेणें ॥२२॥ गोकुळीं दैत्यासी केला आडदरा । थोर कंसासुर धाक पडे ॥२३॥ गोकुळा अक्रुर पाठविला रांगे । म्हणे आणी वेगें रामकृष्णा ॥२४॥ भाग्य भाव माझा कंसाचिया काजा । वैकुंठीचा राजा देखेन आजीं ॥२५॥ गाईचे रे खुर विष्णुपदांकित । पृथ्वी शोभत अक्रुर देखे ॥२६॥ ध्वजवज्राकुम्श कुंकुमांकित पदें । अक्रुर आनंदें डोलतसे ॥२७॥ तृणतरुवरां घाली लोटांगण । पुढती कृष्णचरण कैं देखेन ॥२८॥ पावला गोकूळां तंव वैकुंठ थोकडें । व्रज तेणें पांडे कृष्णमुखें ॥२९॥ देखोनियां कृष्ण विसरलां आपणां । आक्रुर श्रीकृष्ण चरणीं लोळे ॥३०॥ जाणोनि त्याचा भावो वेगीं निघे देवो । चला मथुरा पाहों आजीं आम्हीं ॥३१॥ व्रजीच्या अंगना करिताती रुदना । मागुता कैं कान्हा देखो आतां ॥३२॥ रथारुढ हरी पाहाती नरनारी । यमुना परतीरीं उतरले ॥३३॥ मारुनी रजक घेतलीं लुगडीं । गोपाळ आवडीं श्रृंगारिले ॥३४॥ पाटाउ परिकर नेसले पितांबर । कासे मनोहर नाना मेचु ॥३५॥ अक्रुरें जाउनी कंसा जाणविलें । मथुरेसी आले रामकृष्ण ॥३६॥ ऐसें ऐकोनि कंस दचकला मनीं । सर्व रुप नयनीं कृष्ण देखे ॥३७॥ चंदन कचोळी भेटली कुब्जा । वैकुंठीचा राज चर्चियेला ॥३८॥ कुब्जा म्हणे हरी चला माझे घरीं । सुमनेंही वरी श्रुंगारिली ॥३९॥ हातीं धरोनी बरी ते केली साजिरी । कंस भेटीवरी येईन घरां ॥४०॥ माळीयें सुमनें श्रृंगारिला हरी । वैकुंठ पायरीं केली तया ॥४१॥ मुक्त मुमुक्ष विषयीं हे लोक । पाहाती कौतुक कृष्णलीला ॥४२॥ मथुरे चोहाटाचा चालिला राजवाटा । टाकिला दारवंटा धनुर्याग ॥४३॥ तेथें अतिबळें कुवलया उन्मत्त । पेली महावुत कृष्णावरी ॥४४॥ त्यासी हाणोनिया लात उपडिलें दोन्हीं दांत । घायें महावत मुक्त केलें ॥४५॥ यागीचें कादडें केलें दुखंड । बळी ते प्रचंड रामकृष्ण ॥४६॥ घेऊनि गजदंत पावले त्वरित । मारिले अमित वीर कृष्णें ॥४७॥ न धरत पैं वेगीं आला मल्लरंगीं । कंस तो तवकेकें चाकाटला ॥४८॥ माल मल्लखडा करीतसे रगडा । कृष्ण तो निधडा एकपणें ॥४९॥ मुष्टीकचाणुर घायें केला घातु । कोपला अंनतु कंस पाहें ॥५०॥ चाणुर मुष्टिक हातें निवटिलें । दैत्य धुमसिलें अनुक्रमें ॥५१॥ रणरगडा अशुद्धचा सडा । कृष्ण कंसा कडा उठावला ॥५२॥ न लगतां घायें धाकें सांडी देहो । मथुरे केला रावो उग्रसेन ॥५३॥ सोडिलीं पितरें तोडिलें बंधनें । एका जनार्दने मुक्त केली ॥५४॥
128 गोकुळामाजी कृष्णें नवल केलें । स्त्री आनि भ्रतारा विंदान दाविलें ॥१॥ खेळ मांडिला हो खेळ मांडिला । न कळे ब्रह्मादिकां अगम्य त्याची लीळां वो ॥२॥ एके दिनीं गृहा गेले चक्रपाणी । बैसोनी ओसरी पाहे पाळतोनी लोनी ॥३॥ गौळणी आली घरां म्हणे शारंगपाणी । चोरीचे विंदान पाळती पाहसी मनीं ॥४॥ चोरी करावया जरी येसी सदनीं । कृष्णा धरुनी तुझी शेंडी बांधीन खांबालागुनी ॥५॥ एका जनार्दनीं ऐसे बोले व्रजबाळी । दाविलेंअ लाघव ब्रह्मादिकां न कळे ते काळीं ॥६॥
129 गोकुळी गोपाळसवें खेळतसे देव । ऐक प्रेमभाव तयांचा तो ॥१॥ गोधनें राखणें उच्छिष्ट खादणें । कालाहि करणे यमुनेतीरी ॥२॥ सवंगडियांचे मेळी खेले वनमाळी । घोंगडी ते काळी हातीं काठी ॥३॥ त्रैलोक्यांच्या धनीं वाजवी मुरली । भुलवी गौळणी प्रेमभावें ॥४॥ घरोघरीं चोरी करितो आदरें । एका जनार्दनीं पुरे इच्छा त्यांची ॥५॥
130 गोकुळीं आनंद जाहला । रामकृष्ण घरा आला । नंदाच्या दैवाला । दैव आलें अकस्मात ॥१॥ श्रावण वद्य अष्टमीसीं । रोहिणी नक्षत्र ते दिवशी । बुधवार परियेसी । कृष्णमूर्ति प्रगटलीं ॥२॥ आनंद ब समाये त्रिभुवनी । धांवताती त्या गौळणी । वाण भरुनी नंदराणी । सदनाप्रती ॥३॥ एका जनार्दनी अकळ । न कळे ज्याचें लाघव सकळ तया म्हणती बाळ जो म्हणती बाळ । हालविती ॥४॥
131 गोकुळीं गोमाई गवळणी । तिच्या सुना चवघी जणीं । यमुने गेल्या एके दिनीं । त्यांनी कृष्ण पहिला ॥१॥ कृष्णा पाहतां मधुसूदन । मोहिलें चवघीचें मन । कृष्ण कृष्ण लागलें ध्यान । देहभान विसरल्या ॥२॥ सर्वें एके होती शेजारीण । आली सदनासी धांवुन । गोमाईसी वर्तमान । अवघे विदित केलें ॥३॥ राखी लपवी आपुल्या सुना । सुनेचें नख दृष्टी पडुं देइना । जर कां येशील माझे सदना नासिका चुना तीन बोटें ॥४॥ कृष्ण काय म्हणे तिसीं । येणें जाणें नाहीं आम्हांसी । जें कां वदली रमनेसे । तिची प्राप्ती तुजलागीं ॥५॥ देव ब्राह्मणीचा वेष । धरिता जाला जगन्निवासा । हा रस ऐकतां सायास । मुढ जन उद्धरती ॥६॥ पांढर्‍या पातलाची कासोटी । जीर्ण चीर वेष्टिलें कंठीं । हाता घेउनी धाकुटी । काठी धरुनी चालिली ॥७॥ वार्‍यासारखी चाचरी जाये । तोल सांभाळुनी उभी राहे । अवसान धरुनिया पाहें । गोमाइनें देखिली ॥८॥ गोमाई म्हणे अहो ब्राह्मणि । कोठें जातेस आसीस कोठुनी । आशापाश नाहीं कोणी । माझी मीच ऐकली ॥९॥ करुनी आले वाराणाशी । पुढें जाणें रामेश्वरासी । आणिक जाणे बहु तीर्थासे । ऐसी गोमाईसी बोलली ॥१०॥ येवढ्या नगरामध्ये कोणी । दयाळु नाहीं तुजावांचुनी । जागा देई वृंदावनीं । रातचे रात करमीन ॥११॥ अस्ता गेला वासरमणी । सुखें राहें वृदावनी । आज्ञा केली इंद्रालागुनी । सत्वर मेघा पाठवी ॥१२॥ वीज लावली मेघमंडळी । ढग निवाला तेच काळीं । मेघानें सोडिल्या फळीं । जनलोकक पाहतसे ॥१३॥ मेघानें सोडिल्या धारा । थंड गार सुटला वारा । शामाई कांपतसे थरथरां ॥ गोमाइने देखिली ॥१४॥   गोमाई म्हणे अहो साजणी । आंत येई वो ब्राह्मणी । मरुनी जाशील वृंदावनीं । प्रायश्चित्त मजवरी येईल ॥१५॥ मरूनि जाईल वृंदावनीं । परी मी येईना कोणाचे सदनीं । देव राखीव मजलागुनी । ऐशी शामाई बोलली ॥१६॥ इतुका मेघ वर्षला थोर । भिजलें नाहीं तुझे वस्त्र । शामाई म्हणे आम्हांवर । इश्वराची बहु कृपा ॥१७॥ तुम्ही शुद्ध गे ब्राह्मणी । देव तुम्हीं केला ऋणी । आम्ही नरदेहासी येऊनी । प्रपंचसदनीं बुडालों ॥१८॥ दारावाटे बोलावुन । नेत्रीं पाहे अवलोकुन । चक्रपाणी ओळखुन ।चरणीं ठाव मज देई ॥१९॥ आतां उठावेना करुं काई । हाती धरुनि उठवी गोमाई । कवाड उघडोनि लावलाही । बळे सदना लोटलीं ॥२०॥ बळें सदनीं लोटलें मला । मजवर बलात्कार केला । मी सांगेन नंदजीला । म्हणोनी गलबला करितसे ॥२१॥ सदनी जातां तत्क्षाणी । चवघी उद्धरल्या कामिनी । दारापाशी येऊनी । हाकां मारी गोमाई ॥२२॥ गोमाई येऊनी लागे चरणां । पुनीत केल्या आमुच्या सुना । नासिका लावियेला चुना । पाहुन पळे गोविंद ॥२३॥ गोमाई उद्धरली कथा । आपण होऊनि श्रोता वक्ता । एका जनार्दनी दाता । सत्य वार्ता ही माझी ॥२४॥
132 गोकुळीं चोरी करितो चक्रपाणी गवळणी येउनी सांगती गार्‍हाणीं । येणेंमाझें भक्षिलें दहीं दूध लोणी । पळोनियां येथें आला शारंगपाणी वो ॥१॥ आवरीं आवरीं यशोदे आपुला कान्हा । याच्या खोडी किती सांगु जाणा । याचें लाघव न कळे चतुरानना । यासी पाहतां मन नुरे मीपणा वो ॥२॥ एके दिवशीं मी आपुलें मंदिरीं । मंथन करितां देखिला पुतनारी । जवळी येवोनि रवीदंड धरी । म्हणे मी घुसळितोम तु राहें क्षणभरी वो ॥३॥ परवां आमुचे घरासी आला । संगे घेउनी गोपाळांचा मेळा । नाचले ऐकत धरें पाहें अचला । धरूं जातां तो पळोनियां गेला वो ॥४॥ ऐसें बहु लाघव केलें येणें । किती सांगावें तुज गार्‍हाणें । एका जनार्दनीं परब्रह्मा तान्हें । यासी ध्याता खुंटलें येणे जाणे वो ॥५॥
133 गोकुळीं ठेवितां श्रीकृष्णनाथ । वसुदेवास माया प्राप्त । तेणें पावला त्वरित । देह बंदिशाळे ॥१॥ तंव तुटली जडली बेडी । कपाटा पडली कडी । भव भयाच्या कडाडी । अहं कंस पावे ॥२॥ श्रीकृष्ण सांडिला मागें । पंचमहाभूत पाठी लागे । मिथ्या बंधन वाउगें । उठी मरण भये ॥३॥ कंस पुसे लवलाह्या । काय प्रसाली तुझी जाया । म्हणोनी आणिली योगमाया । वसुदेवें ॥४॥ वेगें देवकी म्हणे । कंस पुसेल जेव्हां तान्हें । तेव्हा तुवां देणें । हे तया हातीं ॥५॥ ते तें देतां देवकी जवळी । गर्जे ब्रह्मांड किंकाळी । टाहो फुटली आरोळी । दैत्या निधीची ॥६॥ तेणें दचकलें दुर्धर । कामक्रोधादि असुर । कंस पावला सत्वर । धरावयासी ॥७॥ वेंगीं आठवा आणवी । तंव हातां आली आठवीं । कंस दचकला दुर्धर जीवीं । नोहें जालेंचि विपरित ॥८॥ आठवा न दिसे डोळां । आठवी पडली गळां । कर्म न सोडी कपाळा । आलें मरण मज ॥९॥ परासि मारितां जाण । मारिल्या मारी मरण । कंस भीतसे आपण । कृष्ण भय करी ॥१०॥ आठवीं उपडितां तांतडीं । तंव तें ब्रह्मांड कडाडी । हातांतुन निष्टली हडबडी । कंस भयाभीतु ॥११॥ तंव ते गर्जलीं अंबरीं । पैले गोकुळीं वाढे हरी । तुज सगट बोहरी । करील दैत्याकुळाची ॥१२॥ वधिता देवकीचीं बाळें । माझें पाप मज फळलें । माझें निजकर्म बळें । आलें मरण मज ॥१३॥ भय संचलें गाढें । तेणें पाऊल न चले पुढें । पाहतां गोकुळाकडे । मूर्च्छित कंस बा ॥१४॥ आसनीं भोजनीं शयनीं । भये क्रृष्ण देखे नयनीं । थोर भेदरा मनीं । जनीं वनीं हरी देखे ॥१५॥ कृष्ण भयाचें मथित । कंसपणा विसरे चित्त । एकाजनार्दनी भक्त । भयें जीवन्मुक्त ॥१६॥
134 गोकुळीं लाघव दावितो चक्रपाणी । भोवंत्या वेष्टित बैसल्या अवघ्या गौळणी । मध्येम सुकुमार सांवळा शारंगपाणी । चिमणी पितांबर पिवळा । गळां वैजयंती माळा । घवघवीत घनसांवळा । पाहे नंदराणी ॥१॥ नाच रे तू कृष्णा मज पाहुं दे नयनी ॥धृ॥ नाचतो सांवळा सुंदर निमासुर वदन । वाळेघोळ घागरीयांच्या क्षणत्कार पूर्ण । आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुनी भुले मदन । हातीच्या मुद्रिका झळकती । क्षुद्र किंकणी सुस्वर गती । वाकी नेपुरे ढाळा देती । पहाती गौळणी ॥२॥ सप्तही पाताळें नाचती हरिचिया गण गंधर्व देव सर्व अक्षर हरिपदें । वैकुंठ कैलास नाचती । चंद्र सुर्य रसनायक दीप्ति । ऋषिमंडळ धाक तोडिती । अदभुत हरिकिरणी ॥३॥ नाचती सर्वही फणीपाळ । परिवारेस नाचती पृथ्वेचे भूपाळ । मेरू पर्वत भोगी नायक । वनस्पती नाचती कौतुक । वेदशास्त्र पुराण पावक । नाचत शुळपाणी ॥४॥ नाचती गोपाळा गोपिका सुंदर मंदिरें । उखळें जाती मुसळें पाळीं आणि देव्हारें । धातुमुर्ति नाचुं लागल्या एकसरें । गौळणी अवघ्या विस्मित । देहभाव हरपला समस्त । यशादेसी प्रेम लोटत । धरिला धांउनि ॥५॥ शिणलासी नाचतां आतां पुरें करी हरी । विश्वरुप पाहतां गोपी विस्मित अंतरीं । यशोदेनें कृष्ण घेतला कडियेवरी । एका जनार्दनी भक्तिभाव । अनन्य भक्ता दावी लाघव । निज भक्तांचे काज सर्व । करितां शिण न मानीं ॥६॥
135 गोकुळीच्या जना ध्यान । वाचे म्हणती कृष्ण कृष्ण । जेवितां बैसतां ध्यान । कृष्णमय सर्व ॥१॥ ध्यानी ध्यती कृष्णा । आणिक नाहीं दुजी तृष्णा । विसरल्या विषयध्याना । सर्व देखती कृष्ण ॥२॥ घेतां देतां वदनीं कृष्ण । आनं नाहीं कांही मन । वाचा वाच्य वाचक कृष्ण । जीवेंभावें सर्वदा ॥३॥ कृष्णारुपीं वेधली वृत्तीं । नाहीं देहाची पालट स्थितीं । एका जनार्दनी देखती । जागृती स्वप्नी कृष्णांतें ॥४॥
136 गोधनें चाराया जातो शारंगपाणी । मार्गीं भेटली राधिका गौळणी । कृष्ण दान मागे निरी आसडोनी । तंव ती देखिली यशोदा जननी ॥१॥ यशोदा म्हणे नाटका हृषीकेशी । परनारीसी कैसा रे झोंबसी । येरु रुदत सांगतो मातेपाशीं । माझा चेंडुं लपविला निरिपाशीं ॥२॥ राधिका म्हणे यशोदे परियेसी । चेंडु नाही नाहीं वो मजपाशी । परि हा लाटिका लबाड हृषीकेशी । निरी आसडितां चेंडु पडे धरणीसी ॥३॥ यशोदा म्हणे चाळका तुम्ही नारी । मार्गीं बैसतां क्षण एक मुरारी । एका जनार्दनीं विनवीं श्रीहरी । नाम घेतां पातकें जती दुरी ॥४॥
137 गोपाळ म्हणती कान्हया कृष्नातें । आजी यमुनेचे जळ वर्जा कां जी ॥१॥ हरी म्हणे तयातें तेथें बाऊ आला । म्हणोनि तया स्थळा नवजावें ॥२॥ ऐकोनियां पेंदा नाचतो दुपांडी । गदियांची मादि सवें घेत ॥३॥ बाऊ पहावया गडे हो अवघे चला । या कृष्णबोला राहुं नका ॥४॥ एका मागें एक गडी ते निघाले । एका जनार्दनीं आले यमुनेटीं ॥५॥
138 गोपाळ म्हणती कान्हा । सांभाळीं आपुल्या गोधळा । पळतां सैराट धांवती राना । गेल्या ठेल्या त्या तुम्हीं जाणां ॥१॥ कान्होबा पुरे पुरे तुझी गडी । आम्हा गाईनें केली ओढाओढी ॥धृ॥ तूं बैससी टेकावरी । आम्हीं श्रमतों वेरझारीं । ऐसें कैसें तुझें मुरारी । आपुलीं गोधनें जतन करीं ॥२॥ तुझ्या न लगती आम्हां गाई । तुझी संगती पुरे भाई । जरी कोपेल तुझी आई । तरी करील आमचें काई रे ॥३॥ तुझी गोधनें सैराटें । दाहीं पळतां दाही वाटे । वळितां कष्ट होताती मोठे । ठेचा लागुनी फुटली । बोटें ॥४॥ पैल श्रवणीं पाहे गाये । ते साद होये तिकडे जाये । उभी क्षणभरीं न राहे । वळितां जाती आमुचे पाय ॥५॥ पैल सावळीं डोळे सुटी । देखोनि धांवे हिरवटी । वळीतां धाप न साहे पोटीं । ती तु सांभाळी जगजेठी ॥६॥ पैले हुंगी कैसा सुजाण । स्वाद घे परी न खाये तृण । इसी हिंडवया थोडकें रान । वळीतां जाती आमुचे प्राण ॥७॥ पैल चोरटी रसाळ रंगी । कळप सांडोनी वाढे वेगीं । वळितां न वळे ती आम्हालांगीं । तुझी संगत नको वेंगीं ॥८॥ पैल सर्वांग सुकुमार मोठी । चहूंकडे ती धांवत खोटीं । मऊ रान देखोनियां अंग लोटी । तिसी वळितं जालों हिंपुटी ॥९॥ पैल लोभिष्ट हुंबरे कैशी । उगा न राहे हुंबरे द्वेषी । वळीतसं न वळे ती आम्हांसी । ती तु सांभाळी हृषीकेशी ॥१०॥ पैल हाताळ वोढाळ येकी । तेणे पाते गुड हाकी । ऐशी खट्याळ नाहीं आणिका । वळितां वळित्या घेती निकी ॥११॥ पैल पाय करिती भारी । उभी न राहे क्षणभरीं । वळतां शिणलों बहु मुरारी । तें तुं आपुलें जतन करीं ॥१२॥ पैल पोटफुगी खादाड । कैशी खाउनी हागे बाड । धुतां कधींच नव्हे धड । तुझीं गोधने न लगती गोड ॥१३॥ पैल मुतरीं मुंजी लांडी । कैशी सांचलीं घेत होडी । धांवे जेथें गोड लागे तोंडीं । वळतां पडती आमुची मुरकुंडी ॥१४॥ पैल मनमोहन सुंदर । कोणें काळी नव्हें स्थिर । इसी हिंदावया थोर वावर । हांव धरुनी धावती फार ॥१५॥ ऐसी गोधनें आमुच्या माथां । घालूं पहातोसी अनंता । एका जनार्दनीं विनवितं कृपा आली आलिंगी निजभक्ता ॥१६॥
139 गोपिका त्या बोल बोलती आवडी । एकताती गडी संभोवतें ॥१॥ सभोंवतें तया न कळेची खूण । पहाती विंदान श्रीहरींचें ॥२॥ गोपिका कामातुर त्या मनीं । जाणोनि चक्रपाणी रास खेळे ॥३॥ षण्मास खेळ खेळती अबला । एका जनार्दनीं कळा न कळे कोण्हा ॥४॥
140 गोपी धावुनियां धरिती तयातं । उगा पाहे बहतें न बोले कांहीं ॥१॥ करिती गलबला मिळती सकळां । बोलती अबला वाईट तें ॥२॥ कां रें चोरा आतां कैसा सांपडलासी । म्हणोनि हातासी धरियलें ॥३॥ वोढोनियां नेती यशोदे जवळी । आहे वनमाळी कडेवरी ॥४॥ एका जनार्दनी यशोदेचे करीं । उभा श्रीहरी लोणी मागें ॥५॥
141 गोपी धावुनियां धरिती तयातं । उगा पाहे बहतें न बोले कांहीं ॥१॥ करिती गलबला मिळती सकळां । बोलती अबला वाईट तें ॥२॥ कां रें चोरा आतां कैसा सांपडलासी । म्हणोनि हातासी धरियलें ॥३॥ वोढोनियां नेती यशोदे जवळी । आहे वनमाळी कडेवरी ॥४॥ एका जनार्दनी यशोदेचे करीं । उभा श्रीहरी लोणी मागें ॥५॥
142 गोविंयेंलें देवें आम्हांसी अभिमानें । नामरुप पेणें अंतरलों ॥१॥ करिती विचार इंद्रादी देव । हें सुखवैभव न मिळे आम्हां ॥२॥ शेष उष्टावळी मिळतां आम्हांसी । पावन जन्मासी होऊं आम्ही ॥३॥ ऐसा विचार करुनियां देव । मत्स्यरुप सर्व धरिताती ॥४॥ गोपाळासी सांगे वैकुंठीचा रावो । आजी नवलावो तुम्ही करा ॥५॥ कवळ खाउनी हात टिरी पुसा । यमुनें सहसा जाऊं नका ॥६॥ कां तो सांगे हरी न कळे तयासीं । एका जनार्दनासी गुज पुसे ॥७॥
143 गौळणी गार्‍हाणे सांगतो यशोदेसी । दहीं दुध खाऊनियां पळुनी जातो हृषीकेशी ॥१॥ लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे । याच्या खोडी किती सांगु महीपत्र सिंधु आटे ॥२॥ मेळवानि गोपाळ घरामध्यें शिरे कान्हा । धरुं जातां पळुनि जातो यादवांचा राणा ॥३॥ ऐसें मज याने पिंसे लावियसे सांगु काई । एका जनार्दनी कायावचामनें पायी ॥४॥
144 गौळणी बारा सोळा । हो उनी येके ठायीं मेळा । म्हणती गे कृष्णांला । धरुं आजीं ॥१॥ कवाड लाउनीं । बैसल्या सकळजणी । रात्र होतांचि माध्यांनी । आला कृष्ण ॥२॥ दहीं दुध तुप लोणी । यांची भोजनें आणुनी । रितीं केली तत्क्षणीं परी तयां न कळें ॥३॥ थोर लाघव दाविलें । सकळां निद्रेनें व्यापिलें । द्वार तें नाहीं उघडिलें । जैसें तैसेंची ॥४॥ खाउनी सकळ । मुखा लाविलें कवळ । आपण तात्काळ । पळे बाहेरी ॥५॥ एका जनार्दनी ऐशी करुनि करणी । यशोदे जवळी येउनी । वोसंगा बैसे ॥६॥
145 गौळणी म्हणती यशोदेला । कोठें गे सांवळां । कां रथ शृंगारिला । सांगे वो मजला । अक्रुर उभा असे बाई गे साजरी ॥१॥ बोले नंदाची आंगणीं । मिळाल्या गौळणी ॥धृ॥ बोले नंदाची पट्टराणी । सद्गदेत होउनी । मथुरेसी चक्रपाणी । जातो गे साजणी । विव्हळ झाले मन वचन ऐकोनी ॥२॥ अक्रुरा चांडाळा । तुज कोनी धाडिला । कां घातां करुं आलासी । वधिशी सकळां । अक्रुरा तुझे नाम तैशीच करणी ॥३॥ रथीं चढले वनमाळी । आकांत गोकूळीं । भूमि पडल्या व्रजबाळी । कोण त्या सांभाळी । नयनींच्या उदकांनें भिजली धरणी ॥४॥ देव बोले अक्रुरासी वेगें हांकी रथासी । या गोपींच्या शोकासी । न पहावेंमजसी । एका जनार्दनीं रथ गेला निघोनि ॥५॥
146 गौळणी सांगती गार्‍हाणीं । रात्री आला चक्रपणी । खाऊनी दहीं दूध तूप लोणी । फोडिली अवघीं विरजणीं ॥१॥ हा गे बाई कोणासी आवरेना । यशोदा बाळ तुइझा कान्हा । कोठवर सांसुद धिंगाणा ॥धृ०॥ दुसरी आली धांवत । याने बाई काय केली मात । मुखाशीं मुखचुंबन देत । गळ्यामधी हात घालीत धरुं जातां सांपडेना ॥२॥ तिसरी आली धांउनी । म्हणे गे बाई काय केली करणी । पतीची दाढ़ी माझी वेणी । दोहीसी गांठ देउनी । गांठ बाई कोणा सुटेना ॥३॥ मिळोनि अवघ्या गौळणी । येती नंदाच्या अंगणीं । जातों आम्हीं गोकुळ सोडोनी । आमुच्या सुना घेउनी । हें बाई आम्हांसी पहावेना ॥४॥ ऐशीं ऐकतां गार्‍हाणीं । यशोदानयनीं आलें पाणीं । कृष्ण खोड दे टाकुनी एका जनार्दनीं चरणीं । प्रेम तया आवरेना ॥५॥
147 गौळणीचा थाट निघाला मथुरे हातालागीं । तें देखोनि जगदीश धांवला गोप घेऊनी वेगीं ॥१॥ कान्हयां सरसर परता नको आरुता येऊं । तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊं ॥धृ॥ सासुरवासिनी आम्ही गौळणी जाऊं दे रे हरी । बहु वेळ लागतां सासु सासरे कोपतील घरीं ॥२॥ आम्हीं बहुजनी येकला तु शारंगपाणी दिससी येथें । हृदयमंदिरीं ठेऊनी तुंतें जाऊं मथुरांपथें ॥३॥ एका जनार्दनी ब्रह्मावादिनी गोपिका बरवटां । कृष्णापदीं त्या लीन झाल्या पूर्णपणें तन्निष्ठा ॥४॥
148 घरोघरी कृष्ण धरिला बोभाटा । घेऊनि येती धीटा राजद्वारी ॥१॥ पाहती तो उभा यशोदे जवळी । वाउगी ती कळी दिसताती ॥२॥ गोपिका धांवती घेऊनियां कृष्ण । न कळे विंदान कांहीं केल्या ॥३॥ घेऊनियां येती तटस्थ पाहती । विस्मित त्या होती आपुले मनीं ॥४॥ एका जनार्दनींदावीत लाघव । न कळेंचि माव ब्रह्मादिकां ॥५॥
149 घरोघरी कृष्ण धरिला बोभाटा । घेऊनि येती धीटा राजद्वारी ॥१॥ पाहती तो उभा यशोदे जवळी । वाउगी ती कळी दिसताती ॥२॥ गोपिका धांवती घेऊनियां कृष्ण । न कळे विंदान कांहीं केल्या ॥३॥ घेऊनियां येती तटस्थ पाहती । विस्मित त्या होती आपुले मनीं ॥४॥ एका जनार्दनींदावीत लाघव । न कळेंचि माव ब्रह्मादिकां ॥५॥
150 घरोघरीं चोरी करितो हृषीकेश । गार्‍हाणे संगिती येऊनी यशोदेसी ॥१॥ भली केली गोविंदा भली केली गोविंदा । निजभक्तालागीं दखाविसी लीला ॥२॥ कवाड उघडोनि शिंके वो तोडिलें । दहीं दुध भक्षूनि ताक उलंडिलें ॥३॥ अंतर बाहेर मज व्यापियलें माया । एका जनार्दनी म्हणे न सोडी पायां ॥४॥
151 घालुनी माया म्हणे नंदराया । भजे यादव राया कायावाचा ॥१॥ संसारसुख भोगाल चिरकाळ । परब्रह्मा निर्मळ तया भजे ॥२॥ नंद म्हणे देव दूर आहे बापा । आम्हांसी तो सोपा कैसा होये ॥३॥ ऐकातांचि वचन काय करी नारायण । प्रगटरुप जाण दाखविलें ॥४॥ शंख चक्र गदा पद्म तें हस्तकीं । मुगुट मस्तकीं शोभायमान ॥५॥ ऐसा पाहतां हरी आनंद पैं झाला । एका जनार्दनी भेटला जीवेंभावें ॥६॥
152 घेऊनि गोधनें जाती यमुने तटीं । नानापरी खेळ खेळताती जगजेठी ॥१॥ मेळेवोनि गोपाळ मध्यें खेळे कान्हा । न कलेचि महिमान ऐसा यादवांचा राणा ॥२॥ नानापरींचे खेळ खेळती गोपाळ । नाचती गदारोल मिळोनी सकळ ॥३॥ एका जनार्दनी खेळे मदनपुतळा । नंदरायाचा कुमरु म्हणतात सांवळा ॥४॥
153 घेऊनियां हातीं काठी । पोरा खेळसी सुरकांडी रे ॥१॥ खेळे सुरकांडी पोरा खेळे सुरकांडी । विषयांची वासना धरुनी चढसी प्रपंचाचे झांडी ॥२॥ बुडापासुन शेंडा रे चढसी फांडोफादी रे । कामक्रोध पोरें लागती पाठींम्हणती माझा दादा रे ॥३॥ धरीं एका जनार्दनी गोडी तरी खेळ जोडा रे । वायां खेळ खेळू जाती होईल भ्रकवडी रे ॥४॥
154 चंद्र पौर्णिमेचा दिसे पा सोज्वळ । तैसा श्रीविठ्ठल पंधरीये ॥१॥ क्षीरसिंधुसम भीवरा ती वाहे । स्नान करितां जाय महत्पाप ॥२॥ सनकसनंदनसम पुंडलीक । शोभा आलोलिक वर्णु काय ॥३॥ लक्ष्मी प्रत्यक्ष रखुमाई राही । एका जनार्दनीं पायीं लीन जाला ॥४॥
155 चंद्राहुनी शीतळ रवीहुनी सोज्वळ तेणे मज केवळ वेधियलें ॥१॥ वेध कैसा मज लागला वो बाई ॥धृ॥ अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदु । रुपेंविण आनंद देखिला बाई ॥२॥ ऐका जनार्दनी आनंदु परिपूर्ण । काया वाचा मनें वेधिलें वो बाई ॥३॥
156 चतुर्भुज शामसुंदर । गळां गुण्जींचे हार । निढळीं चंदन शोभे परिकर । मिरवे नंदरायाचा किशोर ॥१॥ हातीं काठी खांदी कांबळीं । गाई राखे यमुनेचे पाबळी । नाचती गोपाळ धुमाळी । पृष्टी जाळी दहींभात ॥२॥ जे निगमांचे ठेंवणें । सनकसनंदाचे घोसुलें येणें । शंभुचे आराध्यदैवत केणें । तें चरित गोधनें नंदाची ॥३॥ ऐसा अकळ नाकळें हरी । वेणु वाजवी छंदे नानापरी । एका जानार्दनी गोपेवेषें निर्धारीं । वाटी शिदोरी गोपाळं ॥४॥
157 चला बाई वृंदावनीं रासक्रीडाम पाहुं । नंदाचा बाळ येणें केला नवलाऊ ॥१॥ कल्पनेची सासु इचा बहुताचि जाचु । देहभाव ठेऊनी पायां ब्रह्मापदीं नाचुं ॥२॥ सर्व गर्व सोडूनी बाई चला हरेपाशीं । द्वैतभाव ठेवुनी पायीं हरिरुप होसी ॥३॥ एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहतां अवघें स्वप्नवत वाव ॥४॥
158 चहुं वाचांपरता चहुं वेदां निरुता । न कळे तत्त्वतां चतुर्वक्त्रा ॥१॥ चौबारा खेळतु सौगंडी सांगातु । लोणी चोरुं जातु घरोघरीं ॥२॥ चौसष्ट वेगळा चौदांसी निराळा । अगम्य ज्याची लीळा सनकादिकां ॥३॥ एका जनार्दनीं चहुं देहावेगळा । संपुष्टी आगळा भरला देव ॥४॥
159 जगांचे जीवन भक्तांचे मोहन । सगुण निर्गुण ठाण शोभतसे ॥१॥ तें रुप गोकुळीं नंदाचिये घरीं । यशोदे मांडिवरी खेळतसे ॥२॥ इंद्रादी शंकर ध्यान धरती ज्यांचें । तो लोणी चोरी गौळ्यांचे घरोघरीं ॥३॥ सर्वावरी चाले जयाची ते सत्ता । त्यांची बागुल आला म्हणतां उगा राहे ॥४॥ एकाचि पदें बळीं पाताळी घातला । तो उखळीं बांधिला यशोदेनें ॥५॥ जयाचेनी तृप्त त्रिभुवन सगळे । तो लोणीयाचे गोळे मागुन खाय ॥६॥ एका जनार्दनी भरुनी उरला । तो असें संचला विटेवरी ॥७॥
160 जगाचें जीवन ब्रह्मा परिपुर्ण । जनीं जनार्दन व्यापक तो ॥१॥ तो ह्री गोकुळीं रांगणा नंदाघरीं । गौळणी त्या सुंदरीं खेळविती ॥२॥ वेद गीतीं गातीं शास्त्रें विवादतीं । खुंटलीसे मति शेषादिकांची ॥३॥ एका जनार्दनी चहूं वाचां परता । उच्छिष्ट सर्वथा भक्षी सुखें ॥४॥
161 जन्म जन्मांतरी विराहिणी । होती दुश्चित्त अंतःकरणी । दुःखी सेशिलें होतें मागें जन्मीं । ये खेपे निरसलें स्थुळ कारणीं ॥१॥ येउने भेंटी देहीं देहातीत । तयाचा विरह मजलागीं होत । मना समुळ मन पहात । तो भेटला गोपीनाथ ॥२॥ दुःख फिटलें मान जालें थोर । हर्षें आनंदें आनंद तुषार । एका जनार्दनीं भेटला परात्पर । तेणें संसार विरह गेला निर्धार ॥३॥
162 जप तपें तपता कोटीं । होती हिंपुटी भाग्यहीन ॥१॥ तया विश्रांतीसी स्थान । पंढरी जाण भुमंडली ॥२॥ योगयाग धूम्रपान करिती । नोहे प्राप्ति तयासी ॥३॥ तो उभा कटीं कर ठेवुनी । समचरणीं विटेवरी ॥४॥ एका जनार्दनीं पाहातां । दिठीं कंदर्प कोटी वोवाळिजे ॥५॥
163 जयां आहे मुक्ति चाड । तयांसी गोड पंढरी ॥१॥ देव तीर्थ क्षेत्र संत । चहूंचा होत मेळा जेथ ॥२॥ कृष्णरामादि नामगजर । करिती उच्चार अट्टाहास्ये ॥३॥ स्त्रियाआदि नर बाळें । कौतुक लीळे नाचती ॥४॥ एका जनार्दनीं तयांसंगीं । विठ्ठलरंगी नाचतुसे ॥५॥
164 जयांचे उदारपण काय वानुं । उपमेसी नये कल्पतरु कामधेनु । वेधीं विधियेलें आमुचें मनु । तो हा देखिला सावळा श्रीकृष्ण ॥१॥ मंजुळ मंजुळ वाजवी वेणु । श्रुतीशास्त्रा न कळें अनुमानु । जो हा परापश्यंती वेगळा वामनु । तया गोवळा म्हणती कान्हू ॥२॥ रुप अरुपाशीं नाहीं ठाव । आगमीनिगमां न कळे वैभव । वेदशास्त्रांची निमाली हांव । एका जनार्दनीं देखिला स्वयमेव ॥३॥
165 जयाकारणें श्रमलें भांडती । वेदादिकां न कळे मती । वोळला सगुण मूर्ती । पुंडलिकाकारणें ॥१॥ धन्य धन्य पावन देखे । पुण्यभूमि पावन सुरेख । तया गातां होतसे हर्ष । प्रेमानंदे डुल्लती ॥२॥ एका जनार्दनीं शरण । पाहतां पाहतां वेधलें मन । मोक्ष मुक्ति कर जोडून । उभे तिष्ठती सर्वद ॥३॥
166 जयाच्या दरुशनें शिवादिकां तृप्ती । योगी हृदयीं जया ध्याती । सहा चारा अठरा जया वर्णिता । सहस्त्रमुखा न कळे जायाची गती ॥१॥ तो हा नंदनंदनु यशोदेचा तान्हा । संवगदे गोपाळ म्हणती कान्हा । पराश्ययंती मध्यमा वैखरी नातुडे जाणा । वेडावले जया ठायी रिघाले साधना ॥२॥ आष्टांग साधन साधितां अटी । नोहे नोहे मुनिजना ज्यांची भेटी । एका जनार्दनी हातीं घेऊनी काठी । गोधनें चारी आवडीं जगजेठी ॥३॥
167 जाणते नेणते होतु ब्रह्माज्ञानी । तयांचे तो ध्यानी नातुडेची ॥१॥ सुलभ सोपारे गोकुळामाझारीं । घरोघरीं चोरी खाय लोणी ॥२॥ न कळे ब्रह्मादिकां करितां लाघव । योगियांची धांव खुटें जेथें ॥३॥ एका जनार्दनीं चेंडुवाचे मिसें । उडी घालितसे डोहामाजीं ॥४॥
168 जाश्वनीळ सदा ध्याये ध्यानीं मनीं । बैसोनी स्मशानीं निवांतपणें ॥१॥ तें हें उघडें रुप विठ्ठ्ल साचार । निगमांचे माहेर पंढरी हें ॥२॥ न बुडे कल्पांती आहे तें संचलें । म्हणोनि म्हणती भए भूवैकुंठ ॥३॥ एका जनार्दनी कल्पाचें निर्धारी । निर्विकल्प पंढरी उरतसे ॥४॥
169 जाहला अस्तमान आले गोकूळां । वोवाळिती आरत्या गोपिका बाळां ॥१॥ जाती सवंगंडी आपुलाले घरां । राकाकृष्ण दोघे आले मंदिरां ॥२॥ नानापरीचीं पक्कान्नें वाढिती भोजना । यशोदा रोहिणी राम आणि कृष्णा ॥३॥ एका जनार्दनीं पहुडले देव । गोकुळामाजीं दावी ऐसें लाघव ॥४॥
170 जें जें क्षेत्र जें जें स्थळीं । तें तें बळी आपुलें ठायीं ।१॥ परे ऐसें माहात्म्य नाहीं कोठें । जें प्रत्यक्ष भेटे हरिहर ॥२॥ ऐत संतसामगाम । ऐसा निरुपम नाममाहिमा ॥३॥ दिंडी टके मृदंग नाद । नाहींभेद यातीसी ॥४॥ एका जनार्दनीं निजसार । पंढरी माहेर भुलोकीं ॥५॥
171 जें देवा दुर्लभ स्थान । मनुष्यासी तें सोपें जाण ॥१॥ या ब्रह्माडांमाझारीं । सृष्टी जाणावी पंढरी ॥२॥ एक एक पाऊल तत्त्वतां । घडे अश्वमेध पुण्यता ॥३॥ एका जनार्दनीं ठसा । विठ्ठल उभाची सरसा ॥४॥
172 जेथें वाजविला वेणु शुद्ध । म्हणोनि म्हणती वेणुनाद ॥१॥ सकळीक देव आले । ते भोंवती राहिले ॥२॥ जोडिलें जेथे समपद । तया म्हणती विष्णूपद ॥३॥ भोवंतालीं पदें उमटली । तेथे गोपाळ नाचती ॥४॥ जेथें उभे गाईचें भार । ते अद्यापि दिसत खुर ॥५॥ गोपाळांची पदें समग्र । ठाई शोभते सर्वत्र ॥६॥ एका जर्नादनीं हरी शोभले । कार कटावरी ठेऊनि भले ॥७॥
173 जैसा केला तैसा होय आपोआप । संकल्प विकल्प न धरी कांहीं ॥१॥ न म्हणे उंच नीच यातीकुळ । वर्ण व्यक्ति शील न पाहेची ॥२॥ उच्छिष्ट तें प्रिय गौळियांचे खाये । हमामा हुंबरी नाचतसे घायें ॥३॥ एका जनार्दनीं सांडोनियां थोरपणा । खेळतांहीं न्युन न बोलें कांहीं ॥४॥
174 जो न कळे वेदशास्त्र गे माये । तो गोकुळी चोरुनी लोणी खाये ॥१॥ ऐशी भाविकांची आवडी देखा । टाकुनी आला वैकुंठ सुखा ॥२॥ एका जनार्दनीं ब्रह्मा परिपूर्ण । तया घालिती यशोदा भोजन ॥३॥
175 जो परात्पर परेपरता । आदि मध्य अंत नाहीं पाहतां । आगमानिगमां न कळे सर्वथा । तो पंढरीये उभा राहिला ॥१॥ धन्य धन्य पाडुरंग भोवतां शोभें संतसंग । धन्य भाग्याचे जे सभाग्य तेचि पंढरी पाहती ॥२॥ निरा भिवरापुढें वाहे । मध्य पुडंलीक उभा आहे । समदृष्टी चराचरी विठ्ठल पाहें । तेचि भाग्याचे नारीनर ॥३॥ नित्य दिवाळी दसरा । सदा आनंद पंढरपुरा । एका जनार्दनी निर्धार । धन्य भाग्याचे नारी नर ॥४॥
176 जो परिपुर्ण परब्रह्मा व्यापक गे माये । तो गोकुळीं गाई चारिताहे ॥१॥ पहा हो भुलला भक्ति प्रेमासी । शिदोर्‍या चोरुनी खाये वेगेंसी ॥२॥ एका जनार्दनी व्यापक देखा । तो गोकुळीम चोरी करी कौतुका ॥३॥
177 जो साक्षात परब्रह्मा । करुं निघाला चोरीकर्म । धरुनी बाळलीला संभ्रम । आवडी परम नवनीताची ॥१॥ सवें नवलक्ष संवगडे । पशुपाल वेडे बागडे । सुदामा बोले बोबडें । ते आवडे गोविंदा ॥२॥ थोगला अत्यंत वांकुडा । जो निजाचा निजगडा । कृष्ण गुज सांगे त्या पुढां । होई गाढा चोरीकार्मा ॥३॥ घ्या रे सामुग्री चोखट । खेडे सराटे निकट । माजीं बांधारे बळकटा । शब्द कांहीं करुं नका ॥४॥ वस्त्र गाळिव मृत्तिका । घेउनी प्रवेशतं शंकु नका । सकळ गृहींचा आवांका । मज ठाउक समाचार ॥५॥ गोपाळ म्हणती चक्रपाणी । चोरीकर्म ऐकिलें श्रवणीं । परी खडे सराटे मृतिका घेउनी । न देखो कोणीही रिगाले ॥६॥ कृष्ण म्हणे एका निवाडे । रचिताती पत्रांचे उतरंडे । पाहतां न दिसती दृष्टीपुढे । जैं अंधार पडे रजनीचा ॥७॥ भीतरी प्रवेशोनी एकीकडे । सव्य अपसव्य टाकावे खडे । पात्रीं नाद उमटती धडाडे । जाउनी रोकडे आणावे ॥८॥ शिंकीं लांबविलीं अंतराळीं । काठी टोंचुनी पाडावी दुळी । धार लागेल मोकळी । मिळोनि सकळीं प्राशन करा ॥९॥ साचल एकतील गौळणी । कवाडें धरतील धांवोनी । सराटे पसरा आंगणीं । पायीं चुंबकोनी गुंतती ॥१०॥ तेहि चुकवोनि येती अबला । तरी मृत्तिका घाला त्यांचे डोळां । नेत्र चोळतील तंव तुम्हीं पळा । नवलकळा सांगितली ॥११॥ हांसें आलें कृष्णातरीं । मग प्रवेशलें घरोघरीं । कवाडें उघडोनि भीतरीं । अंतरीं प्रवेशलें ॥१२॥ हळुं हळूं ठेविती पाउलें । तंव गर्जती वांकीया वाळे । जन ऐकतील म्हणोनि गोपाळें । कर्णीं अंगोळी घातलीं ॥१३॥ कृष्ण नायके तंव जग बधीर । कृष्ण न देखे तंव अंध जगत्रय । कृष्ण न चाले तंव पांगुळ सर्वत्र । चालक सर्व श्रीकृष्ण ॥१४॥ सांचलें दहींपात्रें काढिती । थिजलें घृत करीं घेती । कांही भक्षिती कांही खाती । तोंडा मखिती निजल्यांच्या ॥१५॥ एकापुढें एक धांवती । एक एकाचें लोणी हिरोनी घेती । एक एकातें झोंबती । वाटा मागती चिमटोनी ॥१६॥ देखोनी नवनीताची भांडीं । पेंदा नाचे दुपांडी । उगा पोरा म्हणोनी धरी शेंडी । गोळा तोंडी लाविला ॥१७॥ शिकें उंच न पावे कर । काठी टोचोनी पाडिलें छिद्र । कृष्ण निजमुखीं लावी धार । देखोनी गोपाळ गजबजिलें ॥१८॥ गोपाळ म्हणती कृष्णासी । जाई बा सकळ दुधतुपेंसी । येरु म्हणे लागा रे कोपराशी । घ्या रे सावकाशी दोहींकडे ॥१९॥ तंव वाकुंड्यानें केली टवाळी । टांचें तुडवोनि पोरें उठविलीं । ती मातेसी बोभाईली ॥ तंववत्से सोडिलीं वडजानें ॥२०॥ वत्सें करिती स्तनपान । बाळकें करिती रुदन । गोपी उठल्या गजबजोन । तंव नवनीतें वदन माखलें ॥२१॥ वृद्धा सांडोनि शेजेसी । उठतां देखिलें सुनेसी । सासु देखतां तोंड पुसीं । येउनी केशी धरियेली ॥२२॥ तुंचि भक्षिणी नवनीत । आणि दुसर्‍याचें नांव सांगत । ऐशा सासु सुना भांडत । आपण तेथोनि निघाले ॥२३॥ मग पळाले सकळ । दुजे गृहीं प्रवेशलें गोपाळ । गौळणी निद्रें व्यापिल्या सकळ । टवाळी नवल मांडियेली ॥२४॥ शिंकी लांबविलीं दुरीं । यत्न करिती परी न येती करीं । मग वेंघोनी एक एकाच्या खांद्यावरी । उतरती दहींपात्रें ॥२५॥ उतरंडी दुरी लाविल्या न कळती । सव्य अपसव्य खडे टाकिती । पात्रीं लागतां नाद उठती । तेंचि घेउनि येती हरिपाशीं ॥२६॥ सुखसेजे गोपी बाळी । निद्रिस्त देखोनि अंबरें फेडिलीं । तरुण देखोनी मुली । टवाळी थोर मांडिली ॥२७॥ तंव गजबजोनी सुंदरा । एके करें सांवरी चिरा । जाउनी धरी मधलीया द्वारां । सकळ चोरां कोंडिलें ॥२८॥ तंव पुढें देखोनी वनमाळी । म्हणे भला रे सांपडलासी ये वेळा । तंव धरुं वेल्हाळी । नयनीं गुरळीं घातली ॥२९॥ नेत्र चोळी व्रजकामिनी । आपण तिचा हात धरुनी । गोपाळातें खूनवोनी । सकळ तेथोनी पळाले ॥३०॥ येरी धावें पाठोपाठे । तंव पायीं चुबकले सराटे । वाम करी धरुनि बोटें । बैसे गुतोंनी धरणीवरी ॥३१॥ तंव दुसरी धांवली गोपिका । तिच्या नयनीं घातली मृत्तिका । नेत्र चोळीत अधोमुखा । देखोनि यदुनायक हांसतसे ॥३२॥ मग चोरीकर्म सोडिनी । सकळ प्रवेशले सदनीं । प्रातःकाळ झालिया गौळनी । गार्‍हाणीं सांगों आलिया ॥३३॥ यशोदे म्हणती सकळां । तुझिया पुत्राची नवलकळा । कानी न ऐकीली न देखों डोळां । सुना सकळीं विटंबिल्या ॥३४॥ एक मह्णती यशोदेम सुंदरे । तुझी गांवची वस्ती पुरे । उठवितो निजलीं पोरें । फेडी चिरें करी नग्न ॥३५॥ खालीं ठेवोनि नवनीत मांजरामुखी चाटवीत । आपण खदखदां हांसत । ऐसें विटबित नानापरी ॥३६॥ एक म्हणे गौळणी । माझे भक्षिलें क्षीण लोणी । उच्छिष्ट मुखासी लावोनी । आपण तेथोनि पळाला ॥३७॥ एक म्हणे माझी सोडिलीं वासुरें । उठविलीं निजली पोरें । शिंकी तोडिलीं एकसरें । फोडिल्या त्वरें माथणी ॥३८॥ गोपिकांसी बुझविते सुमती । म्हणे निर्गुणासी गुण लविती । तुमचें खादलें किती निश्चिती । संगा तितुके देईन ॥३९॥ किती भक्षिलें रें गोविंदा । तंव कृष्णापुढेंअ आली राधा । तिचे स्तन धरुन हांसे गदगदां । म्हणे येवढा मुद्धा होता तिच्या ॥४०॥ हांसों आलों राधिकेसी । गौळणी गेल्या घरासी । यशोदा म्हणे कृष्णासी । सोडी वेगेसी गोधनें ॥४१॥ जो वेदासी अगोचरा । श्रुतीसी न कळे ज्याचा पार । वर्णितां श्रमाला फणीवर । तो गुण गंभीर श्रीकृष्ण ॥४२॥ माथां मुगुट तेजःपुजं । नयन श्रवनीं सांगे गुज । ललाटी कस्तुरी नोज । तळपे तेज तळवीया ॥४३॥ वैजयंती वनमाआळा । सुरंग गुजाहार गळां । कंठी मिरवे मेखळा । झलके कळा कौस्तुभाची ॥४४॥ मुगुटा सुमने वैष्टिलीं मयुरपिच्छें शिरी खोविलीं । मग चालिले तये वळीं । जाळी पृष्ठीवरी टाकिलीं ॥४५॥ काळीं कांबळी खांद्यावरी । कासे खोविली शृंग मोहरी । जाला नंदाचा खिललरी । हांकिली झडकरी गोधनें ॥४६॥ बळिराम राजीवनयनु । अलंकारमंडित शुद्ध तनु । चालिले गोपाळ घेऊनी धेनु । दोघे बाळ नंदाचे ॥४७॥ सवें नव लक्ष संवगडे । पशुपाळ वेडेबागडे । गोरज उधळले चहुकडें । पावले थंडी यमुनेच्या ॥४८॥ गाई सोडिल्या सैरावैरा । भ्रमती सुखें खाती चारा । वडज्या म्हणे पेद्यां पोरा । आणी सत्वर पलशपत्रें ॥४९॥ मथुरेचे मीष करुनी । हाटा निघालिया गौळणी । माथा दहीं दुध घृत लोणी । त्यामाजीं मुख्य राधा ॥५०॥ गगन गर्जे वाक्या वाळे । घनदाट चालती उताविळे । मनीं इच्छिती कृष्णसोहळे । तंव देखिलें वदज्यानें ॥५१॥ टाळी पिटोनी उठे वोजे । म्हणे कृष्ण आलें खाजें । धावोणी आला गोपीसमाजे । उभ्या थोकविल्या गौळणी ॥५२॥ तंव वडज्या करी झगडा । एकसरें धांवला वाकुडा । पात्रें फोडिलीं कडाडा । धरुनी रोकड्या आणिल्या ॥५३॥ कृष्णें राधा धरली करीं । एका करें लोणी चोरी । एका करेकं फेडी निरी । एका करें कंचुकीं ॥५४॥ हांसों आले राधिकेसी । सोंडी गोवळ्या सलगीं कायसी । भुलली कृष्णरुपा झाली पिसी । लोणी पुसी कृष्णमुखा ॥५५॥ ऐस विनोद विचित्र केला । करीतसे घननीळा सावळा । घ्या रे आतां सामुग्री चला । अति क्षुधा लागली ॥५६॥ पाहुनी कल्पतरुची छाया । घडिया घालिती बैसावया । बैस म्हणती यदुराया । करुं काला आवडीं ॥५७॥ पेंदा घाली पत्रावळी । वडज्या सोडी मोटा जाळीं । वांकुडा बैसवीं गोपाळमंडळी । वाढिताती पत्रशाखा ॥५८॥ नानापरेंचीं पक्कान्नें । षडरस बहुत अन्नें । गोडी सांगतां अनन्यें । पसरतीं पदर इंद्रादिकीं ॥५९॥ सकळां वाढिलें परिपुर्ण । सकळ म्हणती ब्रह्मार्पण । संतासीं कळली खुण । घालिती ग्रास कृष्णमुर्खीं ॥६०॥ तंव जेवितां केली टवाळी कृष्णापुढें होती गुळपोळी । ती उचलोनी पत्रावळी । न राहे जवळी दुरी गेला ॥६१॥ वाकुल्या दावी कृष्णापुढां । नेत्रा खूणवितसे गाढा । वाकुड्यातें हाणोनि थोबाडा । धरुनी रोकडा आणिला ॥६२॥ धरिली वांकुड्याची शेंडी । उच्छेष्ट घाली तयां तोडीं । पेंदा नाचे दुपांडीं । थोगला गडी सांपडला ॥६३॥ सरलें पुढलें पक्वान्न । कृष्णें आणिलें दध्योदन । मग पेंदा म्हणे आपण । कृष्नासी पैं ॥६४॥ आवड वडज्याची थोरी । पेंदा म्हणे टाका दुरी । कां टाकितां म्हणोनी रुदन करी । बुझावी श्रीहारी स्वानंदें ॥६५॥ एकांसी दाउनी शेखीं । घालिती दुसर्‍याचे मुखीं । कां रे पोरें म्हणोनी तवकी । डोळे रोखी वांकुडा ॥६६॥ ऐसे खेळती सकळ मिळोनी । तंव देव पाहाती विमानीं । वंचलों म्हणती अभिमानी । कृष्णशेष न मिळेची ॥६७॥ नोहे श्रीकृष्णची शेषप्राप्ती । मग एकमेकंसी बोलती । गोपाळ यमुनेतीरीं येती । चला शीघ्र गती जाऊं तेथें ॥६८॥ विमानें ठेवोनी अंतराळीं । कृष्ण शेषालागीं तें वेळीं । देवीं मत्स्यरुपें धरलों । यमुनेमाजीं रिगती ॥६९॥ ब्रह्मादिक मत्स्य जालें । हें श्रीकृष्णासी कळलें । जाणोनि गोपाळां बोलें । म्हणे हात धुवुं नका ॥७०॥ सहज उदकाची वाटाळी ॥ अकर्मकार गोवळी । हात पुसिले कांबळी । एक टिरीसी पुसती ॥७१॥ उठलें घोंगडीया झाडोनी । खेळ खेळत आले वृदांवनीं । तुळही प्रदक्षणी करुनी । खोविल्या शिरीं मंजुरीया ॥७२॥ तंव इतक्यांत लोपल्या माध्यान्ह । आस्तमान गेला दिनमान । श्रीकृष्णा म्हणे वचन । चला जाऊं घराप्रती ॥७३॥ देहुडा उभा राहुनी गायी खुणविल्या वेणुधनी । टवकारिल्या चारा विसरुनी । आल्या मुरडोनीं त्वरित ॥७४॥ गाई मेळविल्या हरी । गोपाळ घालती हुंबरी । डांगा झेलिती अंबरीं । पावे मोहरी वाजविता ॥७५॥ सुदामा जाला वेत्रधारी ।\ ऐसे गोपळ गजरीं । चालिले मग झदकरी । पेंदा छरीछत्र तरुचें ॥७६॥ वडजा घेऊनि अशोक डाहाळी । वारीतसे मुखावरील धुळी । वाकुंडा फोडी कौतुकें आरोळी । ग्रामाजवळी पातलें ॥७७॥ रामकृष्ण आले ऐकोनी । उताविळ झाल्या गौळणी । रांगोळ्या नानापरी आंगणीं । घालिताती सप्रेमें ॥७८॥ नव लक्ष आरत्या करी । घेऊनि उभ्या गोपिका नारी । भावें ओवाळिला श्रेहरी । लोण उतरी यशोदा ॥७९॥ गाई निघाल्या गोठनी । गोपाळ गेले आज्ञा घेउनी । आपण प्रवेशले निजभुवनीं । सिंहासनीं बैसलें ॥८०॥ ऐसा बाळक्रीडेचा सोहळा । आनंद जाहला सकळां । एका जनार्दनी देखिला श्रीबाळक्रीडा संपविली ॥८१॥
178 जो हा उद्धार प्रसवे ॐ कार । तें रुप सुंदर विटेवरी ॥१॥ ध्याता ध्यान ध्येय जेथें पैं खुटलें । तें प्रगटलें पंढरीयें ॥२॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान प्रेमाचें आथिलें । तें रुप सानुलें पंढरीये ॥३॥ एका जनार्दनीं रुपांचे रुपस । वैकुंठनिवास पंढरीये ॥४॥
179 ज्ञातिकुळ सांडिलें आम्हीं वेंगीं । माय माहेर त्याजिलें तुजलागीं । अंग अर्पिलें अंगीचिये अंगीं । शेखीं रतलासे दासी कुब्जेलागीं ॥१॥ सर सर निर्गुणा तु अगुणाचा हरी । जवळीं असतां जालासीं कैसा दुरी । चित्त उतटे चितिंता निरंतरी । मन मावळलें न दिसे दृश्यकारी ॥२॥ तुजलागी सांडिला देहसंग । तुजविण विटला विषयभोग । जळो तुझा उपदेश सांगसी योग । आम्हा देई सप्रेम संयोग ॥३॥ एक म्हणती गे सांडा शब्द आटी । शब्दा नातुडे कोरड्या ज्ञानगोष्टी । आजिचा सुदीन श्रीकृष्नीं झाली भेटीं । हरुषें निर्भर स्वानंद भरली सृष्टी ॥४॥ एक म्हणती गे सांडा शब्दज्ञान । ध्येय जोडलें कोईसें आतां ध्यान । भज्य भजन एक झालें भजन । गेली त्रिपुटी मिथ्या मोक्षबंधन ॥५॥ एक म्हणती गे चला मांडु रासु । म्हणे उगवेल मायामय दिवसु । दैवें जोडला गे कृष्ण परमहंसु । शोधा निजतत्व सांडोनि आळसु ॥६॥ गोपी मंडळी मिळाली कृष्णापाशीं । जैशीं रश्मि मिनल्या रविबिंबासी । कृष्ण भोगितां नाठवे दिननिशीं । एका जनार्दनीं ऐक्यता प्रेमेसी ॥७॥
180 ज्या सुखा कारणें योगाभ्यास । शरीर दंड काय क्लेश । तें उभें आहे अपैस । भीमातीरीं वाळुवंटीं ॥१॥ न लगे दंडन मुंडनी आटी । योगायागाची कसवटी । मोकळी राहाटी । कुंथाकुंठी नाहीं येथें ॥२॥ न लगे अष्टांग धूम्रपान । वायु आहार पांचग्र्नि साधन । नग्न मौन एकांत स्थान । आटाआटी न करणे ॥३॥ धरुनियां संतसंग । पाहें पाहे पांडुरंग देईन । सुख अव्यंग । एका जनार्दनीं निर्धारें ॥४॥
181 तयां ठायीं अभिमान नुरे । कोड अंतरीचें पुरे ॥१॥ तें हें जाणा पंढरपूर । उभ देव विटेवरी ॥२॥ आलिंगनें काया । होतासे तया ठाया ॥३॥ चंद्रभागे स्नान । तेणें पुर्वजा उद्धरणा ॥४॥ एका जनार्दनीं शरण । पंढरी भूवैकुंठ जाण ॥५॥
182 तापत्रयें तापलीया पंढरीसी यावें । दरुशनें मुक्त व्हावें हेळामात्रें ॥१॥ दुःखाची विश्राती सुखाचा आनंद । पाहतां चिदानंद विठ्ठल देव ॥२॥ संसारीं तापलें त्रितापें आहाळले । विश्रांतीये आले पंढरीसी ॥३॥ सर्वांचे माहेर भाविकंचे घर । एका जनार्दनी निर्धान केला असे ॥४॥
183 तारुण्याचें मदें घेशी एकमेंकां झोबीं । वायां जाईल नरदेह धरीं हरीशी झोंबी ॥१॥ तरीच खेळ भला रे वायां काय गलबला । एकावरी एक खाली पडतां मारी यमाजी टोला रे ॥२॥ हातीम हात धरुनियां घालिसी गळां गळाखोडा रे । फजीत होसी खालीं पडतां हांसतील पोरें रांडा रे ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे खेळ नोहें भला रे । आपण न पडतां दुजियासी पाडी तोचि खेळिया भला रे ॥४॥
184 तिहीं त्रिभुवना ज्याची सात्त वाहे । तो चोरी करिताहे घरोघरीं ॥१॥ न कळे न कळे लाघव तयाचें । ब्रह्मादीक साचे वेडावती ॥२॥ वेद शास्त्र श्रुती कुठित पै होती । तया गौळणी बांधिनी धरुनियां ॥३॥ योग मुद्रा साध्न योगी साधिताती । तयांसि नाहे प्राप्ति हेंचि रुप ॥४॥ तें बाळरुप घेउनि वोसंगा । हालविती पई गा बाळकृष्णा ॥५॥ जयाचेनि होय तृप्ति पैं सर्वांसी । तो मागे यशोएसी दहींभात ॥६॥ दहींभात लोनी खाउनी न धाय । घरोघरीं जाय चोरावया ॥७॥ एका जनार्दनीं न कळे वैभव । दावितसे माव भोळ्या जना ॥८॥
185 तिहीं त्रिभुवनीं पातकी पीडिले । ते मुक्त जाहले पंढरीसी ॥१॥ पाहतां सांवळा अवघीयां विश्रांती । दरुशनें शांतीं पातकीयां ॥२॥ एका जनार्दनीं पाहतां रुपडे । कैवल्य उघडे विटेवरी ॥३॥
186 तिहीं त्रिभुवनीं सत्ता जयाची । तो गोपाळाचि उच्छिष्टे खाय ॥१॥ खाउनी उच्छिष्ट तृप्तमय होय । यज्ञाकडे न पाहे वांकुडे तोंडे ॥२॥ ऐसा तो लाघव गोपाळांसी दावी । एका जनार्दनीं काहीं काळों नेदी ॥३॥
187 तीन अक्षरी जप पंढरी म्हणे वाचा । कोआटी या जन्मांचा शीण जाय ॥१॥ युगायुगीं महात्म्य व्यासें कथियेलें । कलियुगें केलें सोपें पुंडलिकें ॥२॥ महा पापराशी त्यांची होय होळी । विठ्ठलनामें टाळी वाजवितां ॥३॥ एका जनार्दनीं घेतां पैं दर्शन । जद जीवा उद्धरण कलियुगीं ॥४॥
188 तीरा आणिला श्रीकृष्ण । हरिखे यमुना झाली पुर्ण । चढ़े स्वानंदजीवन । चरण वंदनार्थ ॥१॥ वसुदेव म्हणे कटकटा । यमुना रोधिली वाटा । कृष्ण असतां निकटा । मोहं मार्ग न दिसे ॥२॥ कृष्ण असतां हातीं । मोहें पडली भ्रांति । मोहाचिये जाती । देव नाठवे बा ॥३॥ मैळ मुकी वेताळ । मारको मेसको वेताळ । आजी कृष्ण राखा सकळ । तुम्हीं कुळदेवतांनी ॥४॥ अगा वनींच्या वाघोबा । पावटेकीच्या नागोबा । तुम्ही माझिया कान्होंबा । जीवें जतन करा ॥५॥ हातींचा कृष्ण विसरुन । देव देवता होतों दीन । मोहममतेचें महिमान । देवा ऐसें आहें ॥६॥ मोहें कृष्णांची आवडी । तेथें न पडे शोक सांकडीं । एका जनार्दनीं पावलें परथडी । यमुनेच्या ॥७॥
189 तुझिया खेळा बहु भ्याले । नेणों ब्रह्मादिक ठकले ॥१॥ कान्होबा आमुचा तुं गडी । न सोडिसी आपुली खोडी ॥२॥ चोरी करितां गौळणी बांधिती । तुझी न कळे वेदशास्त्रं गती ॥३॥ एका जनार्दनीं शरण । आम्हीं न सोंडुं तुझे चरण रे कान्होबा ॥४॥
190 तुझी संगती नाहीं कामाची । मी सुदंरा कोवळ्या मनाची । मज दृष्टी होईल साची । मग तुझी घेइन चर्या ॥१॥ कसें वेड लाविलें कान्हों गोवळियां ॥धु॥ माझा वंश आहे मोठ्याचा तुं तंव यातीहीन गौळ्याचा । ऐक्य जालीया नांवरुअ पाचा । ठावाचि पुसलिया ॥२॥ तुझ्या अंगेची घ्रट घाणी । तनु काय दिसती वोगळवाणी । मुरली वाजविसी मंजुळवाणी । मनमोहन कान्हया ॥३॥ तुझ्या ठिकाणी अवगुणा मोठा । चोरी करुनी भरिसी पोटा । व्रजनारी सुंदरा चावटा । अडविसी अवगुणीया ॥४॥ सर्व सुकहची कृष्णासंगती । वेणुनादें गाई गोप वेधती । एका जनार्दनी हरिरुपी रमतीं । त्या व्रज सुंदरीया ॥५॥
191 तुझें श्रीमुख सुंदर । कुसुम शुभकांति नागर । कासें पीतांबर मनोहर । पाहुनी भुल पडली । करुणाघना ॥१॥ मुरली नको वाजवुं मनमोहना ॥धृ ॥ सर परता होय माघारा । देहभाव बुडाला सारा नाहीं सांसारासी थारा । भेदाभ्रम गेला । कमलनयना ॥२॥ ध्वनि मंजुळ ऐकिली कानीं । सर्व सुखां जाली धनी । एका जनार्दनीं ध्यानी मनीं । एकपणा जगजीवना ॥३॥
192 तुझ्या मुरलीचा ध्वनी । अकल्पित पडिला कानीं । विव्हळ जालें अंतःकरणी । मी घरधंदा विसरलें ॥१॥ अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ॥धृ॥ मुरली नोहे केवळ बाण । तिनें हरीला माझा प्राण । संसार केला दाणादीन । येउनि हृदयी संचरली ॥२॥ तुझ्या मुरलीचा सुर तान । मी विसरले देहभान । घर सोडोनि धरिलें रान । मी वृंदावना गेले ॥३॥ एका जनार्दनीं गोविंदा । पतितपावन परमानंद । तुझ्या नामाचा मज धंदा । वृत्ति तंव पदीं निवर्तली ॥४॥
193 त्यांचिया इच्छेसारखें करावें । त्यांच्या मागें जावे वनांतरीं ॥१॥ वनासी जाऊनी नानापरी खेळे । हमामे हुतुतु बळें गडी घेती ॥२॥ सर्वांघडी संतां सर्वावरिष्ट देव । तयावरी डाव गाडी घेती ॥३॥ अंगावरी डाव आला म्हणती गोपाळ । देई डाव सकळ आमुचा आम्हां ॥४॥ पाठीवरी बैसती देवतें म्हणती । वांकरे श्रीपति वेंगीं आतां ॥५॥ एका जनार्दनी गडियांचे मेळीं । खेळें वनमाळी मागें पुढें ॥६॥
194 त्रिगुणात्मक माडियेला डाव । सहा चार अठरा गडी वांटिले एका त्यांचे नाव ॥१॥ कान्होबा खेळूं लागोरीचा खेळ । तुम्ही आम्ही मिळूं एका ठायीं सहज होईलमेळा ॥२॥ चौदा बारा सोला पंचविसाचा करुनी मेळ । एक एका पुढे पळती अवघा हलकलोळ ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे कन्होबा खेळ अतु आवरीं । खेळ खेळतां शिणलों आम्हीं पुरे बा वेरझारी ॥४॥
195 त्रिविधपातें तापलें भारी । तया पंढरी विश्रांती ॥१॥ आणिके सुख नाही कोठें । पाहतां नेटें कोटि जन्म ॥२॥ कालाचेहि न चले बळ । भुमंडळ पंडरीये ॥३॥ भुवैकुंठ पंढरी देखा । ऐसा लेखा वेदशास्त्री ॥४॥ एका जनार्दनी धरुनि कास । पंढरीचा दास वारकरी ॥५॥
196 त्वंपद तत्पद असिपद यांवेगळा दिसे । खोल बुंथी घेऊनी विटेवरी उभा असे गे माय ॥१॥ वेडावला पुंडलिके उभा केला । तेथोनी कोठें न जाय गे माय ॥२॥ भक्तां अभयकर देतुसे अवलीळ । मेळवोनी मेळा वैष्णवांचा गे माय ॥३॥ पुंडलिकें मोहिला उभ उघाडचि केला । एका जनार्दनी ठसावला रुपेंविण गे माय ॥४॥
197 थुरकात थुरकत चालतु । राधिकेचे गळां मिठी घालितु । तयेसी चुंबन आवडी देतु । पाहतां यशोदेसी मग रडतु ॥१॥ देई देई म्हणे चेंडूवातें । म्हणोनि आसडी निरीतें । यशोदा म्हाणे राधे परते । कां गे रडविसी कृष्णा ॥२॥ राधिका म्हणे ऐका मामिसें । याचा चेंडु मजपाशी नसे । हा क्रियानष्ट बोले भलतैसें । चेंडू मजपाशी नाही आणि तुमची असे ॥३॥ कृष्ण म्हणे झाडुनी चीर दावी । राधा झाडिता चेंडू पडिला लवलाहीं । म्हणे पाहे वो माझे आई । चेंडू घेउनी आण वाहेती पाहीं ॥४॥ यशोदेनें उचलोनि घेतिला कडेवरी । चेंडू झेलितसे सव्य अपसव्य करीं । एका जनार्दनीं भाव न कळे निर्धारीं । लाजोनी ती राधा आली आपुले घरीं ॥५॥
198 दही दुध चोरुनी दे सर्वांना । ऐसें मज सांगताती । आई मज मारुं नको । नाहीं नाहीं म्या पाहिली माती ॥१॥ तें न ऐकिलें म्हणोनि मजवर । रुसले सांगाती । बळीरामही जो भेटला । तोही माझा पक्षपाती ॥२॥ एका जनार्दनीं पूर्ण कृपेनें । आम्हीं भजूं दीनराती ॥३॥
199 दिव्य तेज झळकती रत्नकीळा फांकती अगणीत लावण्या तेज प्रभा दिसती गे माये ॥१॥ कानडा वो सुंदर रुपडा गे । अंतरीं बाहेरीं पाहतां दिसे उघडा गे ॥२॥ आलिंगनालागीं मन उताविळ होय । क्षेम द्तां माझें मीपण जाय ॥३॥ मागें पुढें चहुकडे उघडे पाही । पाहावयासी गेलें मजला ठक पडले बाई ॥४॥ बाहेरी पाहुं जातां आतंरी भासे । जें जें भासेम तें तें येकीयेक समरसें ॥५॥ एका जनार्दनीं जिवीचा जिव्हाळा । एक पणें पाहतां न दिसे दृष्टीवेगळा ॥६॥
200 दिसे सगुण परि निर्गुण । आगमां निगमां न कळे महिमान । परा पश्यंती खुटलीया जाण । त्यांचे न कळे शिवाजी महिमान ॥१॥ पहा हो सांवळा नंदाघरीं । नवनीताची करीतसे चोरी । गौळणी गार्‍हाणी सांगती नानापरी ॥ त्यांचे महिमान न कळे श्रमले सहाचारी ॥२॥ कोणी म्हणती यासी शिक लावूं । कोणी म्हणती आला बाऊ । दाखवी लाघव नवलाऊ । अगम्य खेळ ज्याचा कवणा न कळे कांहीं ॥३॥ चोरी करितां बांधितीं उखळी दावें । येतो काकुळती माते मज सोडावं । एका जनार्दनी दावीं सोंग बरवें । ज्यांची कीर्ति ऐकतां अघ नासे सर्वे ॥४॥
201 दुजी येऊनी पुढें बोले ऐकें वो बाई । घुसळण घुसळितां डेरां फोडिला पाहीं ॥१॥ धांवुनि आलीं सासु मारितसें मजला । हांसतसे आपण तेथोनि पळाला ॥२॥ वांसुरें तीं साडीं मुला चिमुरे घेतो । द्या रे नवनीत म्हणोनि तया मारितो ॥३॥ लपविलें ठायीं उरों नेदी कांहीं । एका जनार्दनीं पुरें आतां बाई ॥४॥
202 दुडीवरी दुडी गौळणी सातें निघाली । गौळणी गोरस म्हणों विसरली ॥१॥ गोविंदु घ्या कोनी दामोदरु घ्या गे । तंव तंव हांसती मथुरेच्या गे ॥२॥ दुडीया माझारी कान्होंबा झाला भरी । उचंबळे गोरस सांडे बाहेरी ॥३॥ एका जनार्दनी सबलस गौळणी । ब्रह्मानदु न समाये मनीं ॥४॥
203 दुस्तर मार्ग आटाआटी । पंढरी सृष्ती तारक ॥१॥ कोणा न लगे दंडन । कायापीडन कष्ट ते ॥२॥ नको उपवास विधीचा पडदा । शुद्ध अशुद्धा न पहावें ॥३॥ मुगुटमणीं पुंडलीक । दरुशनें पातक हरतसे ॥४॥ एका जनर्दनीं निर्मळ । पंढरी स्थळ सर्वांसी ॥५॥
204 दृष्टी पाहतां भीमातरी । स्वर्गीं वास तया निरतरां ॥१॥ ऐसा तेथीचा महिमा । आणिक नाहीं दुजी उपमा ॥२॥ दक्षिन द्वारका पंढरी । वसे भीवरेचे तीरीं ॥३॥ जेथें वसे वैकुंठ देवो । एका जनार्दनीं गेला भेवो ॥४॥
205 दे दे दे मोरी कन्हया साडीछे । तुम भलो नंदजी नंदन लालसे ॥१॥ मैतो आई मथुरा हाटछे । बिगरी तु क्या धरे घाटछे कन्हया ॥२॥ ज्याकर बोलुंगी जशोदा नंदछे । तरी खोड तांडुगी हातछे कन्हया ॥३॥ एक जनार्दन बिनती करतछे । दोनो हात जोडकरछे कन्हया ॥४॥
206 देखिला अवचिता डोळा सुखाचा सागरु । मन बुद्धी हारपला झाले एककारु । न दिसे काया माय कृष्णी लागला मोहरु ॥१॥ अद्वया आनंदा रे अद्वया आनंदा रे । वेधियल्या कामिनी अद्वया आनंदा रे ॥२॥ खुटले येणें जाणें घर सासुर । नाठवे आपपर वेधियलें सुंदर । अति सब्राह्म व्यापिलें कृष्ण पराप्तर नागर वो ॥३॥ सावजी कळलें आतां लोधलें निर्गुणा । एका जनार्दनीं कृपा केली परिपुर्णा । गगनीं गिळियलें येणें उरी नुरेचि आपणा ॥४॥
207 देखे देखे ग जशोदा मायछे । तोरे छोरींयानें मुजें गारी देवछे ॥१॥ जमूनाके पानीयां मैं ज्यावछे । बीच मीलके घागरीया फोडछे ॥२॥ मैंने ज्याके हात पकरछे । देखे आपही रोवछे मायना ॥३॥ एका जनार्दन गुन गावछे । फेर जन्म नहीं आवछे मायना ॥४॥
208 देखोनिया देवभक्त । सनकादिक आनंदात ॥१॥ म्हणती जावें पंढरपुरा । पाहूं दीनांचा सोयरा ॥२॥ आनंदें सनकादिक । पाहूं येती तेथें देख ॥३॥ विठ्ठलचरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
209 देव भक्त एके ठायी । संतमेळ तया गांवीं ॥१॥ तें हें जाणा पंढरपुर । देव उभा विटेवर ॥२॥ भक्त येती लोटांगणीं । देव पुरवी मनोरथ मनीं ॥३॥ धांवे सामोरा तयासी । आलिगुन क्षेम पुसीं ॥४॥ ऐशी आवडी मानी मोठी । एका जनार्दनीं घाली मिठी ॥५॥
210 देव भक्त दोनी करिताती काला । तयांच्या सुखाला वर्णी कवण ॥१॥ धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचें । ठेवणें सदाशिवाचें खेळतसे ॥२॥ उच्छिष्ट तें काय खाय तयाचेनी होतें । नाहींकंटाळत तयालागीं ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांची आवडी । वाढवीत गोडी नित्य नवी ॥४॥
211 देव भक्त दोन्हीं तीर्थ क्षेत्र नाम । ऐसा एक संभ्रम कोठें नाहीं ॥१॥ प्रयागादी तीर्थ पहाती पाहतां । न बैसे तत्त्वतां मन माझें ॥२॥ पंढरीची ऐसा आहे समागम । म्हणोनि भवभ्रम हरलासे ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां विठ्ठल देव । फिटला तो भेव संसाराचा ॥४॥
212 देवकी करी चिंता । केवीं आठवा वांचे आतां । ऐसी भावाना भावितां । जिवीं तळमळ ॥१॥ तंव न दुखतांचि पोट । वेण न लगतां उद्धट । कृष्ण झाला प्रगट । स्वयें अयोनिया ॥२॥ हरि सुनीळ सांवळें । बाळ निजतेजे तेजाळें । देखोनि वेल्हाळे । स्वयं विस्मीत ॥३॥ ऐसें देखोनि श्रीकृष्णासी । मोहे आच्छादुं जाय त्यासी । तंव प्रकाशु तियेंसीं । कैसा आंवरेना ॥४॥ वेगीं वसुदेवातें म्हणे । तुम्हीं गोकुळांसी न्या तान्हें । एका जनार्दनें कृपा केलीं ॥५॥
213 देवकी निज उदरीं । गर्भाजी पाहे थोरी । तंव सबाह्म अभ्यंतरीं । व्यापक श्रीकृष्ण ॥१॥ अगे हा स्वतः सिद्ध हरी । स्वयंप्रकाश करीं । मीपणा माझारी । गर्भु वाढे ॥२॥ आतां नवल कैसे परी । आठवा गर्भु धरी । त्याहि गर्भा माझारीं मज मी देखे ॥३॥ दाहीं इंद्रियां माझारीं । गर्भांची वाढे थोरी । कर्म तदाकारीं । इंद्रिय वृत्ति ॥४॥ चितप्रकाशासी डोहळे । सद्रूप सोहळे । आनंद कल्लोळे गर्भू वाढे ॥५॥ तेथें स्वस्वरुपस्थिती सुखरुप प्रसुती । आनंद त्रिजगतीं परिपूर्ण ॥६॥ एका जनार्दनी । ज्ञानगर्भु सार । चिद्रुप चराचर । निखळ नांदे ॥७॥
214 देवकी म्हणे वसुदेवासी । वेगीं बाळके न्यावें गोकुळासी । घवघवीत तेजोराशी । देखे श्रीकृष्ण ॥१॥ पूर्ण प्रकाश निजतेजें । पाहतां न दिसें दुजें । तेथें कैंचे माझें तुझें । लपणें छपणें ॥२॥ सरसर अरजे दुरी । परब्रह्मा आम्हां छरीं । अहं कंसाचे भय भारी । बाधी कवणा ॥३॥ सवेचि पाहे लीळा ।मुगुट कुंडले वनमाळा । कंठीं कौस्तुभ तेजाळा । कळी तटी सुत्र ॥४॥ क्षुद्र घंटिका किंकणी । बाहु भूषणें भुषणीं । चिद्रेत्नें महामणी । वीर कंकणें ॥५॥ कमलवदन हरी । कमले नेत्रधारी । लीला कमळे करी । झेलीतसे ॥६॥ करकमळीं कमळा । सेवी चरणकमळा । ऐशी वसुदेव देखे डोळां । दिव्य मूर्ति ॥७॥ लक्ष्मी डवल उनियां जाण । हृदयीं श्रीवत्सलांछन । द्विजापदांचे महिमान । देखे दक्षिणाभागीं ॥८॥ शंख चक्रादि आयुधें चारी । पीतांबर धारी । सगुण निर्गुण हरि । समसाम्य ॥९॥ ऐसे सगुण निर्गुण भाका । पहात पहात देखा । भिन्न भेदाचि न रिघे रेखा । कृष्णापणीं ॥१०॥ एका जनार्दनीं खरें । निजरुप निर्धारें । अहं कंसाचे वावरे । मिथ्या भय ॥११॥
215 देवकी वसूदेवाकडे पाहे । तंव तो स्वानंदे गर्जताहे । येरी धावोनि धरी पाये । उगे रहा ॥१॥ जळो जळो हे तुमची बुद्धी । सरली संसारशुद्धी । कृष्ण लपवा त्रिशुद्धी । जग प्रगट न करावा ॥२॥ आतां मी करुं कैसें । भ्रतारा लागलें पिंसे । मज मायेच्या ऐसें । पुरुष ममता न धरी ॥३॥ मज मायेची बुद्धी ऐसी । म्यां आच्छादिलें श्रीकृष्णांसी । वेगें होईन तुमची दासी । अति वेगेंशीं बाळ न्यावें ॥४॥ येरु म्हणे नवल जालें । तुज कृष्णें प्रकाशिलें । त्वां केवीं अच्छादिलें । कृषरुप ॥५॥ सरसर अरजे मूढें । बोलसी तितुकें कुडें । कृष्णरुप वाडें कोडें । माया कैंची ॥६॥ येरी म्हणे सांडा चावटी । कोरड्या काय सांगू गोष्टी । गोकुळासी उठाउठी । बाळ न्यावें माझें ॥७॥ अवो कृष्णीं चिंतीसी जन्ममरण । हेंचि तुझें मूर्खपणा । कृष्णानामें जन्ममरण । समूळ निर्दळिलें ॥८॥ सरो बहु बोलाचा बडीवारु । परि निर्धारु न धरवे धीरु । या लगीं लेकरुं । गोकुळा न्यावें ॥९॥ तुम्हीं न माना माझिया बोला । वेणेंवीण उपजला । नाहीं योनिद्वारां आला । कृषाणानाथु ॥१०॥ आतां मी काय करुं वो । वसुदेव म्हणे नवलाओ । तुझ्या बोलाचा अभिप्रावो । तुझा तुमची न कळे ॥११॥ चोज कैसेवीण । ज्या नाहीं जन्ममरण । त्यासी मारील कवण । समुळ वावो ॥१२॥ जेणें मीपण आभासे । तेणें माझें मूर्खपणें तुम्हां दिसें । हें अंगींचे निजरुप पिसें । न कळें तुम्हां ॥१३॥ कृष्ण निजबोधु सुंदरा । यासी जीवें जतन करा । जाणिवेच्या अहंकारा । गुंता झणीं ॥१४॥ आतां काय मीं बोलुं शब्दू । ऐसा करितां अनुवादू । बोले खुंटला शब्दू । प्रगटला कृष्ण ॥१५॥ प्रकृति पुरुष दोन्हीं । मीनली एकपणीं । एका जनार्दनीं । बंदी मोक्ष ॥१६॥
216 देवरे देवरे मोरी घागरीया लालसे । मैं बोलुंगी जशोदा मायछें ॥१॥ हाम रहीन दसे नामछे । तारी भीद नहीं मारो कामछे ॥२॥ आकर पकरीयो मोरे आंगछे । मैं लाजे न आइगे मा अवछो ॥३॥ एका जनार्दनी तोरे पुत्रनें हामछे । फजितीन मानली आइछे ॥४॥
217 देवा परिस उदार । भक्त जाणा निर्धार ॥१॥ याजसाठीं धावें पाठीं । देत लंगोटीं आपुली ॥२॥ आपण दिगंबरची असे । भक्त वस्त्र भूषणें सौरसें ॥३॥ म्हणोनि भक्ताचा अंकित । एका जनार्दनीं तिष्ठत ॥४॥
218 देह गेह कर्म सारुनी । शेजे पहुडली निज समाधानी । कृष्ण वेणु गीत ये श्रवणीं । वृत्ति उचलली भेटी लागुनी वो ॥१॥ जीवीं लागलें हरीचें ध्यान । कांही केलिया न राहें मन । प्रेम पडीभरें येतसे स्फुदोन । हरिचरणीं तें वेधिलें मन वो ॥२॥ लाज सांडोनि जालें निर्लज्ज । सासू सासर्‍यांसी नाहीं मज काज । माया माहेर अंतरलें सहज । हरिचरणीं तो वेधलें निज वो ॥३॥ चिदाकाशींचे स्वच्छ चंदिणे । कृष्ण प्रभा ते चंद्र परिपुर्ण । ध्येय ध्याता खुंटले तेणें गुणे । एका जनार्दनीं सहज एकपणें वो ॥४॥
219 द्वारका समुद्रांत बुडविली । परी पंढरी रक्षिली अद्यापि ॥१॥ द्वारकेहुनि बहुत सुख । पंढ रीये अधिक एक आहे ॥२॥ भीमातीरीं दिंगबर । करुणाकर विठ्ठल ॥३॥ भक्तांसाठीं निरंतर । एका जनार्दनी कटीं धरिले कर ॥४॥
220 द्वारकेचा सोहळा । परणियत्नी भीमकबाळा ॥१॥ सोळा सहस्त्र युवती । अष्टनायका असती ॥२॥ पुर पौत्र अपार । भगवती तो विस्तार ॥३॥ करुनिया राधामीस । देव येती पंढरीस ॥४॥ रुक्मिनी रुसली । ती दिंडिर वनां आली ॥५॥ तया मागें मोक्षदानीं । येतां जाला दिंडीर वनीं ॥६॥ गाई गोपाळांचा मेळ । गोपाळपुरी तो ठिविला ॥७॥ आपण गोपवेष धरी । एका जनार्दनीं श्रीहरीं ॥८॥
221 द्वारकेभीतरीं । कामधेनु घरोघरीं ॥१॥ कैशी बरवेपणाची शोभा । पाहतां नयनां निघती जिभा ॥२॥ घरोघरीं आनंद सदा । रामकृष्न वाचे गोविंदा ॥३॥ ऐशी द्वारकेपरी । एका शरण श्रीहरी ॥४॥
222 धन्य पृथ्वी दक्षिन भाग । जेथें उभा पांडुरंग ।मधे शोभे पुंडलीकक लिंग । सन्मुख चांग भीमरथी ॥१॥ काय वानुं तो महिमा । दृष्टी पाहतांचि भीमा । पैलथडी परमात्मा । शिवास जो अगम्य ॥२॥ दोन्ही कर धरुनि जघनीं । वाट पाहे चक्रपाणी । एका शरण जनार्दनीं । भक्तांसाठीं घाबरा ॥३॥
223 धन्य भाग्य गोकुळींचे राज्य । जेथें क्रीडा केली यादवराजें ॥१॥ काय तें वानुं सुख आनंदु । सुख संतोष गोकुळीं परमानंदु ॥२॥ एका जनार्दनीं जगाचे जीवन । मूर्ति पाहता दिसे सगुण निर्गुण ॥३॥
224 धरितां हातीं हात न सुटे चिकाटी । पडली ती मिटाही नोहे कदा सुटी ॥१॥ वायां काय बळ वेंचितोंसी मुढा । न सुटतां हातीं हात वायां जिनें दगडा ॥२॥ ऐशी मिठी घालीअं एकदां जनार्दन पायीं । न सुटेचि कालन्नयी सर्वत्र देती ग्वाही ॥३॥ कायावाचामनें शरण एका जनार्दनीं । मिठी पडली ते न सुटे भावें चरणीं ॥४॥
225 धांवुनीं तिजी गोपिका म्हणे वो बाई । येथें रहावया लाग उरला नाहीं ॥१॥ जात होतें पाण्यां यमुने पहाटीं । अविचित येऊनियां पाठी थापटी ॥२॥ एका जनार्दनीं आणियला त्रास । नको हें गोकुळ आम्हीं जाऊ मथुरेस ॥३॥
226 न कळती भावेवीण रामकृष्ण । गोपिकांसी शीण बहुतची ॥१॥ बहुत मिळती बहुतांच्या मतां । तैशां गोपी तत्त्वतां शिणताती ॥२॥ एका जानार्दनीं प्रेमावीण देव । नकळे लाघव श्रीहरींचे ॥३॥
227 न कळती भावेवीण रामकृष्ण । गोपिकांसी शीण बहुतची ॥१॥ बहुत मिळती बहुतांच्या मतां । तैशां गोपी तत्त्वतां शिणताती ॥२॥ एका जानार्दनीं प्रेमावीण देव । नकळे लाघव श्रीहरींचे ॥३॥
228 न कळे लाघव तया मागें धांवे । तयांचे ऐकावे वचन देवें ॥१॥ देव तो अंकित भक्तजनांचा सदोदित साचा मागें धावें ॥२॥ गोपाळ आवडीं म्हणती कान्हया । बैसे याची छाया सुखरुप ॥३॥ सुखरुप बैसे वैकुंठींचा राव । भक्तांचा मनोभाव जणोनियां ॥४॥ जाणोनियां भाव पुरवी वासना । एका जनार्दनी शरण जाऊं ॥५॥
229 न देखतां कृष्णवदन । उन्मळती तयांचे नयन । न घेती अन्नजीवन । कृष्णमुख न पाहतां ॥१॥ कोठें गुंतला आमुचा कृष्ण । ऐशी जया आठवण । गायी हुंबरती अधोवदन । कृष्णमुख न पाहतां ॥२॥ सवंगडे ठायीं ठायीं उभे । कृष्णीं दृष्टी ठेवुनी लोभें । आजी कृष्ण कांहो नये । आम्हांशी खेळावया ॥३॥ ऐशी जयांची आवडी । तयां पदो नेदी सांकडी । एका जनार्दनी उडी । अंगे घाली आपण ॥४॥
230 न माये चराचरीं त्रैलोक्य उदरीं । तो यशोदेचे कडेवरी शोभतो कैसा ॥१॥ गोपवेष मिसें ब्रह्माया लाविलें पिसें । तो गोपावत्सवेंषेम शोभतो कैसा ॥२॥ एके घटिकेवरी सोळा सहस्त्र घरीं । नोवरा श्रीहरी शोभतो कैसा ॥३॥ आंगनंविण अंगे गोपी भोगिल्या श्रीरंगें । तो कृष्ण निजांगें शोभतो कैसा ॥४॥ सच्चिदानंदाघन तान्हुलें आपण । एका जनार्दन शोभतो कैसा ॥५॥
231 न लगो विषय गोपांच्या पाठीं । न संडु स्वत्मा घोंगडें काठी । विषयभोगें होईल तुटी । कृष्ण जगजेठी अंतरे ॥१॥ म्हणवोनि हुंबली बोधाची । कृष्णेची आमुची ॥धृ॥ न टाकूं प्रेम शिदोरी कुरुधनें । नेघों सायुज्य पळसपानें । विषय ताटीचें मिष्टान्न । तेणें जनार्दन न भेटें ॥२॥ ब्रह्मा सेवुं करुनी ठोमा । एका जनार्दनीं गोविलें कामा । अष्ट भोग भुलवी रमा । तोही आम्हां श्रीकृष्ण ॥३॥
232 न सांपडे हाती वाउगी तळमळ । म्हणोनि विव्हळ गोपी होती ॥१॥ बैसती समस्ता धरु म्हणोनि धावे । तंव तो नेणवें हातालागीं ॥२॥ समस्ता मिळोनी बैसती त्या द्वारें । नेणेवेचि खरे येतो जातो ॥३॥ एका जनार्दनी न सांपडेचि तयां । बोभाट तो वायां वाउगाची ॥४॥
233 नंदनवन मुरलीवाला । याच्या मुरलीचा वेध लागला ॥१॥ प्रपंच धंदा नाठवे कांहीं । मुरलीचा नाद भरला हृदयीं ॥२॥ पती सुताचा विसर पडिला । याच्यामुरलीचा छंद लागला ॥३॥ स्थावर जंगम विसरुनि गेले । भेदभाव हारपले ॥४॥ समाधि उन्मनी तुच्छ वाटती । मुरली नाद ऐक्तां मना विश्रांती ॥५॥ एका जनार्दनी मुरलीचा नाद । ऐकता होती त्या सदगद ॥६॥
234 नंदे आणिविलें उभयंता राजबिंदी । गोवळे आणि गोवळी भोवंतीं जनांची मांदी ॥१॥ येवोनि चावडीये उभयंता रडती । म्हणे नंदराव कैशी कर्मांची गती ॥२॥ अकावरी बैसोनी सांवळा गदगदां हांसें । विंदान दाविले तुज बांधिलें असे ॥३॥ आमुची तूं शेडीं काल बांधीन म्हणसी । न कळे देवाची माव देवें बांधिलें तुजसी ॥४॥ आतां माझी गती कैशीं हरी ते सांगा । करुणाभरीत देखोनि गेलें लागह वेगा ॥५॥ एका जनार्दनी करूणाकर मोक्षदानी । सहज दृष्टी पाहतां सुटली ग्रंथी दोनी ॥६॥
235 नको करुं आतां कृष्णा तु खोडीं । नाहीं म्हणोनियां दोनी हात जोडी ॥१॥ काल इचे गृहीं थोडें खादले नववीत । म्हणोनि राधिकेचे स्तनी ठेवी हात ॥२॥ येवढाचि गोळा कढिला बाहेरी । सत्य म्हणोनिया आण वाहतो हरी ॥३॥ एका जनार्दनीं विश्वव्यापक सांवळा । न कळे ब्रह्मादिकां याची अगम्य कळा ॥४॥
236 नको तु आमुचे संगतीं । बहु केलीसे फजिती । हें तुज सांगावें पा किती । ऐकती तुं नायकासी रे कान्होबा ॥१॥ जाई तु आपुली निवडी गोधनें । आम्हां न लगे तुझें येणें जाणे रे कान्होबा ॥धृ॥ तुझी संगती ठाउकी आम्हां । त्वां मारिला आपुला मामा । मावशी धाडिली निजधामा । जाणों ठावा आहेसी आम्हा रे कान्होबा ॥२॥ तुझें संगती नाश बहु । पुनः जन्मा न येऊं । एका जनार्दनीं तुज ध्याऊं । आवडीनें लोणीं खाऊं रे । कान्होबा ॥३॥
237 नको नको रे दुर देशीं । आम्हां ठेवी चरणापाशीं । मग या विरहा कोन पुसी । ऐसी इच्छा देई आम्हांसी ॥१॥ पुरे पुरे संसार विरह छंद । तेणें तुं अंतरासी गोविंद । द्वैताचा नसो देऊं बाधा । हृदयीं प्रगटोनी दावी बोध ॥२॥ विरह हरी सत्वर देवराया । परेपरता प्रगटोनि दावीं पायां । दुजें मागणें आणीक नाहीं काह्मा । एका जनार्दनीं शरण तुझिया पायां ॥३॥
238 नमो व्यासादिक कवी हे पावन । जे परिपूर्ण धन भांडाराचें ॥१॥ करुनी उपदेश तारिलें बहुतां । उपदेश तत्त्वतां चालतसे ॥२॥ एका जनार्दनीं तुमचा मी दास । येवढी ही आस पुरवावी ॥३॥
239 नव लक्ष गोपाळ यमुनेतटीं । उभे राहुनी दृष्टी पाहताती ॥१॥ खल्लाळाचा शब्द कानीं तो ऐकिला । पेंदा पुढें झाला सरसाउनी ॥२॥ पेंदा म्हणे गडिया आपणा पाहुनी यमुना । हुंबरी घेती जाणा पहा पहा ॥३॥ एका जनार्दनीं पाहुनिया देव । करितां उपाव नवलाचा ॥४॥
240 नवल ती कळा दावी गोपिकांसी । लोणी चोरायासी जातो घरा ॥१॥ धाकुले संवगडे ठेवुनि बाहेरी । प्रवेशी भीतरीं आपणची ॥२॥ द्वारा झाकानियां बैसती गोपिका । देखियला सखा गोपाळांचा ॥३॥ एका जनार्दनीं धावुनि धरति । नवल ते रिती करितसे ॥४॥
241 नवल ती कळा दावी गोपिकांसी । लोणी चोरायासी जातो घरा ॥१॥ धाकुले संवगडे ठेवुनि बाहेरी । प्रवेशी भीतरीं आपणची ॥२॥ द्वारा झाकानियां बैसती गोपिका । देखियला सखा गोपाळांचा ॥३॥ एका जनार्दनीं धावुनि धरति । नवल ते रिती करितसे ॥४॥
242 नानापरी समजवितें न परी राहे श्रीहरी । दहींभात कालवोनि दिला वेगीं झडकरीं । कडेवरी घेऊनियां फिरलें मी द्वारोद्वारीं ।१॥ राधे राधे राधे राधे घेई शामसुंदरा । नेई आतां झडकरीं आपुलिया मंदिरा ॥धृ॥ क्षणभरी घरीं असतां करी खोडी शारंगपाणी । खेळावया बाहेरीं जातां आळ घेती गौळणी । थापटोनि निजवितां पळोनि जातो राजद्वारा ॥२॥ राधा घेउनि हरिला त्वरें जात मंदिरीं । हृदयमंचकीं पहुडाविला श्रीहरीं । एका जनार्दनीं हरीला भोगी राधा सुंदरीं ॥३॥
243 नाभीकमळी जन्मला ब्रह्मा । तया न कळे महिमा ॥१॥ पंढरी क्षेत्र हें जुनाट । भुवैकुंठ साजिरीं ॥२॥ भाळे भोळे येती आधीं । तुटती उपाधी तयांची ॥३॥ एकपणें रिगतां शरणा । एक जनर्दनीं तुटे बंधन ॥४॥
244 निज पैसा समरसें । गोकुळा आली द्वेषे । कृष्णामुखीं विषें । निर्विष जाली ॥१॥ सोडीं सोडीं बा कान्हा । आक्रंदे पुतना । मागुती जनार्दना । मी न ये येथें ॥२॥ कृष्ण स्वानंदाचा कंदु । कंसासी विरोधु । विषय विषा पाजुं । पुतना आली ॥३॥ मी म्हणे बाळ तान्हें । त्वा शोषिलें जीवें प्राणें । मागुतें येणें । खुटलें बापा ॥४॥ ऐसा कैसा रे होसी । मी तुझी रे माउशी । परतोनी गोकुळासी । मी नये बापा ॥५॥ ऐसा कैसा बाळ । माझ्या शोखिल्या जीवनकळा । यशोदा वेल्हाळा । वाचली कैसी बा ॥६॥ एका जनार्दनी । द्वेषाच्या भावना । सायुज्यसदना । अरि वर्ग ॥७॥
245 नित्य घडे चंद्रभागे स्नान । श्रीविठ्ठलदरुशन ॥१॥ त्याच्या पुण्या नोहे लेखा । पहा द्रुष्टी पुंडलिका ॥२॥ उजवें घेतां राऊळासी । जळती पातकांच्या रासी ॥३॥ संतांसवें कीर्तन करितां । आनंदे टाळी वाजवितां ॥४॥ मोक्ष जोडोनियां हात । तयाची वाट तो पहात ॥५॥ धन्य पंढरीचा संग । एक जनार्दनीं अभंग ॥६॥
246 नित्य तो सोहळा करिताती सुरवर विचार पहावयाला देव येतो ॥१॥ अंतरी सुरवर विचार करिती । काला श्रीपती करित स्वयें ॥२॥ उच्छिष्ट प्रसाद सेवुम धणीवरी । मत्स्यरुप निर्धारी घेती सर्व ॥३॥ एका जनार्दनीं जाणतसे खुण । म्हणोनि विंदान आरंभिलें ॥४॥
247 निमासुर वदन । शंखचक्राकित भूषण । शोभवते राजीवनयन । राधेजवळी ॥१॥ नवल मांडिलें विंदान । वेदां न कळे महिमान । वेडावली दरुशने । न कळे तयां ॥२॥ रत्‍नजडित पर्यंकीं । पहुडले हर्ष सुखीं । नवल जाहलें तें ऐकीं । सासू आली घरां ॥३॥ वृद्धा म्हणे राधेशीं । दार उघड वेगेंशी । गुह्मा गोष्टी बोलसी । कवणाशीं आंत ॥४॥ राधा म्हणे मामिसे । गृहामध्यें कृष्ण असे । मज गमावया सरिसें । आणिला घरीं ॥५॥ क्षणभरी स्थिर रहा । भरले पायें आत न या । भोजन जाहलीया । उघडितें द्वार ॥६॥ म्हणे कृष्णा आतां कैसें । दारीं वृद्धा बैसलीसे । लज्जा जात अनायासें उभयतांची ॥७॥ कृष्ण म्हणे राधेसी । मंत्र नाठवे मजसी । काय उपाय गोष्टिसी । सांगे तूं मज ॥८॥   नेणो कैशी पडली भुली । मंत्र चळला या वेळीं ऐकोनि राधा घाबरली । दीनवदन ॥९॥ करुणा वचनें बोले राधा । विनोद नोहे हा गोविंदा । माझी होईल आपदा । जगमाजीं ॥१०॥ भक्तवत्सल मनमोहन । शरण एका जनार्दन । ऐकोनि राधेचें वचन । सान जाहला ॥११॥
248 निराकाराचा आकार झाला । त्यांतच माझा पिंगा जन्मला । निराकारासी घेऊन आला ॥१॥ माझा पिंगा घालितो धिंगा ॥धृ॥ पिंग्यापासुन शंकर झाला । ढवळ्या नदींवर बसुन आला । माझ्या पिंग्यानें धक्का दिला । माझा ॥२॥ पिंग्यापासुन मच्छ झाला । शंकसुराचा प्राण घेतला । चारी वेद घेउनी आला ॥माझा ॥३॥ पिंग्यापासुन कूर्म झाला । पर्वत पाठीवर घेतला । चौदा रत्‍नें घेऊन आला ॥माझा ॥४॥ पिंग्यापासुन वराह झाला । हिरण्याक्षाचा प्राण घेतला । पृथ्वी वरती घेऊन आला ॥ माझा ॥५॥ पिंग्यापासुन नरसिंह झाला । हिरण्यकश्यप दैत्य वधिला । प्रह्लाद भक्त रक्षिला ॥ माझा ॥६॥ पिंग्यापासुन वामन झाला । बलीदान मांगु लागला ॥ बळी पाताळीं घातला ॥ माझा ॥७॥ पिंग्यापासुन भार्गव झाले । मातेचें शिर छेदियेलें । अवघे राजे नाहीसे केलें ॥ माझा ॥८॥ पिंग्यापासुन राम झाले । पितृवचन सांभाळिलें । रावण कुंभकर्ण मरिले ॥ माझा ॥९॥ पिंग्यापासुन कृष्ण झाला । कंसाचा प्राण घेतला ॥ गोकुळ सोडुन मथुरेसी आला ॥ माझा ॥१०॥ पिंग्यापासुन बौद्ध झाला । दिलें जगन्नाथ नांव त्याला । भक्तांनी दहींभात चारिला ॥ माझा ॥११॥ ऐसा निराकाराचा पिंगा । त्यांत माझा श्रीरंगा । एका जनार्दनीं पाडुरंग । माझा पिंगा घालितो धिंगा ॥१२॥
249 निर्गुण सगुण श्रुतीसी वेगळें । तें रुप सांवळें गोकुळीं वसे ॥१॥ डेळियांची धनी पाहतां न पुरे । तयालागीं झुरे चित्त माझें ॥२॥ वेडावलीं दरुशनें भांडती अखंड । वेदांचे तें तोंड स्तब्ध जाहलें ॥३॥ एका जनार्दनीं सांवळें सगुण । खेळतसे जाण वृदांवनीं ॥४॥
250 निळी कांच भूमीं खेळे वनमाळी । पाहिलें प्रतिबिंब कृष्णं तया न्याहाळीं ॥१॥ रडूं घेतलें रडूं घेतलें । समजावी यशोदा परी रडूं घेतलें ॥२॥ दे मज खेळावया भानु । आन नको कांही दुजा छंद मनु ॥३॥ एका जनार्दनीं देव छंद धरी गा । समजावी यशोदा परी न राहे उगा ॥४॥
251 नीच कामें न धरी लाज । धांवें देखोनि भक्तांचे काज । ऐसा सांवळां चतुर्भुज । रुप धरी गोजिरें ॥१॥ उच्छिष्ट गोपाळांचे खाये । वळत्या त्यांचे देणे आहे । राखुनी गोधनें माय । मागें मागें हिंडतसे ॥२॥ काला करी यमुनेतीरीं । स्वयें वाटितो शिदोरी । उच्छिषाटाचि भारी । हाव अंगें स्वीकारी ॥३॥ ऐसा कृपेचा कोंवळा । उभा यमुनेचे पाबळा । एका जनार्दनी लीळा । अगम्य ब्रह्मादिकां ॥४॥
252 पंचक्रोशीचें आंत । पावन तीर्थ हें समस्त ॥१॥ धन्य पंढरीचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥२॥ तीर्थ क्षेत्र देव । ऐसा नाहीं कोठें ठव ॥३॥ नगर प्रदक्षिणा । शरण एका जनार्दना ॥४॥
253 पंढरीचें सुख पुंडलीक जाणें । येर सोय नेणें तेथील पैं ॥१॥ उत्तम हें स्थळ तीर्थ चंद्रभागा । स्नानें पावन जगा करितसे ॥२॥ मध्यभागीं शोभे पुंडलीक मुनीं । पैल ते जघनी कटीं कर ॥३॥ एका जनार्दनी विठ्ठल बाळरुप दरुशनें ताप हरे जगा ॥४॥
254 पंढरीये अन्नादान । तिळभरी घडती जाण ॥१॥ तेणें घडती अश्वमेध । पाताकापासोनि होती शुद्ध ॥२॥ अठरा वर्न यती । भेद नाही तेथें जाती ॥३॥ अवघे रंगले चिंतनीं । मुर्खी नाम गाती कीर्तनीं ॥४॥ शुद्ध अशुद्धची बाधा । एका जनार्दनीं नोहे कदा ॥५॥
255 पटपट सांवली खेळूं या रे । सावध गड्यांनो कां वेळू लावा रे । भीड तया सोडोनी सहा गडी मारुं या रे ॥१॥ निजानंदी खेळोनी मित्रतनया हारुं या रे ॥धृ ॥ अवघे गडी एकवटोनी जाऊं दे या रे । बहु कष्टे फेरे फिरतां मन तेथें लावा रे ॥२॥ एका जनार्दनीं खेळतां ब्रह्मारुप काया रे । जेथें पाहे तेथें दिसे जनार्दनीं छाया रे ॥३॥
256 परब्रह्मा सगुण असे परात्पर । वेदादिकां पार न कळे ज्याचा ॥१॥ पाहतां पाहतां वेधलेसें मन । नये अनुमोदन शास्त्रादिकां ॥२॥ एका जनार्दनी व्यापुनी वेगळा । त्यासी गौळणी बाळा झकविती ॥३॥
257 परब्रह्मा सांवळा खेळे यमुना तीरीं । सर्वें घेउनी गायी गोपवत्स नानापरी ॥१॥ कान्होबा यमुनेसी जाऊं । आदरें दहीभात खाऊं ॥२॥ नाचती गोपाळ एक एकाच्या आवडी । परब्रह्मा सांवळा पहातसे संवगडी ॥३॥ एका जनार्दनी ब्रह्मा सारांचे सार । धन्य भाग्य गौळियांचे कृष्ण खेळे परिकर ॥४॥
258 परा पश्यंती मध्यमा वैखरी । नमियेली खरी आदिमाया ॥१॥ वसोनिया जिव्हे वदावेम कवित्व । हरिनामीं चित्त निरंतर ॥२॥ आणिक संकल्प नाहीं माझे मनीं । एका जर्नादनीं वंदितसें ॥३॥
259 पहा हो पहा वृदांवनीं आनंदु । क्रीडा करी यशोदेचा बाळ मुकुंद ॥१॥ गोपाळ गौळिणी मिळवोनि गोधनें । काला वाटी हमामा खेळे मांडोनि देहुंडें ठाणे ॥२॥ रासमंडळ रची आडवितसे गौळणी । जाऊनियां धरी राधिकेची वेणी ॥३॥ एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहतां अवघें स्वप्नवत वाव ॥४॥
260 पांघुरला घोंगडे काळें । वृदांवनीं गोपाळा माजीं खेळे । काला वाटीं निजांगें गोपाळ । खेळ खेळे नानापरी ॥१॥ पाहती देव बैसोनि विमानीं । ब्रह्मादिक ध्याती जया मनीं । आराध्यदैवत सनकादिकांचे हृदयभुवनीं । शिवादि पायावणी वंदिती ॥२॥ नानापरी विटीदांडु चेंडु । हमामा हुमरी लगोर्‍या मांडुं । नव लक्ष मिळावे सवंगडु । यमुनेथडी कळंबातळीं ॥३॥ गोंधने ठाई ठाईं बैसविले । गोपाळ सवंगडे भोवते शोभले । मध्येम घननीळ ते सांवळें । नंदरायाचें गोठुलें गे माये ॥४॥ एका जनार्दनींशरण । पाहतां देहीं विरालें देहपण । संपुर्ण जनीं जनर्दन । पाहतां पाहतां गेलों भुलोन गे मायें ॥५॥
261 पाळतोनि जाती घरासी तात्काळ । खेळ तो अकळ सर्व त्याचा ॥१॥ गोपाळ संवगडे मेळावोनि मेळा । मध्ये तो सावळा लोणी खाये ॥२॥ निजलियाच्या मुखा माखिती नवनीत । नवल विपरित खेळताती ॥३॥ न कळे लाघव करी ऐशीं चोरी । एका जनार्दनी हरीं गोकुळांत ॥४॥
262 पावन क्षेत्र पंढरपुर । पावन तीर चंद्रभागा ॥१॥ पावन संत पुडलीक । पावन देख श्री विठ्ठल ॥२॥ पावन देह गेलीया तेथें । होती जीवनमुक्त सर्व जीव ॥३॥ एका जनार्दानीं पावन । पावन पंढरी अधिष्ठिन ॥४॥
263 पाहिला नंदाचा नंदन । तेणें वेधियलेम मन ॥२॥ मोरमुकुट पितांबर । काळ्या घोंगडीचा भार ॥२॥ गोंधनें चारी आनंदे नाचत । करी काला दहीं भात ॥३॥ एका जनार्दनीं लडीवाळ बाळ तान्हा । गोपाळांशीं कान्हा खेळे कुंजवना ॥४॥
264 पाहुनियां पंढरीपुर । मना आनंद अपार ॥१॥ करितां चंद्रभागें स्नान । मना होय समाधान ॥२॥ जातां पुंडलीकाचे भेटीं । न माय आनंद त्या पोटीं ॥३॥ पाहतां रखुमादेवीवर । मन होय हर्षनिर्भर ॥४॥ पाहा गोपाळपूर वेणूनाद । एका जनार्दनी परमानंद ॥५॥
265 पाहुनियां हरी गोपाळांचे चोज । म्हणे येणें तो निर्वाणीचें निज मांडियले ॥१॥ मेठा खुंटीं येउनी हुंबरी घालिती । खर तोंडाप्रती येती जाहली ॥२॥ कळवळला देव जाहालासे घाबरा । मुरली अधरा लावियेली ॥३॥ मुरलीस्‍वरे चराचरी नाद तो भरला । तेणें स्थिर झाला पवनवेंगीं ॥४॥ यमुनाहि शांत झाली तेच क्षणीं । म्हणे चक्रपाणी सावध व्हा रे ॥५॥ पेंदीयानें तो शब्द ऐकिला कानीं । एका जनार्दनीं स्थिर झाला ॥६॥
266 पाहुनी कृष्णासी आनंद मानसी प्रेमभरित अहर्निशीं कृष्णनामें ॥१॥ आजीं कां वो कृष्ण आला नाहीं घरां । करती वेरझारा नंदगृहीं ॥२॥ भलतीया मिसें जातीं त्या घरासी । पाहतां कृष्णासी समाधान ॥३॥ एका जनार्दनीं वेधल्या गौळणी । तटस्थ त्या ध्यानीं कृष्णाचिया ॥४॥
267 पिंगा बाई पिंगा गे । अवघा धांगडधिंगा गे ॥१॥ सांडोनी संतांची गोडी गे । कासया पिंगा जोडी गे ॥१॥ नको घालूं पिंगा गे । तुम्हींरामरंगी रंगा गे ॥३॥ एका जनार्दनीं पिंगा गे । कायावाचा गुरुचरणीं रंगा गे ॥४॥
268 पुंडलिकापुढें सर्वेश्वर । उभा कटीं ठेउनी कर ॥१॥ ऐसा पुंडलिकापुढें हरी । तो पुजावा षोडशोपचारी ॥२॥ संभोवता वेढा संतांचा । आनंद होतो हरिदासांचा ॥३॥ एका जनार्दनीं देव । उभा विटेवरी स्वयमेव ॥४॥
269 पुष्पावती चंद्रभागे । करितां स्नान भंगे दोष ॥१॥ पाहतां पुंडलीक नयनीं । चुके जन्म नये अयनीं ॥२॥ घेतां विठ्ठलदरुशन । होती पातकी पावन ॥३॥ करितां प्रदक्षिना । पुन्हा जन्म नाहीं जांणा ॥४॥ एका जनार्दनीं शरण । कळस पाहतां मुक्त जाण ॥५॥
270 पूर्वापार परंपरा । संत सोयरा वानिती ॥१॥ सांगे कृष्ण उद्धावासी । सुखमिरासी पंढरी ॥२॥ स्वयें नांदे सहपरिवार । करीत गजर भक्तिचा ॥३॥ संत सनकादिक येती । भावें वंदिती श्रीचरण ॥४॥ एका जनार्दनीं वेधलें मन । नुठें बैसलें तें तेथुन ॥५॥
271 पूर्वापार श्रीविठ्ठलमूर्ति । ऐसे वेद पै गर्जती ॥१॥ भक्त पुंडलीका निकट । वसतें केलें वाळुवंट ॥२॥ गाई गोपाळांचा मेळ । आनंदे क्रीडे तो गोपाळ ॥३॥ ऐसा स्थिरावला हरी का जनार्दनी निर्धारीं ॥४॥
272 पेंदा म्हणे देवा बाऊ तो पळाला । आमुचे भेणेम गेला देशोधडी ॥१॥ देव म्हणे गोपाळ धन्य तुम्हीं बळी । पळविला बळी बाऊ तुम्हीं ॥२॥ ऐसें समाधान करी मनमोहन । एका जनार्दनीं चरणीं लागे ॥३॥
273 प्रथम मत्स्यावतारीं तुमचें अगाध चरित्र । न कळे ब्रह्मादिकां वैष्णव गाती पवित्र ॥१॥ उठोनि प्रातःकाळीं गौळणीं घुसळन घुसळिती । गाती कृष्णाचे पोवाडे हृदयीं परोपरी ध्याती ॥२॥ द्वितीय अवतारीं आपण कच्छरुप झाला । सृष्टी धरुनी पृष्ठी शेवटी सांभाळ केला ॥३॥ तृतीय अवतारीं आपण वराहरुप झाला । धरणी धरुनी दाढे हिरण्याक्ष वधिला ॥४॥ चतुर्थ अवतारीं आपण नरहरि रुप । रक्षुनि प्रल्हाद वधिला हिरण्यकश्यप ॥५॥ पांचवें अवतारीं आपाण वामन झाला । बळी घालुनि पाताळीं शेखीं द्वारपाळ ठेला ॥६॥ सहावे अवतारीं आपण परशुराम झाला । धरुनी परशु हातीं सहस्त्रभुजा वध केला ॥७॥ सातवें अवतारी आपण दाशरथी राम । वधोनी राव्ण कुंभकर्ण सुखी देव परम ॥८॥ आठवें अवतारी आपण अवसुदेवाघरीं । वधोनि कंसादिक असुर मारिले भारीं ॥९॥   नववे आवतारीं आपन बौद्धरुप झाला । धरुनियां मौन भक्तघरीं राहिला ॥१०॥ दहावए अवतारीं आपण झालासें वारु । एका जनार्दनीं वर्णिला त्याचा बडिवारु ॥११॥
274 प्रभासादि क्षेत्रें सप्तपुर्‍या असती । परी सरी न पावती पंढरीची ॥१॥ दरुशनें चित्त निवे पाहतां बरवें । शंख चक्र मिरवे चहुं करीं ॥२॥ पीतांबर परिधान वैजयंती माळा । शोभे सोनसळा अंगावरी ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां रुपडें । उभें तें उघडें विटेवरी ॥४॥
275 प्रयागादि क्षेत्रें आहेत कल्पकोडी । तया आहे खोडी एक एक ॥१॥ मुंडन ती काया निराहार राहणें । येथेम न मुंडणें काया कांहीं ॥२॥ म्हणोनी सर्व तीर्थामाजी उत्तम ठाव । एका जनार्दनीं जीव ठसावला ॥३॥
276 प्रयागादि तीर्थे आहेत समर्थ । परी पुरती मनोरथ पंढरीये ॥१॥ बहुत ते साक्ष देती या स्थळासी । सदा तो मनासी शिव ध्याये ॥२॥ आनंद सोहळा त्रैलोक्य अगाध । पंढरीये भेदाभेद नाहींसत्य ॥३॥ एका जनार्दनी क्षेत्रवासी जन । देवा ते समान सत्य होती ॥४॥
277 फणस जंबीर कर्दळी दाटा । हातीं घेऊनि नांरगी फाटा ॥१॥ वारियाने कुंडलें हाले । डोळे मोडित राधा चाले ॥२॥ राधा पाहून भुललें हरी । बैल दुभें नंदाघरी ॥३॥ हरी पाहूनि भुलली चित्ता । राहा घुसळी पडेरा रिता ॥४॥ मन मिनलेंसें मना । एका भुलला जनार्दना ॥५॥
278 फुगडी घाली मीपणाची । वेणी गुंफी त्रिगुणाची ॥१॥ चाड नाहीं कोनाची । आण सदगुरुचरणांची ॥२॥ फुगडी घाली आज गे । नाचू सहजा सहज गे ॥३॥ एका जनार्दनीं निज गे । वंदू संतचरणरज गे ॥४॥
279 बहु क्षेत्रें बहु तीर्थ । बहु दैवतें असतीं ॥१॥ परी नये पंढरीराम । वाउगा श्रम होय अंतीं ॥२॥ देव भक्त आणि नाम । ऐसें उत्तम नाहीं कोठें ॥३॥ एका जनर्दनी तिहींचा मेळ । पाहतां भूमंडळ पंढरीये ॥४॥
280 बहु खेळतं खेळ । कळॊं आले सकळ । शेवटीं तें निर्फळ । जालें बाळकृष्ण ॥१॥ कान्होबा पुरे पुरे आतां खेळा । येता जातां श्रम जाला रे कान्होबा ॥धृ ॥ आम्हीं न खेळु विटिदांडुं । भोवरं लागोर्‍या रे चेंडु । एकीबेकीतें सांडुं । मीतूपण अवघें खंडुं रे कान्होबा ॥२॥ लक्ष लावुं तुझे खेळा । न गुंतु आणिका चाळा । एका जानर्दनीं पाहुं डोळां तुझ्या खेळाची अगम्य लीला रे कान्होबा ॥३॥
281 बहु मार्ग बहुतापरी । परी न पावती सरी पंढरीची ॥१॥ ज्या ज्या मार्गे जातां वाता । कर्म कर्मथा लागती ॥२॥ जेथें नाहीं कार्माकार्मा । सोपें वर्म पंढरीये ॥३॥ न लगे उपास तीर्थविधी । सर्व सिद्धि चंद्रभागा ॥४॥ म्हणोनि पंढरीसी जावें । जीवेभावें एका जनार्दनी ॥५॥
282 बहुत जन्में विरहें पीडली । नेणो कैसी स्थिर राहिली । मन अशा गोविंदी वेधिली । तो मध्यमा वैखारीये गुंतलो वो ॥१॥ चारी वाचा परता सावळां । विरहिनीसी छंद लागला । चौपरता कोठें गुंतला । तेंणों आम्हीं अबला वो ॥२॥   विरह जाईल कैशा परी । पुर्वपुण्या सुकृत पदरीं । एका जनार्दनीं भेटलें हरी । तैं विरह नोहे निर्धारी ॥३॥
283 बहुत तीर्थ क्षेत्रें बहुतापरी । न पावती सरी पंढरीची ॥१॥ वाहे दक्षिणभाग भीमा । पैल परमात्मा विटेवरी ॥२॥ मध्य स्थळीं पुडंलीक । दरुशनें देख उद्धार ॥३॥ वाहे तीर्थ चंद्रभागा । देखतां भंग पातकां ॥४॥ एका जनार्दनीं सार । क्षराक्षर पंढरी हे ॥५॥
284 बहुता काळाचें हें क्षेत्र । सकळ देवांचें माहेर । सकळ संतांचे निजमंदिर । तें हें पंढरपुर जाणावें ॥१॥ धन्य पंढरीचा महिमा । नाहीं आणीक उपमा । जेथें वास पुरुषोत्तमा । रुक्मिणीसहित सर्वदा ॥२॥ धन्य भक्त पुंडलीक । सकळ संताचा नायक । एका जनार्दनीं देख । श्रीविठ्ठल आवडी ॥३॥
285 बारा सोळा अठरा गडियांचा मेळा । मांडियेला डाव कोण आवरीं तयाला ॥१॥ खेळा भाई विटिदांडु । खेळा भाई विटिदांडु । खेळ खेळतां परी बरा नोहे सहज दांडु ॥२॥ पांच सात बारा नव तेरा यांची नका धरुं गोडी । खेळ खेळता दांत विचकुन पडाल घशींतोंडीं ॥३॥ एका जनार्दनीं काय वाचा शरण रिघां पायीं । खेळ तो अवघा सोपा मग प्रेमा उणें नाहीं ॥४॥
286 बाळ कृष्ण रांगे नंदाघरीं । चोरी करी घरोघरीं गौळणी धरूनिया करीं । घेऊन नंदमंदिरा आली ॥१॥ गार्‍हाणे सांगती अबला नवलविंदान तयाची ती कळा । हांसत उभा यशोदे जवळा पाहूनियां बाळा चाकाटली ॥२॥ राहिलें बोलणें चालणेंनिवांत । कृष्णरुपी वेधलें चित्त । एका जर्नादनीं समाधिस्त । द्वैताद्वैत विसरली ॥३॥
287 बाळ रांगणें रांगतु । दुडदुडां पुढें पळतु ।धरितां तो न कळें मातु । वेदशास्त्रीं जया ॥१॥ तो बाळरुपें नंदाघरीं । खेळ खेळे नानापरी । न कळे लाघव निर्धारी । इंद्रादिकां गे माय ॥२॥ लोणी चोरावया घरोघरीं जाय । दहीं दूध तूप लोणी आपण खाय । त्यांचे सुनेचे मुखा हात पुशी वो माय । ऐसे करुनियां पळोनी जाय ॥३॥ वासुरें सोडी घरीं जाऊन । मुलांसि उठवी चिमटुन । माथणी रांजणा करी चुर्ण । ऐसे विंदान करुनी पळे ॥४॥ शेजे असता उभयतं । जाय सोवळ्यातुन तत्त्वतां । दाढी वेणी बांधी सर्वथा । जाय परता पळोनी ॥५॥ ऐशा खोडी करी नानापरी । नटनाटक वैकुंठ जिव्हारी । एक जनार्दनीं नवल परी आगमां निगमां न कळे परोपरी ॥६॥
288 बैसविती हरी अस्त्र घडीवरी । पूजा करती वरी पुष्पपत्रें ॥१॥ धाउनी गळां पाले माळा त्या वाहाती । गजरें नाचती पुढें येक ॥२॥ टिरीया माडिया वाजविती पाय । हरुषें नाचताहे देवराया ॥३॥ ऐसें नित्यानित्य क्रीडा ते करिती । देव ते पाहाती विमानीं तें ॥४॥ म्हणताती देव वंचलों या सुखा । एका जनार्दनीं देखा गोवियलें ॥५॥
289 बैसोनियां निवांत घालिसी उमान । एका हरिविण सर्व वायां न धरी गुमान ॥१॥ नको खेळ खोटा सांडीं मनाचा ताठा । उमान गुमान दोन्हीं न कळे होतील जगीं चेष्टा ॥२॥ उ म्हणनें उकार रे मा म्हणणें मकार रे । न म्हणणे नश्वर देह या तिहींचा आकार रे ॥३॥ एका जनार्दनीं उमार रें । सांगो जातां न कळे खुण तया म्हणिजे गुमान रे ॥४॥
290 बैसोनी कळंबातळीं । गडी मिळाले सकळीं । मिळोनी गोपाळीं । करती काला ॥१॥ नानापरीचीं पक्कान्नें । वाढिताती उत्तम गुणें । सर्वां परिपुर्ण । मध्ये शोभे सांवळा ॥२॥ वडजा वांकुडा पेंदा । आणि सवंगडी बहुधा । काल्याच्या त्या मुदा । घेती आपुलें करीं ॥३॥ लोणचें ते नानापरी । वाढिताती कुसरीं । सर्व वाढिलें निर्धारी । परिपुर्ण अवघीयां ॥४॥ एका जनार्दनीं म्हणे । कृष्ना कवळ तुं घेणे । गडियांसी देव म्हणे । तुम्हीं घ्यावा आधीं ॥५॥
291 बोला बोल विरहिणी बोले । गगनी चांदणे शुद्ध शोभलें । त्यामाजीं घनसांवळे खेळे । कर्मदशें वियोग जाला बळें ॥१॥ दावा गे दावा गे कृष्णवदन । विरहाचें दुःख् दारुण कोण्या कर्में झालें खंडन । कां हो यदुनंदन न बोले ॥२॥ विरहतांपे तापलं भारीं । कोण आता दुजा निवारी । श्रीगुरु भेटला झडकरी । एका जनार्दनी दाविला श्रीहरी ॥३॥
292 ब्रह्मा कैसें वेडावलें गे बाइये ॥धृ॥ निर्गुण होतें सगुणा आलें । त्रिभुवन उद्धारित्ने बाईयें ॥१॥ घेऊनि वसुदेव गोकुळा नेलें । यशोदेने खेळविलें गे बाईये ॥२॥ एका एकपण तेंही नेलें । जनीं जनार्दनें केलें गे बाईये ॥३॥
293 ब्रह्मादिक वेडे जयासाठीं होती । तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी ॥१॥ कवाड ते जैसें आहे तैशापरी । येतो जातो हरी न कळेचे ॥२॥ पाळती पाहतां ब्रह्मांड सकळ । तयाचा प्रतिकाळ करीतसे ॥३॥ एका जनार्दनीं चोरीचें तेंमीस । हरित सारांश नवनीत ॥४॥
294 ब्रह्मादिकां न कळे तें रुप सुंदर । गोकुळीं परिकर नंदाघरीं ॥१॥ रांगणां रांगतु बाळलीले खेळतु । दुडदुडां धांवतु गायीपाठीं ॥२॥ गौळणीचे घरीं चोरुनि लोणी खाये । पिंलंगतां जाये हतीं न लगे ॥३॥ एका जनार्दनी त्रैलोक्यां व्यापक । गाई राखे कौतुक गौळियांसी ॥४॥
295 भक्तांचा पुरवी लळा । तो सांवळा श्रीकृष्ण ॥१॥ उचलिला पर्वतगिरी । नाथिला काळ्या यमुनेतीरीं ॥२॥ अगबग केशिया असुर । मारिला तो कंसासुर ॥३॥ उग्रसेन मथुरापाळ । द्वारका वसविलीं सकळ ॥४॥ द्वारकेमाजीं आनंदघन । शरण एका जनार्दनी ॥५॥
296 भक्तांसी सान न धरीच मान । खाय भाजीपान भाविकांचें ॥१॥ उच्छिष्टांची आस धरुनिया जीवीं । गोकुळीं तें दावी चोज सर्व ॥२॥ खेळे विटिदांडुं हमामा हुंबरी । वाजवी मोहरी सवंगडियासी ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । म्हणोनि तिष्ठत उभा असे ॥४॥
297 भक्ति गोकुळी नवविधा नारी । गजरे चालती भारी वो । सुनीळ जळीं अति संतोषं । क्रीडाती यमुनातीरीं वो ॥१॥ स्थिर स्थिर माधवा विआर धरीं । आम्हीं परात्पर परनारी । वासना वास अलक्ष लक्षोणी । दह्माची करिसी चोरी रे ॥२॥ आकंठ मग्न सुनीळ निरी । घनसांवळा देखोनि वरी । येथोनि निघतां लाज मोठी । विनोद न करी रे ॥३॥ लाज सांडोन धरा चरण । तंव मी होईन प्रसन्न । एका जनार्दनीं निःशंक झाल्या । जीवींची जाणुनि खुण वो ॥४॥
298 भागीरथी आणि भीमरथी वदतां । समान तत्वतां कलीमाजीं ॥१॥ प्रातःकाळीं नमस्मरण जो गाय । तीर्थीं सदा न्हाये पुण्य जोडे ॥२॥ वदतां वाचें नाम घडतां एक स्नान । पुनरपि न आगमन मृत्यूलोकमें ॥३॥ एक जनार्दनीं भीमरथीं वदतां । प्रयागीं समता सरी न पवे ॥४॥
299 भाविका त्या गोपी येतो काकुळती । तुमचेनि विश्रांती मजलागीं ॥१॥ मज निराकारा आकारासी येणें । तुमचें तें ऋण फेडावया ॥२॥ दावितो लाघव भोळ्या भाविकांसी । शाहणे तयासी न सांपडे ॥३॥ एका जनार्दनीं भाविकांवांचूनी । प्राप्त नोहे जाण देव तया ॥४॥
300 भाविका त्या गोपी येतो काकुळती । तुमचेनि विश्रांती मजलागीं ॥१॥ मज निराकारा आकारासी येणें । तुमचें तें ऋण फेडावया ॥२॥ दावितो लाघव भोळ्या भाविकांसी । शाहणे तयासी न सांपडे ॥३॥ एका जनार्दनीं भाविकांवांचूनी । प्राप्त नोहे जाण देव तया ॥४॥
301 भिंगाचे भिगुलें खांद्यावर आंगुलें । नाचत तान्हुलें यशोदेचें ॥१॥ येती गौळणी करीती बुझावणी । लागती चरणी कान्होबाच्या ॥२॥ गोविंद बाळिया वाजविती टाळिया । आमुचा कान्हया देवराज ॥३॥ कडदोरा बिंद्ली वाघनखें साजिरी । नाचत श्रीहरी यशोदेचा ॥४॥ पायीं घागरीया वाक्य साजरीया । कानीच्या बाळ्या ढाळ देती ॥५॥ एका जनार्दनी एकत्व शरण । जीवें निबंलोण उतरती ॥६॥
302 भिन्न माध्यान्हीं रात्रीं नारी । विरह करी बैसोनि अंतरीं । केधवा भेटले श्रीहरी । तो नवल जालें अंतरीं वो ॥१॥ अवचित घडला संतसंग । विरहाचा झाला भंग । तुटोनि गेला द्वैतसंग । फिटला जन्ममरणाचा पांग वो ॥२॥ एका जनादनीं संतसंग । फिटला संसारपांग । विरह गेला देहत्याग । सुखें सुख झालें अनुराग वो ॥३॥
303 भुलाविलें वेणुनादें । वेणु वाजविला गोविंदें ॥१॥ पांगुळलें यमुनाजळ । पक्षी राहिले निश्चळ ॥२॥ तृणचरें लुब्ध जालीं । पुच्छ वाहुनियां ठेलीं ॥३॥ नाद न समाये त्रिभुवनीं । एका भुलला जनार्दनीं ॥४॥
304 भूली भटकी आई कान्हा तोरे गांवछे । मारो नंदनंदन चित्त जडे तोरे पावछे लालना ॥१॥ चली आई परपंच हाटसे । तुं केव धरियों मेरे वाटछे ॥२॥ आब तूं नंदनंदन लालछे । मैं गारी देऊं तुजसे लालना ॥३॥ एका जनार्दन नाम तोरे गावछे । पीरीत वसे तारे चरणछे लालना ॥४॥
305 भोळे ते साबडे गोपिका ते भावें । चुंबन बरवें देती तया ॥१॥ यज्ञमुखीं तोंड करी जो वाकुंडें । तो गोपिकांचे रोकडें लोणी खाये ॥२॥ घरां नेऊनियां घालिती भोजन । पंचामृत जाण जेवाविती ॥३॥ एका जनार्दनीं व्यापक तो हरी । गोकुळा माझारीं खेळ खेळे ॥४॥
306 भोळे ते साबडे गोपिका ते भावें । चुंबन बरवें देती तया ॥१॥ यज्ञमुखीं तोंड करी जो वाकुंडें । तो गोपिकांचे रोकडें लोणी खाये ॥२॥ घरां नेऊनियां घालिती भोजन । पंचामृत जाण जेवाविती ॥३॥ एका जनार्दनीं व्यापक तो हरी । गोकुळा माझारीं खेळ खेळे ॥४॥
307 भ्रम धरुनियां वायां कासया खेळसी भोवरां । यम मारी कुच्चा फिरशील चौर्‍याशीं घरां ॥१॥ पुढे शुद्धी करीं वाचें स्मरे हरी । वायां भ्रमें फिरशी गरगरां पडसी मायाफेरी ॥२॥ एका वारी एक मारिताती घाय । दया नाही येत कोणाखाली न ठेविती पाय ॥३॥ एका शरण जनार्दनीं तरीच चुके फेरा । नाहींतरी फिरशी गरगरां ॥४॥ मेळवीं संवगंडे खेळतसे बिन्दी । शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥ सांवळा सुंदरा वैजयंती हार । चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥ मुगुट कुंडलें चंदनाचा टिळा । झळके हृदयस्थळां कौस्तुभमणी ॥३॥ एका जनार्दनीं वेधलेसे मन । नाहीं भेद भिन्न गौळनींसी ॥४॥
308 मथुरेसी गोरस विकूं जातां नितंबिनी । तयामाजीं देखिली राधिका गौळणी । जवळी जाऊनियां धरिली तिची वेणी ॥१॥ सोडी सोडी कान्हा शारंगपाणी । माझीया संसारा घातलें पाणी । नांव रुप माझें बुडविलें जनीं ॥२॥ राधा म्हणे येथोनियां बहु चावट होसी । घरीं चोरी करुनियां वाटे आडविसी । ओढोनिया नेते आतां तुज मातेपाशीं ॥३॥ धरिलीं पदरीं राधा न सोडिच निरी । दान दे आमुचे म्हणे मुरारी । भोवंताली हांसती व्रज सुंदरी ॥४॥ भक्तीचियां पोटीं राधा समरस जाली । कृष्णरुप पाहूनियां देहभावा विसरली । एका जनार्दनीं राधा शेजे पहुडली ॥५॥
309 मनमोहन मुरलीवाला । नंदाचा अलबेला ॥१॥ भक्तासाठीं तो जगजेठी । कुब्जेसी रत जाला ॥२॥ विदुरा घरच्या भक्षुनि कण्या । परमानंदें धाला ॥३॥ भक्तिसुखें सुखावला । एका जनार्दनीं निमाला ॥४॥
310 महाक्षेत्र पंढरपुर । नांदे विठ्ठ्ल सचार ॥१॥ तया ठायीं सुख आहे ।संत जाणती तो लाहें ॥२॥ विश्रांतीचें स्थान । भावाभाव समान ॥३॥ दुःख दरिद्र नाहीं । वाचे म्हणतां विठाबाई ॥४॥ नोहे बाधा काळाची । ऐसी मर्यादा संताची ॥५॥ जनार्दनाचा एक म्हणे । घ्यावें पेणें तेथींचें ॥६॥
311 माई मोरे घर आयो शामछे । गावढी छोरी मारे मनछे ॥१॥ दधीं दूध माखन चुरावें हमछे । छोकारीया खिलावन देवछे ॥२॥ मारी सुसोवन लगीछे । बालन उनके पकड लीनछे ॥३॥ एका जनार्दन थारो छोडछे । वेड लगाये माई हामछे ॥४॥
312 मागें पुढें उभा हातीं घेउनी काठी वळत्या धांवे पाठीं गाईमागें ॥१॥ गोपाळ बैसती आपण धांवे राणा । तयांच्या वासना पूर्ण करी ॥२॥ वासना ते देवें जाया दिली जैशी । पुरवावी तैसी ब्रीद साच ॥३॥ ब्रीद तें साच करावें आपुलें । म्हणोनियां खेळे गोपाळांत ॥४॥ एका जनार्दनीं खेळतो कन्हया । ब्रह्मादिकां माया न कळेची ॥५॥
313 मागें विरह बहुतंशी झाला । संसारश्रम वायां केला । क्षणभरीं विश्रांती नाहीं मला । तो सदगुरु जिवलगा भेटला ॥१॥ आतां विरहाची सरली गोठीं । डोळेंभरी पाहिल्या जगजेठी । जाउनी चरणीं घालावी मिठी । विरह गेला समुळ दृष्टी ॥२॥ एका जनार्दनीं पाहतां आनंदलें । जन्म जन्मातरींचें दुःख । फिटलें विरहाविरहें हर खुंटलें । काया वाचा मनें वेधलें वो ॥३॥
314 माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा गे ॥ धृ ॥ हाती घेऊनिया फूल । अंगणीं रांगत आलें मूल । हातें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥१॥ माथां शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण । त्याला म्हणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥२॥ संगे घेऊनि गोपाळ । बाळ खळॆ आळुमाळ । पायीं पोल्हारे झळाळ । गळां माळ वैजंयती ॥३॥ एका जनार्दनीं माय । घरोघरांप्रती जाय । कृष्णा जाणावें तें काय । कोणी सांगा गे ॥४॥
315 माडियेला खेळ हमामा हुंबरी । मारुनी हिरण्यकश्यपु प्रल्हाद खेळिया करी ॥१॥ हुतुतुतु हुमरी हुतुतुतु हुमरी ॥धृ॥ जाउनी लंकेवरी खेळ मांडियेला । रावण कुंभकर्ण वधोनि शरणगत रक्षिला ॥२॥ माडियेला खेळ खेळें अर्जुनाचे रथीं । मारुन कौरव खेळे नानापरींची गती ॥३॥ धरुनी गोपेवेष मरियेला कंसमामा । नानापरी खेळ खेळे गोपाळांसी हमामा ॥४॥ येउनी पंढरेपुरा पुंडलिकासाठीं । एका जनार्दनीं कर ठेवुनीं उभा राहिला काटीं ॥५॥
316 माडियेला डाव पोरा हुतुतुतुतु । नको घालुं फेरा पोरा हुतुतुतुतु ॥१॥ लक्ष चौर्‍याशींचा डाव खेळ मांडियेला । लक्ष जाणे तोचि तेंथोनि सुटला ॥२॥ सहा चार अठरा यांचे पडों नको । एका जनार्दनी संता शरण जाई ॥३॥
317 माया जिवलगा जातां बैसली कृष्ण म्हणे गे आई ।दळण दळिण शिणलिसी हात लावुं गे आई । समान तळी तळींवरी ठेवी पावो ठायीं ॥ क्षणामाजी मी वो दळीन तु कोतुक पाहीं ॥ धृ ॥ येई गे येई गे येई गे कान्हाई हात लावी तु वहिली । जातीये जातां शिणलीये किती दळुम एकली । विसावा निजाचा तूं माझा विश्रांती साऊली । येइ गे येई गे कान्हाई ॥१॥ ब्रह्माहमस्मि टाकिया उकटी द्वैत दळी । अधिष्ठान खुंटा निश्चय दोहीं एकची बोली । पाहिले चारी निरसोनी निज नित्य न्याहाळीं । सहासी वैरण वेरुणी अठराही दळी ॥२॥ पंच भुतें पंच धान्यें दळियेलें जातां । शशी सुर्य दोन्हीं दाळिले प्राण्याच्या समता । ध्येय ध्याता ध्यान दळियेलें धारणा धरितां । पंचविषय तेही दळियेलें वैराग्य राहतां ॥३॥ वैकुठं कैलास दळिलें गती एक देशी । क्षीरसागर तोही दळियेला शेषशयनेसी । ध्रुव तोही जातां वैरिला अढळ पदेशी । जें जें देखें तेही दळियलें दृश्या दृश्यासी ॥४॥ वासना मिथ्या भाजुनि वैरिलिया जातां । मेळवणी गुण घातले समान समता । गुणा गुणातेंहि दळियेलें पहातें पाहाता ।ब्रह्मा विष्णु रुद्र दळिलें ओवीया गातां ॥५॥ कर्माकर्मा कैसें दळिलें जन्ममरणेसी । मीतुपण दोन्ही दळियलें जीवाशिवेसी । पुडे वैरिणिया कांहीं न दिसे पाहतां चौपाशी । मायो तेहीं जाता दळिली दळते दळणेसी ॥६॥ वृत्तीए तेहि निवर्तली पडियली ठका । समाधि उत्थाना दळियलें देहबुद्धीसी देखा । दळितें जातें तेंहि दळियलें कवतुक देखा । स्वभावें लीला हे खेळे जनार्दनी एका ॥७॥
318 मारी गावढी चुकलीसे भाई । देखन देखन त्रिभुवनसे आई । उन शोधन लागछे भाई । अब कैसी गत करुछे आई ॥१॥ मथुरा लमानीना मारो नामछे । गावढी देखत आई गांवछे । दृष्टी देखन नहीं मानछे । कैसें भुलाय कन्हयानछे ॥२॥ भूली भूली जाई मानछे । कहीं मिलन मोरे ध्यानछे । एका जनार्दन से पगछे । अखंड चित्त जडो गावढीछे ॥३॥
319 मार्गी जातां विस्मय करी । कैसें विंदान केले नवल परी । आम्हीं अबला घालितो अचोरी । श्रीहरी परापश्यंती वेगळा ॥१॥ नवल जाहलें काय सांगू माये । चोरी करितां धरिला पाहे । घरां घेऊनि जातां उभा आहे । न कळे विंदान सये काय सांगू ॥२॥ एका जनार्दनी परिपूर्ण । व्यापाक सर्वाठायीं संपूर्ण । जनींवनीं जनार्दनी । पाहतां महिमान न कळे ॥३॥
320 मिळती गौळणी दारवटीं बैसती । धरुं आतां निश्चिती घरामध्यें ॥१॥ येतो जातो हें न कळे त्यांची माव । वाउगीच हांव धरिताती ॥२॥ पांच सात बारा होऊनियां गोळा । बैसती सकळां टकमक ॥३॥ एका जनार्दनी न सांपडेचि तयां । योगी ध्याती जया अहर्निशीं ॥४॥
321 मिळती सकळां गौळणी ते बाळा । लक्ष लाविती डोळां कृष्णमुखा ॥१॥ धन्य प्रेम तयांचे काय वानुं वाचें । न कळे पुण्य त्यांचे आगमानिगमां ॥२॥ आदरें गृहा नेती मुख पैं धृताती । जेवूं पै घालिती दहींभात ॥३॥ एका जनार्दनीं प्रेमाची पैं लाठी । धांवुनी इठी मिठी घेतो बळें ॥४॥
322 मिळल्या गिपिका यशोदा जवळा । तटस्थ सकळां पाहताती ॥१॥ यशोमाती म्हणे आलेती कासया । वाउगें तें वायां बोलताती ॥२॥ एका जनार्दनीं बोलण्याची मात । खुंटली निवांत राहिल्या त्या ॥३॥
323 मिळल्या गिपिका यशोदा जवळा । तटस्थ सकळां पाहताती ॥१॥ यशोमाती म्हणे आलेती कासया । वाउगें तें वायां बोलताती ॥२॥ एका जनार्दनीं बोलण्याची मात । खुंटली निवांत राहिल्या त्या ॥३॥
324 मिळवोनी पांच सात गडी मेळी । डाव खेळती चेंडुफळी ॥१॥ खेळ चेंडुंचाझेला रे झेला बाळा । विचारुन खेळ खेळां न पडुं प्रवाही काळा ॥२॥ यंदु यरडु मारु नाकु मिळालेती गडी । जनार्दनीं शाण अनुपम्य धरा गोडी ॥३॥
325 मिळोनि अबळा बैसती परसद्वारी । येरे येरे कृष्णा म्हणोनि बाहाती व्रजनारी ॥१॥ ऐशा लांचावल्या नंदनंदना । घरींच बैसती लक्ष लावीत कान्हा ॥२॥ वेदश्रुतीसी न कळे जयांची शुद्धी । तो नवनीत खावया लाहे लाहे घरामाधी ॥३॥ एका जनार्दनी ब्रह्मा परिपूर्ण । पूर्ण वेधे वेधिलें आमुचे मनाचें मन ॥४॥
326 मिळोनि गोपाळ सकळीं । यमुनेतटीं खेळे चेंडुफळीं । गाई बैसविल्या कळंबातळीं । जाहली दुपारीं खेळतां ॥१॥ काला मांडिला वो काला मांडिला वो । नवलक्ष मिळोनी काला मांडिला वो ॥धृ॥ नानापरींचे शोभती दहीभात । पंक्ती बैसविल्या पेंदा बोबडा वाढीत । जो जया संकल्प तें तया मिळत । अनाधिकारिया तेथें कोणी न पुसत ॥२॥ पुर्वसंचित खालीं पत्रावळी । वाढती भक्तिभावाची पुरणपोळी । नामस्मरणाची क्षुधा पोटीं आगळीं । तेणें तृप्ती होय सहजीं सकळीं ॥३॥ ऐसे तृइप्त जाहले परमानंदें । कवळ कवळाचे निजछंदें । एक जनार्दनीं अभेदं । शुद्ध समाधिबोधें मुखसंवादें ॥४॥
327 मिळोनि गौळणी । देती यशोदे गार्‍हाणीं । खोडी करी आमुचे घरा । दारीं यशोदे ॥१॥ परां आला आमुचे घरा । दारी निजला होता म्हातारा । घेऊनि ताकाचा ही डेरा । फोडिला सैरा त्यावरीं ॥२॥ दुसरी बोले बाई यशोदे । कांही सांगते तुझिया मुकुंदें । आमचेंघरा येऊनि गोविंदे । नवल केलें साजणी ॥३॥ सुन होती माझी गर्भिणी । तीस पुसे चक्रपाणी । कैसी जाहलीली हो गर्भिणी । तव ती हांसु लागली ॥४॥ जवळा बैसला जाऊनी । पोट आहे चांचुपनी । न कळे इश्वराची करणी । तंव ती झिडकावी ॥५॥ ऐशा खोडी नानापरी । किती म्हणोनि सांगु सुंदरी । ऐका जनार्दनीं आवरी । आपुलीयां कृष्णांतें ॥६॥
328 मिळोनि धमकटी दहीं दूध ते खाती । मी खेळतां राजबिंदीं घरांत नेतीं ॥१॥ नग्न होऊनियां नाहती अबळा । डोळें झांक म्हणती मज त्यां सकळां ॥२॥ न झांकितां डोळे लोणी देती । मजसी खादलें म्हणोनि सांगती तुजासी ॥३॥ एका जनार्दनी बोलतां हांसतीं बाळा । रागावुनी मग बोला बोलती सकळां ॥४॥
329 मुरली धरुनी अधरीं । वाजवीं छंदें नानापरी । भोवतें गोपाळ नाचती गुजरीं । यमुनातीरी आनंदें ॥१॥ तो हा नंदनंदन गे माये । त्याचा वेध लागला मज सये । कांहीं केलीया तो न राहें । नाठवे देह गेह गे माय ॥२॥ स्थूल सूक्ष्म कारणांपरतां । चहु वाचा वेगळा तत्त्वतां । आगमांनिगमांही वरतां । ज्याचा वेध शिवाचिया चित्ता गे माय ॥३॥ अचोच अवेदा चोजवेना । श्रुतीशास्त्रं नये अनुमाना । शरण एका जनार्दना । एकपणें जाणा सर्वा ठायीं ॥४॥
330 मुरली मनोरह रे माधव ॥धृ॥ श्रीवत्सलांछन हृदयीं विलासन । दीन दयाघन रे ॥१॥ सुरनर किन्नर नारद तुंबर । गाती निरंतर रे ॥२॥ एका जनार्दनीं त्रिभुवनमोहन । राखी गोधन रे ॥३॥
331 मेळवीं संवगडे खेळतसे बिन्दी । शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥ सांवळां सुंदर वैजयंती हार । चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥ मुगुट कुंडले चंदनाचा टिळा । झळके हृदयस्थळी कौस्तुभमणी ॥३॥ एका जनार्दनीं वेधलेंसे मन । नाही भेद भिन्न गौळणीसी ॥४॥
332 मेळवोनि मेळा गोपाळांचा हरी । निघे करावया चोरी गोरसाची ॥१॥ धाकुल सवंगडी घेऊनि आपण । चालती रामकृष्ण चोरावया ॥२॥ ठेवियलें लोणी काढितो बाहेरी । खाती निरंतरी संवगडी ॥३॥ एका जनार्दनीं तयाचें कौतुक । न पडे ठाऊके ब्रह्मादिकां ॥४॥
333 मेळेवानि मुलें करावी हे चोरी । पूर्ण अवतारी रामकृष्न ॥१॥ पाळती पाहती एका जाणविती । सर्वे जाऊनी खाती दहींदूधा ॥२॥ सांडिती फोडिती भाजन ताकाचें । कवळ नवनीताचे झेलिताती ॥३॥ एका जनार्दनीं नाटकी तो खेळ । न कळे अकळ वेदशास्त्रां ॥४॥
334 मैं ज्यावगी छोरकर तोरे गांवाछे । तूं खोरी मतकर मोरे लालछे ॥१॥ मोरे घर तूं आकर लालछे । माखन चुरावत आपणे हातछे ॥२॥ मैं कहँगी तोरे मातछे । किसननें चोरी करी मोरी घरछे ॥ ३॥ कहे एका जनार्दनी लालछे । चरण पकरु मो तुमछे ॥४॥
335 मैं दधी बेचन मथुरा । तुम केवं थारे नंदजीको छोरा ॥१॥ भक्ति का आचला पकडा हरी । मत खेचो मोरी फारी चुनरीं ॥२॥ अहंकारको मोरा गरगा फोरा । व्हाको गोरस सबही गिरा ॥३॥ द्वैतनकी मोरी आंगेया फारी । क्या कहुं मैं नंगी नार उधारी ॥४॥ एका जनार्दनी ज्यासो भेटा । लागत पगसे कबु नहीं छुटा ॥५॥
336 म्हणे कृष्णराया शाळीग्राम देई । येरू लवलाही वदन पसरी ॥१॥ चवदा भुवनें सप्त तीं पाताळें । देखियलीं तात्काळें मुखमाजीं ॥२॥ स्वर्गीचे देव मुखामाजी दिसती । भुलली चित्तवृत्ति नंदराव ॥३॥ एका जनार्दनी नाठवें भावना । नंद आपणा विसरला ॥४॥
337 यमुने तटीं मांडिला खेळ । मेळवोनी गोपाळ सवंगडे ॥१॥ जाहले गडी दोहींकडे । येकीकडे रामकृष्ण ॥२॥ खेळती विटीदांडु चेंडु । भोवरें लगोर्‍या उदंडु ॥३॥ ऐसा खेळ खेळे कान्हा । एका जनार्दनीं जाणे खुणा ॥४॥
338 यमुनेचे तीरीं नवल परि वो । तेथें गोपाळ वत्सें स्वयं झाला हरी वो ॥१॥ नवल देखा ठक तिन्हीं लोकां । भुली ब्रह्मादिकां पार नाहीं सुखा ॥२॥ कृष्णवत्साची ध्वनी गाइ पान्हा । तेथें वोळलें निराळे विस्मयो गौळीजनां ॥३॥ गोपाळांचे वचनीं सुखें सुखा भेटी । तेथें वोसंडला आनंद माय कृष्णीं भेटी ॥४॥ ऐसा रचिला आनंद देखोनि निवाडा । तेथे सृष्टिकर्ता तोहि झाला वेडा ॥५॥ ऐसें अचोज पै मना नये अनुमाना । अचुंबीत करनें एका जनार्दना ॥६॥
339 यशोदेचा हरी जाय यमुनातीरीं । वाजवीतो मुरली पोवा नानापरी ॥१॥ छंदे छंदे वाजे वृंदावनीं फुजें । वेधलें मन माझें नाठवें कांहीं ॥२॥ ऐसें येणें पिसें लाविलें गे माये । एका जनार्दनीं पाहिला यादवराय ॥३॥
340 यशोदेसी गौळणी सांगती गार्‍हाणे । नट नाटक कपटी सांभाळ आपुले तान्हें । किती खोडी याच्या सांगु तुजकारणें ॥१॥ सहस्त्रमुख लाजला । निवांतचि ठेला । वेद परतला ।गाती अनुछंदे । वेध लाविला गोविंदे । परमानंदे आनंदकंदें ॥धृ॥ एके दिवशी मी गेलें यमुनातट जीवना । गाई गोप सांगतें घेऊनि आला कान्हा । करीं धरी पदरा न सोडी तो जाणा । एकांत घातली मिठी । न सुटे गांठीं तो पाहिला दृष्टी । नित्य आनंदु वेध लाविला ॥२॥ माझ्या घरासी एकदां आले शारंगपाणी । दहीं दुध भक्षुनी रितीं केली दुधाणीं । अज्ञान मडकीं टाकिलें निपटुनी । पाहिला हरी पळाला दुरी । घरा भीतरीं बाई यशोदे । वेध लाविला ॥३॥ किती खोडी याच्या सांगू तुज साजणी । गुण यांचे लिहितां न पुरे मेदिनी । रुप सुंदर पाहतां न पौरे नयनी । एका जनार्दनीं देखिला । ध्यानी धरिला । मनीं बैसला । सच्चिदानंद ॥ वेध लाविला ॥४॥
341 याहांकी बात नहीं मेरी आवछे । तोरे चरण कमल मैं द्यावछे ॥१॥ सुंदरतुन नंदनंदन लालछे । गळां शोभे वैजंयती मालछे ॥२॥ पीत पीतांबर घोंगरीयाछे । गोपाल नाचती तोरे सातछे ॥३॥ एका जनार्दनी रखत गावढीछे । चित्त जडे मोरे पावडीछे ॥४॥
342 युगायुगीं पीडिली विरहिणी । नाठवीं ध्यानीं मनीं चक्रपाणी । म्हणोनी वियोगाची जाचणी । तो भेंटला संतसंग साजणी ॥१॥ विरह गेला सुख झालें अपार । जन्मोजन्मी चीं तुटे वेरझार वो ॥धृ॥ घडतां संतसंग विश्रांती । तुटली माया पडळभ्रांति । भव संसार याची झाली शांती संतमहिमा वर्णावा किती ॥२॥ महिमा वर्णितां विरहा फिटलें । एका जनार्दनी तया भेटलें । सुख अनुभवे अंतरीं दाटलें । विरहाचें बीज भाजिलें वो ॥३॥
343 येई वो श्रीरंगा कान्हाबाई । विरहाचें दुःख दाटलें हृदयीं । कोण सोडवील यांतुन पाहीं । दैवयोगें सांपडला सगुण देहीं ॥१॥ सगुण निर्गुण याचा वेध । वेधें वेधलें मन झालें सद्गद । वाचा कुंठित हारपला बोध । नेणें आणिक परमानंद ॥२॥ स्थित स्थित मति झाली । वृत्ति विरक्ति हारपली समाधि उन्मनी स्थिरावला । ऐशी विरहाची मति ठेली वो ॥३॥ संगविवर्जित मन झालें । काया वाचा मन चित्त ठेलें । एका जनार्दनीं ऐसें केलें । विरह दुःख निरसिलें ॥४॥
344 येई हो कान्हाई मी दळीन एकली । एकली दळीतां शिनले हात लावी वहिली ॥धृ॥ वैराग्य जातें मांडुनी विवेक खुंटीं थापटोनी । अनुहात दळण माडुनि त्रिगुण वैरणी घातलें ॥येई ॥१॥ स्थुळ सूक्ष्म दळियलें देहकारणसहित महाकारण दळियलें औट मत्रेसहित । येई ॥२॥ दशा दोनी दाळिल्या द्वैत अद्वैतासहित । दाही व्यापक दळियेंले अहं सोहं सहितं ॥येई ॥३॥ एकवीस स्वर्ग दळियेलें चवदा भवनासंहित । सप्त पाताळें दलियेंलीं सप्त सागरांसहित । येई ॥४॥ बारा सोळा दळियल्या सत्रावीसहित । चंद्र सुर्य दळियलें तारागणांसहित ॥येई ॥५॥ नक्षत्र वैरण घालुनी नवग्रहांसहित । तेहतीस कोटी देव दळियेलें ब्रह्मा विष्णुसहित ॥येई ॥६॥ ज्ञान अज्ञान दळियेलें विज्ञानसहित । मीतुंपण दळियेलें जन्ममरणसहित । येई ॥७॥ ऐसें दळण दळियेलें दोनी तळ्यासहित एका जनार्दनीं कांहीं नाहीं उरलें द्वैत ॥येई ॥८॥
345 येकीपुढें येक सरसावोनि गोपिका । सांगतो गाह्माणीं तुज नाहीं ठाऊका ॥१॥ रात्री मंचकावारी पहुडतां साजणी । अवचित येऊनी बांधी दाढी आणि वेणी ॥२॥ नाहतां आपुलेअ अंतसदनीं । येऊनियां पुढें बैसें शारंगपाणी ॥३॥ ऐसा कटाळा आणियला येणें । एका जनार्दनीं तुझें आवडतें तान्हें ॥४॥
346 येणें कृष्णें आमुचें खादलं दुध दहीं । फोडोनि टाइलें भाजनें पाहीं ॥१॥ आवरी आवरी बाई आपुला कान्हा । न कळे याची कारणी ब्रह्मादिकां नये ध्याना ॥२॥ घेऊनियां पोरें घरामध्यें येतो पाहे । चोरी करुनियां पळुनी जातो लवलाहें ॥३॥ एका जनार्दनीं किती सांगू गार्‍हाणें । पुन्हां आलिया यासी शोक लावीन सत्य जाणे ॥४॥
347 येणें छंदे छंद लागली नव्हाळी । हा कान्हो वनमाळी वेध याचा ॥१॥ सरितां सरेना बैसला हृदयीं । तो आतां ठाईचें ठायीं जडलासे ॥२॥ एका जनार्दनी नोहेची परता । संपूर्ण पुरता भरला देहीं ॥३॥
348 येवोनि गोपाळ कृष्णासी बोलतीं । यमुनेचा बाऊ पळाला वो श्रीपती ॥१॥ धन्य बळीया आम्हीं की वो त्रिभुवनी । धन्य धन्य कृष्णा म्हणोनि नाचती अवनी ॥२॥ एका जनार्दनीं ऐकोनी तयांचे बोल । आनंदे गोपाळ तयाशीं खेळे ॥३॥
349 योगी शिणताती साधनकपाटीं । तया नोहे भेटीं कांही केल्या ॥१॥ तो हरी गोकुळीं बाळवेषे खेळे । पुरती सकळ मनोरथ ॥२॥ गोपिका तयासी कडेवरी घेती । वालादुला म्हणती माझे माझें ॥३॥ एका जनार्दनीं जया जैसा हेत । तैसा पुरवीत देवराव ॥४॥
350 रखितो गोध्नेआं मनाचेनी मनें । न पुरे अवसरु धावण्यां धावणें । कुंठित जाहली गति पवनाची तेणें । तो हा नंदाचा नंदन यशोदेचें तान्हें ॥१॥ देखिला देखिला मंडित चतुर्भुज । वैकुठींचा भूपति तेजःपुंज । पहातांचि तय नावडे काहीं दुजें । ऐसें लाघव याचें सहज ॥२॥ चित्त चैतन्य पडिली मिठी । कामिनी मनमोहना जगजेठी । तुझ्या वेधे ध्यानस्थ धुर्जटी । ऐसा गोवळु योगीयांसीनोहे भेटी ॥३॥ एका जनार्दनी शब्दवेगळा । आंगमांनिगमां कांहीं न काळे लीळा । सोहं कोहं शब्दावेगळा । पहा पहा परब्रह्मा पुतळा ॥४॥
351 रमा रमेश मस्तकी हर । पुढे तीर चंद्रभागा ॥१॥ मध्यभागीं पुंडलीक । सुख अलोलिक न वर्णवे ॥२॥ बहुता वैष्णवांचा मेळ । गदरोल नामाचा ॥३॥ वामभागीं रुक्मिनी राही । जनार्दन तेथें पाहीं ॥४॥
352 राखीत गोधनें भक्ताचियां काजा । उणीव सहजा येवो नेदी ॥१॥ आपुलें थोरपणा सारुनी परतें । भक्तांचे आरुतें काम करी ॥२॥ उच्छिष्ट काढणें सारथ्य करणें । उच्छिष्टं तें खाणें तयांसवें ॥३॥ चुकतां वळती आपण वोळणें । एका जनार्दनीं पुण्य धन्य त्यांचें ॥४॥
353 रात्रदिवस मन रंजलें । हरिचरणीं चित्त जडलें । विरहाचें दुःख फिटलें । धन्य झालें संसारीं ॥१॥ विरह गेला सुख झालें वो माया । पुढतोपुढती आनंद न समाये ॥धृ॥ संतसंग घडला धन्य आजीं । मोह ममता तुटली माझी । भ्रांती फिटोनि गेली सहजीं । विरह गेला सुख झालें आजीं ॥२॥ धन्य धन्य संतसंगती । अवधी झाली विश्राती । एका जनार्दनी चिंत्तीं । विरहभ्रांति निरसली ॥३॥
354 राम रावण हुंबली खेळती । खेळीया हनुमान तीरे ॥१॥ खेळ माडिला खेळ मांडिला कान्होबाचे बळें खेळ मांडिला ॥धृ॥ राम कृष्णा हुंबली खेळती । खेळ्या अर्जुन झाला रे ॥२॥ अठरा अक्षौहिणी कौरव मारिले । शिशुपाळसह वक्रदंत वधिले रे ॥३॥ एका जनार्दनीं खेळतां खेळतां हुंबली आनंद बहु जाला ॥४॥ खेळ खेळतां अवघे निमाले मीतुपणा ठाव नाहीं उरला ॥५॥
355 रासक्रीडा करुनी आलिया कामिनी । कृष्णी लांचावल्या आन न रिघे मनीं ॥१॥ जें जें दृष्टी दिसे तें तें कृष्ण भासे । गोपिका समरसे नित्य बोधु ॥२॥ आसनीं शयनीं भोजनीं गमनागमनीं सर्व कर्मीं सदा कृष्णमय कामिनी ॥३॥ एका जनार्दनी व्याभिचार परवडी । गोपिका तारिल्या सप्रेम आवडीं ॥४॥
356 रासक्रीडा खेळ खेळॊनिया श्रीहरी येती परोपरी गोकुळासी ॥१॥ न कळेची कवणा कैसें हें विंदान । वेदादिकां मौन पडिलेंसे ॥२॥ तें काय कळे आणिकां जीवांसी । ऋषी मुनी तापसी धुंडीताती ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा खेळे खेळां । परब्रह्मा पुतळा नंदाघरीं ॥४॥
357 रूपें सुंदर सांवळा गे माये । वेणू वाजवीं वृदांवना गोधनें चारिताहे ॥१॥ रुणझुण रुणझुण वाजवी वेणु । वेधीं वेधलें आमुचें तनमुन वो माये ॥२॥ गोधनें चारी हातीं घेऊनी काठी । वैकुंठीचा सुकुमार गोपवेषें जगजेठी ॥३॥ एका जनार्दनीं भुलवी गौळणी । करिती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥
358 लक्षांचे जें लक्ष तो दिसे अलक्ष । तो असे प्रत्यक्ष नंदाघरीं ॥१॥ बाळरुप गोजिरें वाळे वांकी साजिरें । पाहतां दृष्टीचे पुरे कोड सर्व ॥२॥ ध्यानाचें निज ध्यान मनाचें अधिष्ठान । व्यापक विधान महेशाचे ॥३॥ एका जनार्दनीआं शब्दाची नातुडे । गौळणी वाडेंकोडें जेवाविती ॥४॥
359 लाहे लाहे सोडीत गोधनें । भोंवतें गोपाळ वेष्टित तारांगणें । शोभला तो बाळवेषें परिपुर्ण । वेधु लाविला आम्हांसी तेणें वो ॥१॥ छंदे छंदें वाजवितो वेणु । आमुचा गुंतला तेथे जीवप्राणू । नाठवे दुजा हेत कांहीं आनु । तो हा नंदनंदुनु यशोदचा ॥२॥ खेळे खेळे यमुनेचे तटीं । सुकुमार सांवळा जगजेठी । खांदा घोगडें शोभे हातीं काठी । गोपाळांसी वळत्या दे सये घाली मिठी ॥३॥ एका जनार्दनीं कळंबातळीं । मिळोनियां गोपाळमंडळीं । काला मांडियेला मिळोनि सकळीं । लाहे लाहे वाटी शिदोरी ॥४॥
360 वनमाजीं नेती गोपिका तयासीं । राम क्रीडा खेळावयासी एकांती ॥१॥ जैसा जया चित्ती हेत आहे मनीं । तैसा चक्रपाणी खेळतसे ॥२॥ जया जैसा भाव तैसा पुरविणें । म्हणोनि नारायणें अवतार ॥३॥ एका जनार्दनी घेऊनी अवतार । भक्ताचे अंतर जैसें तैसें ॥४॥
361 वसती सदा पंढरीसी । नित्य नेमें हरी दरुशनासी । तयां सारखे पुण्यराशी । त्रिभुवनीं दुजे नाहीत ॥१॥ धन्य क्षेत्र भीवरातीर । पुढे पुंडलीक समोर । तेथें स्नान करती नर । तयां जन्म नाहीं सर्वथा ॥२॥ करती क्षेत्र प्रदक्षिणा । त्याच्यां पार नाहीं पुण्या । जगीं धन्य ते मान्य । एका जनार्दनीं म्हणतसे ॥३॥
362 वाउगे ते बोल बोलती अबळा । कवण ते गोपाळा धरुं शके ॥१॥ प्रेमावीण कोण्हा न सांपडे हरी । वाउगी वेरझारी घरामध्यें ॥२॥ एका जनार्दनीं गोपीकांसीं शीण । म्हणोनि विंदान करीतसे ॥३॥
363 वाउगे ते बोल बोलती अबळा । कवण ते गोपाळा धरुं शके ॥१॥ प्रेमावीण कोण्हा न सांपडे हरी । वाउगी वेरझारी घरामध्यें ॥२॥ एका जनार्दनीं गोपीकांसीं शीण । म्हणोनि विंदान करीतसे ॥३॥
364 वाऊगे तें वायां । कुंथाकुंथी खेळावया ॥१॥ हा खेळ नोहेरे बरा । गाई आधी ते आवरा ॥२॥ करा आपुले स्वाधीन तेणें तुटेल बंधन ॥३॥ एका गुंतूं वायां । एका जनार्दनीं लागे पायां ॥४॥
365 वायां खेळ एकीबेकी । पडलीस काळाचे मुखीं ॥१॥ आधींच एक निर्गुण रे । मायेनें केलें सगुण रे ॥२॥ एकीबेकी म्हणतां एकलें रे । दोन म्हणतां सर्व आतलें रे ॥३॥ एका जनार्दनीं ऐकलें रे । एक जण अवघें फिटलें रे ॥४॥
366 विटिदांडु खेळसी वांया । चौर्‍यायंशी वेरझारा होती पाया ॥१॥ नको विटिदांडु सांडीं हा छंदु । आवडी वदे रामगोविंदू ॥२॥ किती वेरझारी करीसी पा वायां । शरण रिघे एका जनार्दन पायां ॥३॥
367 विटिदांडु चेंडु भला रे । मनीं समजोनी मारा टोला रे ॥१॥ खेळूं विटिदाडुं चेंडु । काळा नका भिऊ गांडु रे ॥धृ॥ सहा चारएकत्र करुनी अवघे पुढें रहा । सावध होऊनि धरा चेंडु कोणी कोणाकडे न पहा ॥२॥ प्रपंचाचे घाई धन वित्त म्हनता भाई । हातीचा चेंडु सोडुनी देई पुढें मारील डोई ॥३॥ खेळ खेळा परी मनीं धरा जनार्दन । तेणे चुके जन्ममरण शरण एका जनार्दन ॥४॥
368 विरहिणी विरहा विरहित बोले । कां वो पुर्वकर्म आड ठेलें । वाचें न येती नाम सावळें । तया विरहा मन माझें वेधलें ॥१॥ ऐशा परी बोलती गोपबाळा । कोठें गेला नेणो सांवआळा । पहातां पहातां ठकविलें गोपाळा । ऐसा याच विरह लागला ॥२॥ नेणो कांही कर्म आड ठेलें । वियोग वियोगाचें वर्म ऐसें जाले । एका जनार्दनीं कौतुक बोले । ऐशा दुःखा विराहिणा बोले ॥३॥
369 विवेक कांडणीं कांडितें साजणी । निजबोध स्मरणी फिरतसे ॥१॥ देह हें उखळ मन हें मुसळ । काडिलें तांदुळ विवेकाचे ॥२॥ एका जनार्दनीं कांडन कांडितां । ब्रह्मा सायुज्यता प्राप्त झाली ॥३॥
370 विवेक वैराग्य दोघें भांडती । ज्ञान अज्ञान पाहाती रे । आपुले स्वरुपीं होऊनि एक चित्त झाली सकळ सृष्टी रे ॥१॥ हुतुतुतुतु खेळूं रे गडिया हुतुतुतुतु खेळू रें । रामकृष्ण गोविंद हरी नारायण निशिदिनीं भजन करा रे ॥धृ॥ हिरण्यकश्यप प्रल्हादपुत्र खेळतां आले हातघाई रे । बळेंचि आला फळी फोडुनी गेला पित्यासी दिधलें डायीं रें ॥२॥ राम रावण सन्मुख भिडता बरवा खेळ मांडिलां रे । कुंभकर्ण आखया इंद्रिजितासी तिघांसी पाडिले डायीं रे ॥३॥ कौरव पांडव हुतुतु खेळती खेळिया चक्रपाणी रे । कामक्रोध जीवें मारिला उरुं दिला नाहीं कोणी रे ॥४॥ एका जनार्दनीं हुतुतु खेळतां मन जडलें हरी पायी रे । विवेक सेतु त्यांनी बांधिला उतरुन गेलें शायीं रे ॥५॥
371 विश्वाचा व्यापक विश्वंभर साक्षी । नये अनुमानासी वेदशास्त्रां ॥१॥ नवल गे माय नवल गे माय । चोरुनियां खाय नवनीत ॥२॥ धरिती बांधती गौळणी बाळा । वोढोअनि सकळां आणिताती ॥३॥ एका जनार्दनीं येतो काकुलती । न कले ज्यांची गति वेदशास्त्रां ॥४॥
372 विषय विरह गुंतले संसारीं । तया जन्म जन्मातरीं फेरी । कोणी न सोडवी निर्धारीं । यालागी न गुंता संसारीं ॥१॥ मज सोडवा तुम्हीं संतजन । या विषयविरहापासोन ॥धृ ॥ क्षणिक विषय संसार । भरला दिसे भवसागर । यांतुनी उतरीं पैलपार । संतसंग मिळविया ॥२॥ यासी शरण गेलिया वांचुनी ।संतसंग न जोडे त्रिभुवनी । शरण एकाभावें जनार्दनी । विरह गेला समूळ निरसोनी ॥३॥
373 विष्णुमूर्ति चतुर्भुज शंख चक्र हातीं । गदा पद्म वनमाळा शोभती ॥१॥ गाई गोपाळ सवंगडे वनां । घेऊनीयां जाय खेळे नंदाचा कान्हा ॥२॥ विटी दांडु चेंडु लागोरी नानापरी । खेळ मांडियेला यमुनेचे तीरीं ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां तन्मय । वेधलें मन वृत्तिसहित माय ॥४॥
374 वेदादिक श्रमले न कळे जया पार । शस्त्रांसी निर्धार न कळेची ॥१॥ तो हा श्रीहरी नंदाचिया घरीं । क्रीडे नानापरी गोपिकांसी ॥२॥ चोरावया निघे गोपिकांचें लोणी । सौगडें मिळोनी एकसरें ॥३॥ एका जनार्दनी खेळतसे खेळा । न कळे अकळ आगमनिगमां ॥४॥
375 वेदाभ्यासं श्रमलें । पुराण वक्ते ते भागले ॥१॥ तया विश्रांतीस स्थान । अधिष्ठान पंढरी ॥२॥ शास्त्राभ्यास नेहटीं । वादावाद दाटोदाटीं ॥३॥ एका जनार्दनीं शरण । पंढरी स्थान ऐशिया ॥४॥
376 वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग । सर्व सांडियेला मोह ममता संग । जीवीं जिवला जाला अनंग । भेटता भेटवा मज श्रीरंग ॥१॥ ऐशी विरहिण बोले बोली । कां रे हरी तु सांडी केली ॥धृ ॥ समभाव तुज पहावया । मन आमुचे गुंतलें देवराया । तुं तंव मध्यें घालिसी माया । नको आतां विरह पायां ॥२॥ आमुचा विरह कोण निवारी । विरहिनी बोले ऐशिया परी । एका जनार्दनी श्रीहरी । जन्ममरणाचा विरह निवासी ॥३॥
377 वेधल्या गोपिका सकळ । गोवळ आणि गोपाळ । गायी म्हशी सकळ । तया कृष्णाचें ध्यान ॥१॥ नाठवें दुजें मनीं कांही । कृष्णावांचुनीं आन नाहीं । पदार्थमात्र सर्वही । कृष्णाते देखती ॥२॥ करितां संसाराचा धंदा । आठविती त्या गोविंदा । वेधें वेधल्या कृष्णाछंदा । रात्रंदिवस समजेना ॥३॥ एका जनार्दनी छंद । ह्रुदयीं तया गोविंद । नाहीं विधि आणि निषेध । कृष्णावांचुनी दुसरा ॥४॥
378 वेधल्या त्या गोपी नाठवे आपपर कृष्णमय शरीर वृत्ति जाहली ॥१॥ नाठवे भावना देह गेह कांहीं । आपपर त्याही विसरल्या ॥२॥ एका जनर्दनीं व्यापला हृदयीं । बाहेर मिरवी दृष्टिभरित ॥३॥
379 वैकुंठीचे वैभव पंढरीसी आलें । भक्तें सांठविलें पुंडलिकें ॥१॥ बहुतांसी लाभ देतां घेतांजाहला । विसावा वोळला पाडुरंग ॥२॥ योग याग साधने करिती जयालागीं । तो उभाचि भक्तालागीं तिष्ठतसे ॥३॥ हीन दीन पापी होतुका भलते याती । पाहतां विठ्ठलमूर्ती मुक्त होती ॥४॥ एका जनार्दनीं सुखाचे माहेर । बरवें भीमातीर उत्तम तें ॥५॥
380 वैकुठींचा हरी गोपवेष धरी । घूऊनि शिदोरी जाय वनां ॥१॥ धाकुले संवगडे संगती बरवा । ठाई ठाई ठेवा गोधनांचा ॥२॥ बाळ ब्रह्माचारी वाजवी मोहरी । घेताती हुंबरी एकमेंकां ॥३॥ दहीं भात भाकरी लोणचें परोपरी । आपण श्रीहरी वाढितसे ॥४॥ श्रीहरी वाढिलें गोपाळ जेविलें । उच्छिष्ट सेविलें एका जनार्दनीं ॥५॥
381 व्यास वाल्मिक नारद मुनी । नित्य चिंतित चिंतनी । येती पंढरपुरभुवनीं । श्रीविठ्ठल दरुशना ॥१॥ मिळोनि सर्वांची मेळ । गाती नाचती कल्लोळ । विठ्ठल स्नेहाळ । तयालागीं पहाती ॥२॥ करिती भीवरेचें स्नान । पुंडलिका अभिवंदन । एका जनार्दनीं स्तवन । करिती विठ्ठलाचें ॥३॥
382 व्रजात कोणे एक वेळेशी । आले गर्गाचार्य ऋषी । त्यासी दाखवितां कृष्नासी । चिन्हें बोलतां झाला ॥१॥ यशोदेबाई ऐक पुत्राची । लक्षणे ॥धृ ॥ मध्ये मुख्य यशोदा बाळा । सन्मुख रोहिणी वेल्हाळा । भोवंता गोपिकांचा पाळा । त्या गोपाळा दाखविती ॥२॥ करील दह्मा दुधाची चोरी । भोगिल गौळियांच्या पोरी । सकळ सिंदळांत चौधरी । निवडेल निलाजरा ॥३॥ चोरुनी नेईल त्यांची लुगडीं । त्यांचे संगे घेईल फुगडी । मेळवुनी गोवळ गडी । सुगडी फोडी शिंकींची ॥४॥ पांडव राजियाचे वेळीं । काढील उष्टया पात्रावळी । ढोरें तुमच्या घरची वेळीं । निवडेल निलाजरा ॥५॥ यावरी कलवंडतील झाडें । लत्ता खळाळ हाणील घोडे । महा हत्ती धरील सोंडे । परी ती विघ्रे मावळतीं ॥६॥ यावरी गाडा एक पडावा । अथवा डोहामाजीं बुडावा । वावटुळीनें उडुनी जावा । सांपडावा वैरियाला ॥७॥ कारण सच्चिदानंदाचें । बीज नोहे हें नंदाचें । जन्मांतर गोविंदाचें । नव्हें कथिल्य मथिल्यांचे ॥८॥ हृदयीं श्रीवत्सलांछन । ब्राह्मणलत्तेचें भूषण । हा होईल ब्राह्मणा जन । एका जनार्दनीं घरींचा ॥९॥
383 शुद्ध स्फटिके आपुलें रुप देखे । कृष्ण तेणें हारिखें डोलतसे ॥१॥ देहाविदेहा आलिंगन स्वानंदें चुंबन । तये संधीं मन हारपत ॥२॥ स्वस्वरुपीं भेटीं थोर उल्हास पोटीं । उन्मळींत दाष्टी निजरुप पाहें ॥३॥ हें जाणोनि माया धावे लावलाह्मा । उचलोनि कान्हाया दृश्य दावी ॥४॥ माझें रुप मज देई घालितो लोळणी । जननी नानागुणी बुझावीत ॥५॥ माया मोहं गुणाचे खेळणें । येथें कृष्ण म्हणे जीवेभावें ॥६॥ देह घटाबाहेरी न वचें मी मुरारी । श्रद्धा उष्ण भरी तावितसे ॥७॥ विषय पंचधारा देइन बा साकर । नाथिली करकर कां करिसी ॥८॥ घेई स्तनपान वोरसु इंद्रियां गोरसु । मायेसी उदासू रुसूं नको ॥९॥ इच्छा माउलीची साय सावकाश खाय । गोगोरसाची माय मज चाड नाहीं ॥१०॥ तो तंव ठाईच्या ठाई म्यां तव काहीं नेले नाहीं । निजरुप पाही जैंसे तैसें ॥११॥ तुझी पडलीया पडसाई असतांचि जालें नाहीं । नास्तिक तेचि डोई सबळ जाले ॥१२॥ तुझिया सांगातें करणें आणि भुतें । अहंकारें थिते चोरुनि नेलीं ॥१३॥ दुजेपणें पाहतां धरितां नये हातां । निजरुपा तत्त्वतां काढोनि देई ॥१४॥ होसी चक्रचाळ घाइसी आळ । बाळलीळा खेळ निर्वाणीचा ॥१५॥ मज मायावेगळा नवचे बा गोपाळा । आपरुपीं खेळा खेळू नको ॥१६॥   नेणों कैशी आवडी माया म्हणसी कुडी । भूली नव्हें खोडी तान्हुलिया ॥१७॥ हें नायके उत्तर म्हणे परती सर । निजरुपी साचार दावीं मज ॥१८॥ यापरी कान्हया स्वरुपीं थाया । बुझावितां माया वेढोनि गेली ॥१९॥ आपुलैया स्वप्रभा आपण पावे शोभा । सबाह्म कृष्ण उभा एकपणें ॥२०॥ माया मोहकता गुणाची वार्ता । कृष्णापणीं एकत्वेंची ॥२१॥ एक जनार्दनी निजीं निज मिळणी । सगुणी निर्गुणीं कृष्ण एक ॥२२॥
384 शेषादिक श्रमले न कळे ज्याचा पार । आगमानिगमा निर्धार न कळेची ॥१॥ तें हें बाळरुप यशोदे वोसंगा । पाहतां दोषभंगा जाती रया ॥२॥ करितसे चोरी खोडी नानापरी । यशोदा सुंदरी कोड वाटे ॥३॥ बांधिती गळिया धांवोनी दाव्यानें । नका नका म्हणे दीनवाणी ॥४॥ त्रिभुवनासी ज्याचा धाक तो ब्रह्मांडी । त्यासी म्हणती भांडी आला बाऊ ॥५॥ भिऊनियां लपे यशोदे वोसंगा । ऐशा दावी सोंगा भाविकांसी ॥६॥ एका जनार्दनीं दावितो लाघव । ब्रह्मादिकां माव न कळे ज्यांची ॥७॥
385 श्रीकृष्ण न्यावा गोकुळा । पायीं स्नेहाच्या शृंखळा । कायाकपटीं अर्गळा । मोहममतेच्या ॥१॥ कृष्णीं धरितां आवडी । स्वयें विराली स्नेहाची बेडी । मुक्तद्वारा परवडी । नाहीं अर्गळा शृखंळा ॥२॥ कृष्ण जंव नये होतां । तंवचि बंधनकथा । पावलीया कृष्णानाथा । बंदी मोक्ष ॥३॥ ते संधि रक्षणाईते । विसरली रक्षणातें । टकमकीत पहाते । स्वयें कृष्ण नेतां ॥४॥ श्रीकृष्ण अंगशोभा । नभत्व लोपलें नभा । दिशेची मोडली प्रभा । राखते कवण ॥५॥ अंधारामाजी सूर्य जातु । श्रीकृष्णासी असे नेतु । सत्व स्वभावें असे सांगतु । कृष्णाकडिये पडियेला ॥६॥ अंध ते बंधन नेलें । राखतो राखणे ठेलें । एका जनार्दनी केलें । नित्य मुक्त ॥७॥
386 श्रीगुरुराया पार नाहीं तव गुणी । म्हणोनि विनवयी करितसों ॥१॥ मांडिला व्यवहार हरिनामीं आदर । सादरा सादरा वदवावें ॥२॥ न कळेचि महिमा ऊंच नीचपणे । कृपेंचे पोसणें तुमचे जाहलों ॥३॥ एका जनार्दनी करुनी स्तवन । घातिलें दुकान मोलेंविण ॥४॥
387 सकळीक तीर्थे पाहतां डोळा । निवांत नोहे हृदयकमळा ॥१॥ पाहतां तीर्थे चंद्रभागा । सकळ दोष गेले । भंगा ॥२॥ पाहती विठ्ठल सांवळा । परब्राह्मा डोळां देखियेलें ॥३॥ एका जनार्दनीं पाहोनी ध्यान । भुललें मन त्या ठायीं ॥४॥
388 समचरणीं मन माझे वेधलें । तें वेगळें होतां विरह बोलें । हर्षामर्षा चित्त उन्मन ठेलें । म्हणोनि विरहिनी विरह बोले ॥१॥ सांवळीया कान्हया नको जाऊं दुरी । राहे पेरपरता परतोनि हरी । पश्यंती मध्यमा मरुनी वैखरी । चारी वाचा तटस्थ जाहल्या हरी ॥२॥ तुझ्या वियोगाचा न व्हावा संग । अखंड नामीं असो अनुसंधान । शरण एका जनार्दने । काया वाचा मनें जाणोन ॥३॥
389 समुद्रवलयांकित पृथ्वी पाहतां । ऐसें तीर्थ सर्वथा नाहीं कोठें ॥१॥ भाविकांचें माहेर जाणा पंढरपुर । विठ्ठल विटेवर उभा असे ॥२॥ एका जनार्दनीम तयाचाचि ठसा । भरुनि आकाशा उरलासे ॥३॥
390 सहज तो चेंडु समान फळी । झेलुं जाणेतो खेळियां बळी ॥१॥ झेला रे भाइनों झेलारे सदगुरुवचनें झेला रे ॥धृ ॥ अवघे गडी समान रहा । येतां यावा सावध पहा ॥२॥ सुटे सुटाए तंव सरिसाचि पावे । लक्ष जाणें तो माघारा नव्हें ॥३॥ गडियांने गडियची न धरावी आस । आपुलिया बळें घालावी कास ॥४॥ अभिमाना चढे तो बाहेरी पडे । हतींचे जाय मग उगलाचि रडे ॥५॥ एका जनार्दनी येकची बोली । भावार्थी तो सदगुरुवचनें झेली ॥६॥
391 सांवळा देखिला नंदाचा । तेणें आनंदाचा पुर झाला ॥१॥ काळीं घोंगडी हातामध्यें काठी । चारितो यमुनातटीं गोधनें तो ॥२॥ एका जनार्दनीं सावंळा श्रीकृष्ण । गौळणी तल्लीन पाहतां होती ॥३॥
392 सांवळा श्रीकृष्ण राखितो गाई । वेधियलें मन आमुचें तें पायीं ॥१॥ नवल लाघव न कळे ब्रह्मादिकां । वेदश्रुतीं शिणल्या ठक पडलें सकळिकां ॥२॥ साही दरुशनें वेडावलीं जयासाठीं । खांदी घेऊनी कांबळा गोधन राखी जगजेठी ॥३॥ एका जनार्दनीं ब्रह्मा गोकुळीं उघडें । पाहतां चित्त तेथें वेधलें ॥४॥
393 सांवळें सानुलें म्हणती तान्हुलें । खेळें तें वहिलें वृंदावनीं ॥१॥ नागर गोमटें शोभे गोपवेषें । नाचत सौरसे गोपाळासीं ॥२॥ एका जनार्दनीं रुपासी वेगळें । अहं सोहमा न कळें रुप गुण ॥३॥
394 सानुले तानुले राम आणि कृष्ण । गोकुळीं विंदान दाविताती ॥१॥ गाई राखिताती लोनी चोरिताती । अकळ खेळताती नानापरी ॥२॥ एका जनार्दनी नये अनुमाना । ब्रह्मादिक चरणा वंदिताती ॥३॥
395 सारांचे सार गुह्मांचें निजगुह्मा । तें हें उभें आहे पंढरेये ॥१॥ चहुं वांचापरतें वेदां जें आरुतें । ते उभे आहे सरतें पंढरीये ॥२॥ शास्त्रांचें निज सार निगमां न कळे पार । तोचि हा परात्पर पंढरीये ॥३॥ एका जनार्दनी भरुनि उरला । तोचि हा देखिला पंढरीये ॥४॥
396 सुंदर बाळका म्हणती गोपिका यशोदा रोहिणी सन्मुखा । आदि नाटका नाच व्यापका मिळालिया अनेका । सर्व पाळका सकळ चाळका सुखदाता सकळिका । धिमी धिमी बाळा नाचे वहिला म्हणती मायादिका ॥१॥ कृष्णा नाव रे व्यापका । म्हणाताती गोपिका ॥धृ॥ दणदण मेदनी वाजत वाम चरणनिघातें । थोंगीत थोंगीत थाक तोडीत चित्त अनुकारें संगीतें । टाळछंदें मन वेधें टाळी वाजे अनुहातें । धिम धिम धिमतांग थोंकीत ताळछंदें सांवळें नाचतें ॥२॥ गुप्त प्रगटीत थाक दावित स्थुळ सुक्ष्म आनंदें । धिगीतां धिगीतां वाजती गजरें शास्त्राचेनी विवादें । घटतन घटतनं शब्दे बोलती तार्किक गेले भेदें । गर गर गर गर भोवरी देत अवतार संबंधे ॥३॥ रणुझुणु रणझुणु वाजती श्रुति नेति नेति उअच्चारी । आत्मा हा व्यापक नाटक त्रैलोक्य पडलें फेरी । यशोदा रोहिणी वृद्ध गौळणी नाचत देह विसरी । पक्षी चारा विसरलें पवन मुख पसरे अंबरी ॥४॥ देव विमानीं पहाती गगनीं ब्रह्मा नाचताहे येउनी । इंद्र ऐरावत नाचत जवळील ब्रह्मास्पती तो मुनी । गण गधर्व देव सर्व तेहतीस कोटी मिळोनी । कुबेर पोटा नाचत मोठा कृष्णांछंन घेउनी ॥५॥ शेष वासुकि नाचत वेंगीं चवदा भुवनें माथां । वराह गाढा पृथ्वी दाढां नाचे विसरुनि चिंता । तृणें तरुवरें पर्वत कुंजर लाचावले अनंता । सगुण निर्गुण अजंगम स्थावर वेधले अच्युता ॥६॥ घुळु घुळु घुळु घुळु कंकण वाजती बाहुभूषित भूषणां । तो परात्पर त्रैलोक्य सुंदर जगाचिया जीवना । खुण खुण संतबोलती संत घांगुरले हरिचरणा । दृष्टी देखिला सबाह्म निवाला एकशरण जनार्दना ॥७॥
397 सुंदर मुख साजिरें कस्तुरी मळवटीं । मुरली वाजवीत उभा यमुनेचे तटीं । गोपवेष शोभे खांदा कांबळी हातीं काठी । तो नंदनंदन देखीला जगजेठी वो ॥१॥ मजुंळ मंजुळ वाजवी मुरली । ऐकता माझी चित्तवृत्ति हरली ॥धृ ॥ चारी वेद जया गाताती आनंदें । तो गोकुळीं गाई चारी परमानंदें । श्रुतिशास्त्रें वेधला जयाचिया छंदें । तया गोवळा म्हणती कान्हा आनंदें ॥२॥ ऐशी आवडी भक्तिंची देखा । उच्छिष्ट खातां कांहीं न धरी शंका । एका जनार्दनीं भुलला तयाचिया । सुखा वैकुंठ नावडेचि देखा ॥३॥
398 सैराटगोधनें चालती वनां । तयामागें चाले वैकुंठीचा राणा ॥१॥ सांवळे चतुर्भुज मेघःश्याम वर्ण । गाईगोपाळां समवेदा खेळे मनमोहन ॥२॥ यमुनेचे पाबळीं मिळोनियां सकळीं । खेळें चेंडुफळी गाडियांसम ॥३॥ एका जनार्दनीं मदनपुतळा । देखियेला डोळां नंदरायाचा ॥४॥
399 हमामा घाली राम अवतारीं । कैकईची भीड तुला भारी । प्रस्थान ठेविलें लंकेवरी ॥१॥ हमामा तुं घाली । कान्होंबा हुतुतुतु खेळुं ॥धृ॥ हमामा घाली नंदाघरीं । मिळोनि गौळियांच्या नारी । गोपाळ नाचती गजरीं ॥२॥ हमामा घाली पंढरपुरी । पुंडलीकाची भीड भारी । गोपाळ नाचती गजरीं ॥३॥ हमामा आषाडीकार्तिकीचा । साधुसंत गर्जती वाचा । एका जनार्दनीं म्हणे त्याचा ॥४॥
400 हमामा घालूं सोई । सांभाळूं शिवा दोही ॥१॥ हमामा रे भाई । कान्होबाचे बळे घालुं हमामा ॥२॥ हमामा घालुं ऐसा । भक्तिबळें कान्होबा बैसा ॥३॥ हमामा घालूं नेटें ।एका जनार्दनांचे बळ मोठें ॥४॥
401 हमामा पोरा हमामा । घुंबरींवाजे घमामा ॥१॥ हमाम्यांचे नादानी । घुंबरी वाजली रानीं ॥२॥ हमाम्यांची शीतळ शाई । पोरा मेली तुझी आई ॥३॥ काम क्रोध पोरा नाशी । अहंकार तोंड वासी ॥४॥ एका जनार्दनांशीं । पोरा वहिल्या गांवा जाशीं ॥५॥
402 हमामा बाळा घालीं । नको पडों काळाचे चालीं ॥१॥ हमामा पोरा हमामा ॥धृ॥ हमामा घालीं बरव्यापरी । क्रोधकामा सारुनी दुरी ॥२॥ हमामा घालीं नेटें । धरीं भक्तींचे बळ मोठे ॥३॥ हमामा घालसील जरी । एका जनार्दनाचे चरण धरीं ॥४॥
403 हमामा बोला बाळा । खोटा सोडुनी द्यावा चाळा ॥१॥ बोला हमामा बोला हमामा ॥धृ॥ हमामा बोला होटीं । बुद्धी सांडोनि द्यावी खोटी ॥२॥ हमामा बोला भाई । पुन्हां जन्मा येणें नाहीं ॥३॥ एका जनार्दनांचे पायीं । भावें ठेवियेली डोई ॥४॥
404 हमामा भाई हुंबरी । खेळों भाई हमामा हुंबरी ॥१॥ राम रावण हमामा घालितीं । हनुमान बेळें खेळीया निज ज्योंती ॥२॥ अर्जुन भीष्म हमामा खेळती । कृष्णे सुदर्शन धरिलें हातीं ॥३॥ एका जनार्दनीं हमामा जाहला ।अवघा खेळ ग्रासोनि ठेला ॥४॥
405 हमामा भाई हुंबली । गोपाळ वासुरें कान्होबा जाला ना ब्रह्मामाया बोंबली रे ॥१॥ हमामा भाई बार कोंडे । वासुरें लेकुंरें कान्होबा जाला ठकविलें ब्राह्मण चहुं तोडें ॥२॥ हमामा भाई बारकोंडा । कंआचा केशीया कान्होबा मरिला हांसता आला होऊनियां घोडा रे ॥३॥ हमामा भाई खोल पाणी । यमुनेमाझारी कान्होबा पोहतां कुटिला काळिया फणी रे ॥४॥ हमामा भाई तोंड वासी । शिंक्याचें लोटकें कान्होबा भेदिलें लागली धार गोड कशी रे ॥५॥ हमामा भाई तोंड वासी ॥ औटचि मात्रा कान्होबा भेदिली लागली गोड कैसी रे ॥६॥ हमामा भाई चाट बोटे । चोरीचें दुध गोड मोठें ॥७॥ हमामा भाई गटगोळे । स्वर्गीच्या देवां लाळ गळे ॥८॥ हमामा भाई गट गोळी । जेविती खेळीमेळीं ॥९॥ हमाम भाई मिठी मिठी । आजचें भोजन गोड सुटी ॥१०॥ एका जनार्दनीं तृप्त झाला । ब्रह्मादेव लाळ घोटी ॥११॥
406 हमामा माडिला कान्होबा भाई । हमामा खेळूं भाई कान्ह्बा तुझें पायीं ॥१॥ हमामा रे हमामा । कान्होबा खेळूं हमामा ॥धृ॥ हमामा खेळा वेंगीं । सांडुनीं द्वैताच्या संगीं ॥२॥ हमामा खेळूं नेटें । कान्होंबाचे बळ मोठें ॥३॥ हमामा खेळॊं सोई । एका जनार्दनाचे पायीं ॥४॥
407 हमामा हुंबरी घालुं नका एक भावें । जेथे वसे कान्होबा तें घर आम्हां ठावें ॥१॥ हमामा घालुं आवडीं । कान्होंबा तुं आमुचा गडी ॥२॥ हमामा घालुं सोई । आमुचा कान्होबा भाई ॥३॥ हमामा घालुं रानीं । एका जनार्दनाचे चरणीं ॥४॥
408 हमामा हुबरी खेळती एक मेळा । नानापरींचें गोपाळ मिळती सकळां ॥१॥ एक धावें पुढें दुजा धावे पाठीं । एक पळें एकापुढें एक सांडोनि आटी ॥२॥ ऐसें गुतलें खेळा गाई धांवती वनीं । परतेनाची कोण्हा एका जनार्दनीं ॥३॥
409 हर्षा नमाये अंबरीं । येऊनियां झडकरी । द्वारा उघडी निर्भरी । आनंदमय ॥१॥ वृद्धा येऊनियां पाहें । उचलोनि लवलाहे । मुख चुंबिलें तें पाहें । कृष्णाचे देखा ॥२॥ मोहिलें वृद्धेचें मन । नाठवे आपपर जाण । लाघवी तो नारायण । करुनियां आकर्ता ॥३॥ दोहीं करें उचलिला । राधिकेजवळीं तो दिला । म्हणे राधेसी ते वेळां । यांसी नित्य आणी ॥४॥ तुज न गमे एकटी । आणीत जाई जगजेठी । एका जनार्दनाचे भेटी । रे कांहीं विकल्प ॥५॥
410 हामे आपले सोवते घरछे । रात आयो थारोशामछे ॥१॥ मारी वेणी पकड करी हतछे । दाढी बांधी गाठछे ॥२॥   मोरी घागरीया फोर करछे । भागन गया गाप घरछें ॥३॥ एका जनार्दनीं तोरे शामनेछे । मोरो संसारको नासछे ॥४॥
411 हासोनिया राधा बोले यशोदेशी । यह ओ हा चोर बोल विश्वासी ॥१॥ आण वाहतसे लटकीची मामिसे । याचिया वचनीं सर्वास विश्वासे ॥२॥ खोडी न करी ऐशी वाहे तू आण । गोरसांवांचुनि चोरी न करीं तुझी आण ॥३॥ एका जनार्दनीं बोले विनोद वाणी । यशोदेसह हांसती गौळणीं ॥४॥
412 हो भलो तुम नंदन लालछे । मुजे गांवढी बतावछे ॥१॥ आगल पिछिल ध्यानमें आवछे । मंगल नाम तोरा मे गावछे ॥२॥ तरो सुंदर रुप मोरे मनछे । प्रीत लगी कान्हा हमछे ॥३॥ एक जनार्दनीं तोरे नामछे । गावत ध्यावत हृदयमेछे ॥४॥

No comments:

Post a Comment